Padmasana information in Marathi. [Padmasana Mahiti]
- या आसनात पायांचा आकार पद्म म्हणजेच कमळासारखा बनल्यामुळे यास पद्मासन अथवा कमलासन असे म्हणतात.
इदं पद्मासनं प्रोक्तं सर्वव्याधिविनाशनम् ।
दुर्लभं येन केनापि धीमता लभ्यते भुवि ॥
- ‘अशा प्रकारे सर्व व्याधींना नष्ट करणाऱ्या पद्मासनाचे वर्णन केले आहे. हे दुर्लभ आसन एखाद्या विरळ्या बुद्धीमान पुरुषांलाच प्राप्त होते.’ (हठयोगप्रदीपिका, प्रथमोपदेश)
Padmasana Kase Karava [पद्मासन कसे करावे] :
- Step 1 : अंथरलेल्या आसनावर स्वस्थपणे बसा. रेचक करत करत उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. किंवा पहिल्यांदा डावा पाय व नंतर उजवा पायसुद्धा ठेवू शकता. पायाचे तळवे वरती आणि टाच बेंबीखाली असावी. गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. डोके, मान, छाती, पाठीचा कणा इ. पूर्ण भाग सरळ व ताठ असावा.
- Step 2 : दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत ठेवा. (अंगठा तर्जनीच्या नखास लावून उरलेली तीन बोटे सरळ ठेवल्यास ज्ञानमुद्रा होते.) किंवा डावा हात मांडीवर ठेवा. तळवा वरच्या बाजूस असावा. त्याच्यावर त्याच प्रकारे उजवा हात ठेवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांशी जुळलेली राहतील. दोन्ही हातांची मूठ बांधून गुडघ्यावरसुद्धा ठेऊ शकता.
- Step 3 : रेचक पूर्ण झाल्यानंतर कुंभक करा. प्रारंभी दोन्ही पाय मांडीवर ठेवू न शकल्यास एकच पाय ठेवा. पायाला मुंग्या येत असतील. त्रास होत असेल तरी निराश न होता अभ्यास चालू ठेवा. दर तिसऱ्या दिवसानंतर अवधी एक मिनिटाने वाढवून एक तासापर्यंत पोहोचले पाहिजे.
- Step 4 : दृष्टी नासाग्र किंवा भ्रूमध्यावर स्थिर करा. डोळे बंद, उघडे किंवा अर्धोन्मलीतही ठेवू शकता. शरीर सरळ व स्थिर ठेवावे. दृष्टी एकाग्र करावी.
- Step 5 : भावना करा की मूलाधार चक्रातील लपलेल्या शक्तीचे भांडार उघडत आहे. खालच्या केंद्रातील चेतना तेज व ओज यांच्यात रूपांतरीत होऊन वर येत आहे. किंवा अनाहत चक्रात (हृदयात) चित्त एकाग्र करून भावना करा की हृदयरूपी कमळातून सुगंधाच्या धारा वाहत आहेत. संपूर्ण शरीर या धारानी सुगंधीत होत आहे.
- विशेष : ध्यान आज्ञाचक्र किंवा अनाहत चक्रात असावे. श्वास रेचक, कुंभक, दीर्घ, स्वाभाविक.
Padmasana Che Fayde [Benefits in Marathi]
- प्राणायामाच्या अभ्यासाद्वारे हे आसन केल्याने नाडीतंत्र शुद्ध होऊन आसन सिद्ध होते. विशुद्ध नाडीतंत्र असलेल्या योग्याच्या विशुद्ध शरीरात रोगाची छाया सुद्धा राहू शकत नाही आणि तो स्वेच्छेने शरीराचा त्याग करू शकतो.
- प्राणायामाच्या अभ्यासाद्वारे हे आसन केल्याने नाडीतंत्र शुद्ध होऊन आसन सिद्ध होते. विशुद्ध नाडीतंत्र असलेल्या योग्याच्या विशुद्ध शरीरात रोगाची छाया सुद्धा राहू शकत नाही आणि तो स्वेच्छेने शरीराचा त्याग करू शकतो.
- पद्मासनाचा अभ्यास करणाऱ्या साधकाच्या जीवनात एक विशेष आभा प्रगट होते. या आसनाद्वारे योगी, संत, महापुरूष महान झाले आहेत.
- पद्मासनाच्या अभ्यासाने उत्साहात वाढ होते. स्वभावात प्रसन्नता वाढते. चेहरा तेजस्वी होतो. बुद्धीचा अलौकिक विकास होतो. चित्तामध्ये आनंद-उल्हास राहतो. चिंता, शोक, दुःख, शारीरिक विकार दबतात. कुविचार नष्ट होऊन सुविचार प्रगट होऊ लागतात.
- पद्मासनाच्या अभ्यासाने रजो व तमोगुणांमुळे व्यग्र झालेले चित्त शांत होते. सत्त्वगुणामध्ये अत्यंत वृद्धी होते.
- प्राणायाम, सात्त्विक मिताहार आणि सदाचाराने पद्मासनाचा अभ्यास केल्यास अंतःस्रावी ग्रंथींना विशुद्ध रक्त मिळते. यामुळे कार्यशक्ती वाढून भौतिक आणि आध्यात्मिक विकास जलद होतो.
- बौद्धिक-मानसिक कार्य करणाऱ्यांसाठी, चिंतन-मनन करणाऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी हे आसन खूप लाभदायक आहे.
- चंचल मनास स्थिर करण्यासाठी तसेच वीर्य रक्षणासाठी हे आसन अद्वितीय आहे.
- श्रम आणि कष्टाशिवाय एक तास पद्मासनात बसणाऱ्या माणसाचे मनोबल खूप वाढते.
- भांग, गांजा, चरस, अफीम, दारू, तंबाखू इ. व्यसनांनी ग्रस्त मनुष्य जर या व्यसनांमधून मुक्त होण्याच्या भावनेसह दृढ निश्चयाने पद्मासनाचा अभ्यास करेल तर तो दुर्व्यसनातून सहजगत्या आणि कायमचा सुटू शकतो. चोरी, जुगार, व्यभिचार वा हस्तदोषासारख्या वाईट सवयी लागलेले युवक-युवतीही या आसनाद्वारे त्या सर्व कुसंस्कारांमधून मुक्त होऊ शकतात.
- कुष्ठ, रक्तपित्त, पक्षाघात, मलावरोधाने निर्माण होणारे रोग, क्षय, दमा, फीट येणे, धातुक्षय, कॅन्सर, जंत, त्वचेचे रोग, वात कफ प्रकोप, नपुंसकत्व, वंध्यत्व इ. रोग पद्मासनाच्या अभ्यासाने नष्ट होतात.
- अनिद्रेच्या रोगासाठी हे आसन रामबाण उपाय आहे.
- या आसनाने स्थूलपणा कमी होतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या सुरक्षिततेसाठी हे आसन सर्वोत्तम आहे.
- पद्मासनात बसून अश्विनी मुद्रा करण्याने म्हणजेच गुदद्वाराचे पुन्हा पुन्हा आकुंचन-प्रसरण केल्याने अपानवायू सुषुम्नेत प्रविष्ट होतो. याने कामविकारावर जय प्राप्त होतो.
- गुह्यंद्रियास आतल्या बाजूस खेचल्याने म्हणजेच योनीमुद्रा किंवा वज्रोली केल्याने वीर्य उर्ध्वगामी होते.
- पद्मासनात बसून उड्डीयान बंध, जालंधर बंध तसेच कुंभक करून छाती व पोट फुगवण्याची क्रिया केल्याने वक्षशुद्धी तसेच कंठशुद्धी होते. त्यामुळे खूप भूक लागते, भोजन लवकर पचते, लवकर थकवा येत नाही. स्मरणशक्ती व आत्मबळ वाढते.
- यम-नियमपूर्वक दीर्घकाळ पद्मासनाचा अभ्यास केल्याने उष्णता निर्माण होऊन मूलाधार चक्रात आंदोलने निर्माण होतात. कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची भूमिका तयार होते. जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा साधे दिसणाऱ्या या पद्मासनाचा खरा महिमा कळतो. घेरंड, शांडिल्य तसेच अन्य अनेक ऋषींनी या आसनाचा महीमा गायला आहे. ध्यान लावण्यासाठी हे आसन खूप लाभदायक आहे.
Padmasana Savadhagiri [Precautions in Marathi]
- अशक्त वा रोगी व्यक्तीने जबरदस्तीने पद्मासनात बसू नये. पद्मासन सशक्त व निरोगी व्यक्तीसाठी आहे.