Dhanurasana information in Marathi. [Dhanurasana Mahiti]
- या आसनात शरीराचा आकार धनुष्यासारखा बनतो. एकमेकांना खेचणाऱ्या पायांचा व हातांचा आकार धनुष्याच्या प्रत्यंचेसारखा होतो. म्हणून याला ‘धनुरासन’ म्हणतात.
- ध्यान मणिपूर चक्रात. श्वास खालच्या स्थितीत रेचक व वरील स्थितीत पूरक करावा.
Dhanurasan Kase Karave [ धनुरासन कसे करावे]:
- Step 1 : जमिनीवर अंथरलेल्या कांबळ्यावर पालथे झोपा. दोन्ही पाय एकमेकांशी जुळवून ठेवा.
- Step 2 : आता दोन्ही पाय उचलून गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हात पाठीमागे नेऊन दोन्ही पायांचे घोटे पकडा.
- Step 3 : रेचक करून छाती, डोके व हाताने पकडलेल्या पायांना खेचून हळूहळू वर उचला. शक्य होईल तितके डोके मागील बाजूस नेण्याचा प्रयत्न करा. दृष्टी देखील वर आणि मागील बाजूस असली पाहिजे. हात सरळ व ताठ ठेवा. पायसुद्धा ताठ ठेवा. दोन्ही गुडघे एकाच रेषेत ठेवा. संपूर्ण शरीराचा भार केवळ पोटावर (नाभीवर) राहील. कंबरेपासून वरील शरीर तसेच कंबरेखालील भाग वरच्या बाजूस वाकविलेल्या स्थितीत राहील.
- Step 4 : कुंभक करून याच स्थितीत टिकून रहा.
- Step 5 : त्यानंतर हात सोडून पाय आणि डोके मूळ स्थितीत न्या व पूरक करा.
- विशेष : प्रारंभी पाच सेकंद हे आसन करावे व नंतर हळूहळू वेळ वाढवत तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ या आसनाचा अभ्यास करा. तीन चार वेळा हे आसन केले पाहिजे.
Dhanurasana Che Fayde [Benefits in Marathi]
- धनुरासनाच्या सरावाने :
- मलावरोधाचा त्रास होत नाही.
- धनुरासनाच्या अभ्यासाने पोटाची चरबी कमी होते. गॅस दूर होतो. पोटाचे रोग नाहीसे होतात. वायूरोग नष्ट होतो. पोटाच्या भागात रक्ताचा संचार जास्त प्रमाणात होतो.
- पोटाच्या स्नायूंवर ताण पडल्याने पोटावर खूपच चांगला प्रभाव पडतो. आतड्यांवर खूप दाब पडल्याने पोटाच्या अवयवांवरही दबाव पडतो. त्यामुळे आतड्यांमध्ये पाचकरसाचे प्रमाण वाढते व जठराग्नी प्रदीप्त होतो. भूक वाढते. पचनशक्ती वाढते तसेच पोटात दुखत असल्यास दुखणे दूर होते.
- सरकलेली नाभी आपल्या स्थानी येते. नाभी यथास्थानी आल्यावरही या आसनाचा सराव अवश्य केला पाहिजे. जो या आसनाचा सदैव सराव करीत राहतो त्याची नाभी कधीही सरकत नाही.
- लठ्ठपणा दूर करण्यात या आसनाची मदत होते. लठ्ठ व्यक्तींनी दररोज 10-15 मिनिटे सराव केला पाहिजे.
- पाठीचा कणा लवचीक बनतो आणि वार्धक्य लवकर येत नाही.
- छातीचे दुखणे बंद होते. हृदयाची धडधड दूर होऊन हृदय मजबूत होते.
- गळ्याचे सर्व रोग दूर होऊन आवाज मधुर बनतो. श्वसन क्रिया व्यवस्थीत चालते. मुखाकृती सुंदर बनते. शरीराचे सौंदर्य वाढते. डोळ्यांचे तेज वाढते व सर्व रोग दूर होतात. हाता-पायांचे थरथर कापणे बंद होते.
- धनुरासनात भुजंगासन व शलभासनाचा समावेश होत असल्याने या दोन्ही आसनांचा फायदा या आसनाने होतो. स्त्रीयांसाठी हे आसन खूपच लाभकारक आहे. याने मासिक धर्माचे सर्व विकार, गर्भाशयाचे सर्व रोग दूर होतात.
- रोग दूर करण्यातही हे आसन मुख्य मानले गेले आहे. मधुमेह, गॅस व आतड्यांचा त्रास असणाऱ्या रुग्णांना हे आसन वरदानस्वरूप आहे. ज्यांना कोणताही आजार नसेल आणि जे निरोगी राहू इच्छितात, त्यांनी दररोज या आसनाचा सराव करावा.
- जो दररोज हलासन, मयूरासन व धनुरासन करतो तो कधीही आळशी बनत नाही. तो नेहमी उत्साही, कार्यशील व शक्तिशाली राहतो.
Dhanurasana Savadhagiri [Precautions in Marathi]
- हर्नियाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन मुळीच करू नये.