ऋषींचे कथन आहे की ब्रह्मचर्य ब्रह्म परमात्म्याच्या दर्शनाचे द्वार आहे, ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून येथे आपण ब्रह्मचर्य-पालनाचे काही सोपे नियम व उपायांची चर्चा करूया :
- ब्रह्मचर्य शरीरापेक्षा मनावर विशेष निर्भर आहे. म्हणून मन नियंत्रणात ठेवा आणि स्वत:समोर उच्च आदर्श ठेवा.
- डोळे व कान मनाचे मुख्यमंत्री आहेत. म्हणून अश्लील चित्र व वाईट दृश्य पाहण्यापासून आणि निरर्थक गोष्टी ऐकण्यापासून सावधगिरीने स्वत:ला वाचवा.
- मनाला सदैव काही ना काहीतरी पाहिजे. रिकाम्या वेळी मन बहुधा मलिन होते. म्हणून सत्कर्म करण्यात तत्पर रहा आणि भगवन्नाम-जप करीत रहा.
- ‘जसे अन्न तसे मन’ – ही म्हण अगदी सत्य आहे. गरम मसाले, चटण्या, अधिक गरम भोजन आणि मांस, मासे, अंडी, चहा, कॉफी इत्यादींचे सेवन मुळीच करू नका.
- भोजन पचायला हलके व स्निग्ध असावे. रात्रीचे भोजन झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास अगोदरच केले पाहिजे.
- दूधही एक प्रकारचे भोजन आहे. भोजन आणि दुग्धपानात कमीतकमी तीन तासांचे अंतर असावे.
- वेशभूषेचा प्रभाव तन व मन – दोघांवरही पडतो. म्हणून साधे, स्वच्छ व सुती वस्त्र परिधान करा. खादीचे वस्त्र परिधान केल्यास अति उत्तम सिंथेटिक वस्त्रांचा वापर टाळा. खादीची, सुती तसेच लोकरीची वस्त्रे परिधान केल्याने जीवनशक्तीचे रक्षण होते आणि इतर प्रकारच्या वस्त्रांमुळे जीवनशक्तीचा ऱ्हास होतो.
- कौपीन (लंगोट) घालणे अत्यंत लाभदायक आहे. कधीही सरळ (उताणे) झोपू नका, नेहमी कुशीवरच झोपा. बाजेवर झोपत असाल तर ती ताणून बांधलेली असावी.
- पहाटे लवकर उठा. प्रभातकाळी कधीही झोपून राहू नका. वीर्यपात बहुधा रात्रीच्या अंतिम प्रहरी होतो.
- पानमसाला, गुटखा, सिगरेट, दारू, चरस, अफीम, भांग इ. सर्व मादक पदार्थांच्या सेवनाने धातू क्षीण होतो. म्हणून यांच्यापासून दूर रहा.
- चिकट पदार्थ उदा.- भेंडी, भोकर (एक फळ) इ.चे सेवन केले पाहिजे. ग्रीष्म ऋतूत ब्राह्मी बुटीचे सेवन लाभदायक आहे. भिजत ठेवलेले बेदाणे व खडीसाखरेच्या सरबताबरोबर इसबगोल घेणे हितकर आहे.
- कटिस्नान केले पाहिजे. थंड पाण्याच्या टबात शरीराचा मधला भाग पोटासहित बुडवून टॉवेलने पोटाला रगडणे ही एक अनुभूत चिकित्सा आहे. या अवस्थेत 15-20 मिनिटे बसले पाहिजे. आवश्यकतेनुसार आठवड्यातून एक-दोन वेळा हा प्रयोग करू शकता.
- दररोज रात्री झोपण्यापूर्वी पोटावर थंड पाणी घेणे अत्यंत लाभदायक असते.
- अपचन व मलावरोध टाळा.
- सेंट, लॅव्हेंडर, परफ्यूम्स इ.चा वापर टाळा. इंद्रियांना उत्तेजित करणारी पुस्तके वाचू नका आणि अशा प्रकारचे चित्रपट व नाटकही पाहू नका.
- तुम्ही विवाहित असाल तरीही वेगवेगळ्या बिछान्यावर झोपा.
- दररोज पहाटे व सायंकाळी व्यायाम, योगासने आणि प्राणायाम करण्याचा नियम ठेवा. ➢ ऋषि प्रसाद, मार्च 2007