Surya bhedi Pranayama Mahiti, Kase Karave, Fayde in Marathi
Pranay Lanjewar
Suryabhedi Pranayam information in Marathi
ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण सौरमंडळाला उष्णता प्रदान करतो, त्याचप्रमाणे सूर्यभेदी प्राणायाम केल्याने शरीरातील संपूर्ण नाडीसंस्थत उष्णतेचा संचार होतो. शरीरातील सर्व योगचक्रे जागृत करण्यात हा प्राणायाम साहाय्यक आहे.
विशुद्धाख्य व आज्ञाचक्रावर या प्राणायामाचा विशेष प्रभाव पडतो.
सूर्यभेदी प्राणायाम कसे करावे
Step 1 : प्रात:काळी शौच-स्नानादीतून निवृत्त होऊन गरम आसनावर पद्मासन अथवा सुखासनात बसावे.
Step 2 : डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने हळूहळू दीर्घ श्वास घ्यावा. श्वास घेताना आवाज होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता आपल्या क्षमतेनुसार श्वास आतच रोखून ठेवावा.
Step 3 : त्यानंतर डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. अशा प्रकारे 3 ते 5 प्राणायाम करावे. काही दिवसांच्या अभ्यासाने कपाळालून घाम येऊ लागतो.
टीप : आंतकुमकाचा हा कालावधी काही दिवसांच्या अभ्यासाने एक ते दीड मिनिटापर्यंत वाढवू शकता.
Suryabhedi Pranayam Che Fayde [Benefits in Marathi]
या प्राणायामामुळे सूर्यनाडी क्रियाशील होते.
नियमितपणे पाच सूर्यभेदी प्राणायाम केल्याने कफजन्य सर्व रोग दूर होतात.
सर्दी-खोकला व पड़से बरे होते आणि जुना संचित कफ पंचळून बाहेर पडतो.
मेंदूचे शोधन होते तसेच गेंदूच्या कोणत्याही भागात सूक्ष्म कृमी (जंतू) झाले असतील तर तेसुद्धा नष्ट होतात.
जालंधर बंध करून हे प्राणायाम केल्याने हायपो थायरॉइड आणि हायपर थायरॉइडमध्ये लाभ होतो. गळा, जीभ आणि श्वसननलिकेचे दोष दूर होतात.
निम्न रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम लाभदायक आहे.
या प्राणायामामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पोटातील जंत नष्ट होतात. वायुदोष, संधिवात, कंबरदुखी आणि सायटिका इ.मध्ये हा प्राणायाम लाभदायक आहे.
Suryabhedi Pranayam Savadhagiri [Precautions in Marathi]
आपल्या कुवतीपेक्षा अधिक वेळ कुंभक करू नये.
ऊर्जायी प्राणायाम हिवाळ्यात करावा. उन्हाळ्यात तसेच पित्तप्रधान व्यक्तींसाठी हा हितकर नाही.
निरोगी व्यक्तीने शरीरातील उष्णता व शीतलतेचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सूर्यभेदी प्राणायामाबरोबर तितकेच चंद्रभेदी प्राणायामसुद्धा करावे, त्रिबंध करून हे प्राणायाम केल्यास ते विशेष लाभदायक ठरतात.