[तुळशी विवाह] Tulsi Vivah 2023 Vidhi, Muhurat, Katha, Mahiti Marathi

[तुळशी विवाह] Tulsi Vivah 2022 Vidhi, Muhurat, Katha, Mahiti Marathi

तुळशी विवाह

  • दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त तुम्ही लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की ‘माते ! जे आपणास प्रिय आहे तेच आम्हालाही प्रिय होवो’ आणि लक्ष्मी मातेला तर भगवान नारायणच प्रिय आहेत. जेव्हा ते परमात्मा तुमचे प्रिय होतील तेव्हा लक्ष्मी मातासुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहीलच ! तुमच्या तर दोन्ही हाती लाडू !!
  • प्राचीन काळी जालंधर नामक एक महापराक्रमी आणि महाउपद्रवी राक्षस होऊन गेला. त्याला वृंदा नावाची एक अत्यंत सुंदर आणि परम साध्वी पत्नी होती. वृंदाची निष्ठा होती की ‘जेव्हा माझे पातिव्रत्य अटळ आहे तेव्हा माझ्या पतीच्या केसाला कोण धक्का लावू शकेल ?’ झालेही तसेच. जालंधर वृंदाच्या पातिव्रत्य-बलाने अजिंक्य झाला. तो मनमुखी आचरण करून लोकांना त्रास देऊ लागला. यामुळे दैवी वृत्तीचे लोक दु:खी झाले आणि श्रीहरींचा धावा करू लागले.
  • जालंधरने देवलोकावर आक्रमण करून इंद्राशी युद्ध सुरू केले. श्रीविष्णूंना कळून चुकले की जालंधरची ही अजिंक्यता वृंदाच्या पातिव्रत्याचाच प्रभाव आहे. व्रताने निष्ठा येते आणि निष्ठेचा संकल्प जालंधरच्या पाठीशी राहून त्याचे रक्षण करीत आहे. जोपर्यंत वृंदाचे सतीत्व खंडित होत नाही तोपर्यंत हा पापमूर्ती मरणार नाही आणि जोपर्यंत हा मरणार नाही तोपर्यंत समाजाचे दु:ख दूर होणार नाही.
  • भगवंताने आपल्या धारणाशक्तीने जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाकडे गेले. आपला पतीच युद्धाहून परत आला आहे असे समजून तिने श्रीविष्णूंना स्पर्श केला. यामुळे तिचे पातिव्रत्य खंडित झाले आणि तिकडे युद्धात जालंधर मारला गेला. जेव्हा वृंदाला ही गोष्ट समजली तेव्हा तिने श्रीविष्णूंना शाप दिला की “तुम्ही माझ्याशी कपट केले आहे. तुमचे हृदय पाषाणवत आहे, म्हणून जा, तुम्ही पाषाण व्हा.”
  • श्रीविष्णू वृंदाच्या पातिव्रत्याचा आदर करीत म्हणाले : “मी शालीग्रामच्या रूपात पाषाण होईन आणि तुझे हे शरीर, जे तू सोडून देशील, ते नदीच्या रूपात परिवर्तीत होईल. ती नदी ‘गंडकी’ या नावाने सुप्रसिद्ध होईल. तू तुळशी देवीच्या रूपात माझ्या सोबतच राहशील. तुझ्या केसांपासून उत्पन्न तुळशीच्या पानांशिवाय माझी पूजा अपूर्ण मानली जाईल. तुझ्या व्रताचा, तुझ्या निष्ठेचा आदर होईल. वृंदा ! तू जालंधरच्या दुष्कृत्यांचे कवच बनण्याची चूक केली होती. म्हणून जसे काटा काट्याने निघतो, तसेच बहुजनहिताय- बहुजनसुखायसाठी मला हे करावे लागले, कारण जेव्हा सत्य असत्याचा रक्षक बनतो तेव्हा असत्याचा नाश कठीण होतो.
  • वृंदा ! तुझे सतीत्व जालंधरच्या असत्याचे पोषण करीत होते, पापाचे पोषण करीत होते आणि कोणत्याही उपायाने त्याचा मृत्यू होत नव्हता. त्याला मारण्याचा केवळ एकच उपाय होता आणि तो हा की तुझे सतीत्व खंडित व्हावे. तरीही संपूर्ण विश्व तुझ्या सतीत्वाचा आदर करेल. मी माझ्या एका अंशाने शालीग्राम होईन आणि गंडकी नदीकाठी वास्तव्य करीन. माझी पूजा करणारे दरवर्षी आपल्या दोघांचा विवाह करतील. फळस्वरूप त्यांना महापुण्य मिळेल.” भगवंताचे हे वचन ऐकून वृंदा संतुष्ट झाली.
  • तेव्हापासून कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत ‘तुळशी विवाह’ केला जातो.
  • पातिव्रत्य धर्मसुद्धा सत्याच्या प्राप्तीसाठी आहे. सर्व व्रत आणि नियमांचे फळ आहे ईश्वरप्राप्ती, सत्याची प्राप्ती, आत्मरसाची प्राप्ती. आपल्याला एखादा नियम किंवा व्रत योग्य वाटले की ‘हे बरोबर आहे, ठीक आहे’ मग त्यात दृढतेने संलग्न व्हावे, यालाच व्रत म्हणतात. व्रताचे फळ असते निष्ठा. आपली निष्ठा दृढ असेल तर कोणतीही विघ्न-बाधा किंवा समस्या आपल्या संकल्पबळाने दूर होईल.
    – ऋषी प्रसाद, नोव्हेंबर 2004
जीवनात कोणते ना कोणते व्रत असावे, नियम असावा. यामुळे मनोबळ दृढ होईल.

Makar Sankranti Puja Vidhi in Marathi [Uttaryan 2023]

Makar Sankranti Puja Vidhi in Marathi [Uttaryan 2023]

सूर्याच्या आराधना - उपासनेचे पावन पर्व : मकर संक्रांत

  • भारतीय संस्कृतीत दैनिक सूर्यपूजेचा नियम प्राचीन काळापासून चालत आला आहे. प्रभू श्रीरामांद्वारे नित्य सूर्यपूजेचा उल्लेख रामकथेत येतो. श्रीराम सूर्यवंशी होते.
  • सूर्यनारायण मकर संक्रांतीला दरवर्षी धनू राशीचे भ्रमण पूर्ण करून मकर राशीत प्रवेश करतात. या दिवसापासून देवांचा ब्राह्ममुहूर्त आणि उपासनेचा पुण्यकाळ सुरू होतो. या काळालाच परा-अपरा विद्येच्या प्राप्तीचा काळ असेही म्हटले जाते. याला साधनेचा सिद्धिकाळही म्हटले गेले आहे. मकर संक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे – जीवनात सम्यक् क्रांती. या दिवशी आपले चित्त विषय- विकारांपासून हटवून निर्विकारी नारायणात लावण्याचा शुभ संकल्प केला पाहिजे. शरीराला ‘मी’ आणि संसाराला माझे मानण्याची चूक सोडून आत्म्याला ‘मी’ आणि ब्रह्मांडव्यापी परमात्म्याला आपले मानण्याची सम्यक् क्रांती केली पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इ. विकारांपासून स्वतःला वाचविण्यासाठी भगवंताला आर्तभावाने प्रार्थना करावी आणि प्रेमाने भगवंताचे चिंतन करावे. विकारांमध्ये सत्यबुद्धी करू नये. गुरफटून गेलात तरीही सत्यबुद्धी करू नये आणि सावरले तरीही सत्यबुद्धी करू नये. आपल्या सत्यस्वरूपात, साक्षी चैतन्यस्वभावात सत्यबुद्धी करावी. यासाठी सत्संग आणि जीवन्मुक्त महापुरुषांचे सान्निध्य अत्यंत आवश्यक आहे. जीवन्मुक्त महापुरुषच आपल्या क्रांतीला योग्य दिशा व योग्य मार्गदर्शन देऊ शकतात.
  • मकर संक्रांतीच्या दिवशीच कपिल मुनींच्या आश्रमात गंगा मातेचे आगमन झाले होते. भीष्म पितामहांनी सूर्याचे उत्तरायण झाल्यावरच माघ शुक्ल अष्टमीला स्वेच्छेने देहत्याग केला होता. त्यांचे श्राद्धही सूर्याच्या उत्तरायण गतीत झाले होते.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष माहात्म्य आहे. पद्म पुरणानुसार ‘अयन- परिवर्तनाच्या (उत्तरायण व दक्षिणायन) दिवशी, विषुव नामक योग आल्यावर, चंद्र आणि सूर्य ग्रहणात तसेच संक्रांतीच्या शुभ प्रसंगी दिलेले दान अक्षय होते.’ या दिवशी गरिबांना यथायोग्य अन्नदान करावे. सत्साहित्यसुद्धा दान करू शकता आणि काहीच नसले तरी भगवन्नाम-जपाचा गजर करून वातावरण पवित्र जरूर केले पाहिजे….. आणि या सर्वांहून चांगले आहे- आपले काम- क्रोधादी सर्व विकार तसेच आपला अहंकार भगवंताच्या, सद्गुरूंच्या श्रीचरणी अर्पण करून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प कराल तर याहून श्रेष्ठ दुसरे कोणतेही दान असू शकणार नाही. जर स्वतःला सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले तर मग त्यांचे मार्गदर्शन, शक्ती- संप्रेक्षण व परम हितकारी शिस्त तुम्हाला जन्म- मरणाच्या चक्रातून मुक्त करेल.
  • सहस्रांशूच्या सहस्र किरणांचा वेगवेगळा प्रभाव आहे. सूर्याचा पहिला किरण आसुरी संपत्तिमूलक भौतिक उन्नतीचा विधेयक आहे. तर सूर्याचा सातवा किरण भारतात दैवी संपत्तिमूलक आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा देणारा आहे. सातव्या किरणाचा प्रभाव भारतात गंगा-यमुनेच्या मध्य भागात दीर्घकाळ राहतो. या भौगोलिक स्थितीमुळेच हरिद्वार आणि प्रयागमध्ये माघ कुंभमेळा अर्थात् मकर संक्रांतीचा विशेष उत्सव आयोजित केला जातो. तत्त्वदर्शी महर्षींनी पर्व आणि व्रत-विज्ञानाचा विशेष महिमा सांगितला आहे. त्यानुसार व्रतांच्या प्रभावाने जीवाचे अंतःकरण शुद्ध होते. संकल्पशक्ती वाढते तसेच ज्ञानतंतू विकसित होतात. अंतःस्तलात सच्चिदानंद परमात्म्याप्रती श्रद्धा व भक्तिभावाचा संचार होतो. मकर संक्रांत आत्मचेतना विकसित करणारे व्रत- पर्व आहे.

मकर संक्रांत व्रताचा विधी [Makar Sankranti Puja Vidhi in Marathi]

  • पहाटे तिळमिश्रित उटणे लावून तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे.
  • स्नानानंतर आपल्या आराध्यदेवाची पूजा-अर्चना करावी.
  • तांब्यात लाल चंदन, कुंकू, लाल रंगाचे फूल टाकून पूर्वाभिमुख होऊन तीन वेळा सूर्यगायत्री मंत्राचे उच्चारण करून सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे आणि त्याच जागी उभे राहून सात वेळा प्रदक्षिणा घालावी.
  • सूर्य गायत्री मंत्र :

ॐ आदित्याय विद्महे भास्कराय धीमहि । तन्नो भानु: प्रचोदयात् ।

  • मग गायत्री मंत्र व आदित्यह्रदय स्तोत्राचा पाठ करावा.
  • पक्ष्यांना धान्य आणि गाईला गोग्रास, तिळगूळ खाऊ घालावा.
  • पद्म पुराणानुसार ‘जो मनुष्य पवित्र होऊन सूर्यनारायणाचे आदित्य, भास्कर, सूर्य, अर्क, भानू, दिवाकर, सुवर्णरिता, मित्र, पूषा, त्वष्टा, स्वयंभू व तिमिराश – या 12 नामाचे उच्चारण करतो, तो सर्व पाप आणि सर्व व्याधींपासून मुक्त होऊन परम गतीस प्राप्त होतो.’
  • आजपासून तिळातिळाने दिवस वाढू लागतो. म्हणून हे पर्व तीळ संक्रांतीच्या रूपातही साजरे केले जाते, विष्णु धर्मसूत्रात असे म्हटले आहे की पितरांच्या आत्मिक शांतीसाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि सर्व प्रकारच्या कल्याणासाठी तिळाचे सहा प्रयोग पुण्यदायक व फलदायक असतात :
  • तिळमिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे दान, तिळमिश्रित भोजन, तिळमिश्रित अर्घ्य देणे, तिळाची आहुती देणे तसेच तिळमिश्रित उटणे अंगाला लावणे. परंतु या गोष्टीची काळजी घ्यावी की सूर्यास्तानंतर तीळ व तिळाच्या तेलापासून बनविलेले पदार्थ खाणे वर्ज्य आहे.
  • हे पावन पर्व परस्पर स्नेह आणि माधुर्याच्या वृद्धीचा महोत्सव आहे, म्हणून या दिवशी लोक एकमेकांना स्नेहाचे प्रतीक तीळ व माधुर्याचे प्रतीक गूळ अर्थात् तिळगूळ देतात.
  • या मकर संक्रांतीच्या पर्वानिमित्त आपण हा संकल्प करूया की ‘आजपासून आपण आपसातील मतभेद व वैमनस्य विसरून सत्शास्त्र व सद्गुरूंचे ज्ञान आत्मसात करु आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर अग्रेसर होऊन शाश्वत सुख, शाश्वत आनंद मिळवू.’
    – ऋषी प्रसाद, डिसेंबर 2010

2023 Makar Sankranti Wishes, Quotes, Shubhechha in Marathi

2023 Makar Sankranti Wishes, Quotes, Shubhechha in Marathi

Uttarayan Wishes in Marathi

मराठीत उत्तरायणाच्या शुभेच्छा

Makar Sankranti Shubhechha in Marathi

मराठीत मकर संक्रांती शुभेछा

लाभपंचमी | Labh Pancham 2023 Mahiti Marathi, Muhurat

लाभपंचमी | Labh Pancham 2022 Mahiti Marathi, Muhurat

लाभपंचमी : 18 नोव्हेंबर 2023

  • कार्तिक शुक्ल पंचमीला ‘लाभपंचमी’ म्हणतात . हिला ‘ सौभाग्य पंचमी ‘ सुद्धा म्हणतात. जैन लोक हिला ‘ ज्ञान पंचमी ‘ म्हणतात . व्यापारी लोक आपल्या धंद्याचा मुहूर्त वगैरे लाभपंचमीलाच करतात . लाभपंचमीच्या दिवशी धर्मसंमत जो काही उद्योग-धंदा सुरू केला जातो त्यात खूप- खूप समृद्धी मिळते . हे सर्व तर ठीक आहे पण संत- महापुरुषांच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा निश्चय करून भगवद्भक्तीच्या प्रभावाने काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या पाच विकारांचा प्रभाव नष्ट करण्याचा दिवस आहे लाभपंचमी . महापुरुष म्हणतात :

दुनिया से ऐ मानव !
रिश्त-ए-उल्फत (प्रीति) को तोड़ दे।
जिसका है तू सनातन सपूत,
उसीसे नाता जोड़ दे ॥

  • ‘मी भगवंताचा आहे, भगवंत माझे आहेत ‘- अशा प्रकारे थोडे भगवदचिंतन, भगवद्प्रार्थना, भगवद्स्तुती करून सांसारिक आकर्षणांपासून, विकारांपासून स्वतःला वाचविण्याचा संकल्प करा .

(1) लाभपंचमीच्या दिवशी ही पाच अमृतमय वचने ठेवा :

  • पहिली गोष्ट : ‘ भगवंत माझे आहेत, मी भगवंताचा आहे ‘- असे मानल्याने भगवंताप्रती प्रेम जडेल . ‘ शरीर, घर, कुटुंबीय वगैरे जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतरही राहणार नाहीत, परंतु परमात्मा सदैव माझ्या सोबत आहे ‘- असा विचार केल्याने तुम्हाला लाभपंचमीच्या पहिल्या आचमनाद्वारे अमृतपानाचा लाभ मिळेल.
  • दुसरी गोष्ट : आपण भगवंताच्या सृष्टीत राहतो, भगवंताने बनविलेल्या जगात राहतो . तीर्थभूमीत राहिल्याने आपण पुण्य मानतो, मग जेथे आम्ही- तुम्ही राहतो ती भूमी तर भगवंताची आहे ; सूर्य, चंद्र, हवा, श्वास, हृदयाचे ठोके वगैरे सर्वच्या सर्व भगवंताचे आहेत. …तर आपण भगवंताच्या जगात, भगवंताच्या घरात राहतो. मगन निवास, अमथा निवास, गोकुळ निवास हे सर्व निवास वरवरचे आहेत परंतु सर्वच्या सर्व भगवंताच्या निवासातच राहतात . हे सर्वांनी पक्के लक्षात ठेवले पाहिजे . असे केल्याने तुमच्या अंतःकरणात भगवद्धामी राहण्याचा पुण्यभाव जागृत होईल.
  • तिसरी गोष्ट : तुम्ही जे काही खाता ते भगवंताचे स्मरण करून, भगवंताला मानसिक रूपाने नैवेद्य दाखवून खा . यामुळे तुमचे तर पोट भरेल, हृदयही भगवद्भावाने परितृप्त होईल.
  • चौथी गोष्ट : आई-वडिलांची, गरिबाची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, कोणाचीही सेवा कराल तर ‘ हा बिचार आहे… मी याची सेवा करतो… मी नसतो तर याचे काय झाले असते…’ – असा विचार करू नका. भगवंताच्या नात्याने सेवाकार्य करा आणि स्वतःला कर्ता मानू नका.
  • पाचवी गोष्ट : आपल्या तन-मनाला, बुद्धीला विशाल बनवित जा . घर, परिसर, गाव, राज्य, राष्ट्राहूनही पुढे विश्वात आपल्या मतीचा व्याप वाढवित जा (मतीला विश्वव्यापी बनवा) आणि ‘ सर्वांचे मंगल, सर्वांचे हित होवो, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना सुख शांती मिळो, ‘सर्वे भवन्तु सुखिन: …’ अशा प्रकारची भावना करून आपले हृदय विशाल बनवित जा . कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या कल्याणाचा आग्रह सोडून द्या. गावासाठी परिसराचा, राज्यासाठी गावाचा, राष्ट्रासाठी राज्याचा, विश्वासाठी राष्ट्राचा मोह सोडून द्या आणि विश्वेश्वराशी एकाकार होऊन बदलत जाणाऱ्या विश्वात सत्यबुद्धी तसेच त्याचे आकर्षण व मोह सोडून द्या. तेव्हा अशी विशाल मती जगजीत प्रज्ञेची धनी बनेल.
  • मनाच्या सांगण्यानुसार चालण्याने लाभ तर सोडा, हानी अवश्य होईल कारण मन इंद्रिय अनुगामी (इंद्रियांच्या मतानुसार चालणारे) आहे, ते मतीला विषय- सुखाकडे घेऊन जाते . परंतु मतीला मतिश्वराच्या ध्यानाने, स्मरणाने पुष्ट बनवाल तर ती परिणामाचा विचार करेल, मनाच्या वाईट आकर्षणाशी सहमत होणार नाही. यामुळे मनाला विश्रांती मिळेल, मनसुद्धा शुद्ध सात्त्विक होईल आणि मतीला परमात्म्यात प्रतिष्ठित होण्याची संधी मिळेल, परम कल्याण होईल . लाभपंचमीच्या दिवशी हे पाच लाभ आपल्या जीवनात आणा.

(2) लाभपंचमीच्या दुसऱ्या पाच गोष्टी

  • 1. आपल्या जीवनात सत्कर्म करा.
  • 2. आहार शुद्ध ठेवा.
  • 3. मनाला थोडे नियंत्रित करा की इतका वेळ जप करण्यासाठी, ध्यानासाठी बसायचे आहे तर बसायचे आहे, इतकी मिनिटे मौन रहायचे आहे तर रहायचे आहे.
  • 4. शत्रू व मित्राच्या भितीचा प्रसंग आला तर सतत जागृत रहा . मित्र नाराज होऊ नये, शत्रू तर असे करणार नाही ना या भितीला लगेच दूर करा.
  • 5. सत्य आणि असत्यामधील भेद दृढ करा . शरीर मिथ्या आहे . शरीर सत् देखील नाही, असत् देखील नाही . असत् कधीही राहत नाही आणि सत् कधीही मिटत नाही, मिथ्या होऊन- होऊन मिटून जाते . शरीर मिथ्या आहे, मी आत्मा सत्य आहे . सुख- दुःख, मान- अपमान, रोग- आरोग्य सर्व मिथ्या आहे परंतु आत्मा-परमात्मा सत्य आहे . लाभपंचमीच्या दिवशी हे समजून सावध झाले पाहिजे .

(3) पाच कामे करण्यात कधीही उशीर करू नये :

  • 1. धर्माचे कार्य करण्यात कधीही उशीर करू नका.
  • 2. सत्पात्र मिळाला तर दान- पुण्य करण्यात उशीर करू नका.
  • 3. ब्रह्मनिष्ठ संतांचा सत्संग, सेवा इत्यादींमध्ये उशीर करू नका.
  • 4. सत्शास्त्रांचे वाचन, मनन, चिंतन तसेच त्यानुरूप आचरण करण्यात उशीर करू नका.
  • 5. भीती वाटत असेल तर भितीला मिटविण्यात उशीर करू नका . निर्भय नारायणाचे चिंतन करा आणि भीती ज्या कारणाने होते ते कारण दूर करा . जर शत्रू समोर आला असेल, मृत्यूचे भय असेल अथवा शत्रू जीवघेणा हल्ला वगैरे करीत असेल तर त्यापासून वाचण्यात अथवा त्याच्यावर वार करायला घाबरू नका . हे स्कंद पुराणात लिहिलेले आहे….तर विकार, चिंता, पापाचे विचार हे सर्वच शत्रू आहेत, यांना दूर करण्यात उशीर करता कामा नये.

(4) पाच कर्मदोषांपासून वाचले पाहिजे :

  • 1. अविवेकी कर्म करण्यापासून वाचा, यथा- योग्यरित्या समजून मग कार्य करा.
  • 2. अभिमानपूर्वक कर्म करण्यापासून वाचा.
  • 3. आसक्तीने स्वतःला कोठे फसवू नका, कोणाशी संबंध जोडू नका.
  • 4. द्वेषमय व्यवहारापासून वाचा.
  • 5. भयभीत होऊन कार्य करण्याचे टाळा.
  • या पाच दोषांपासून रहित तुमचे कर्मसुद्धा लाभपंचमीच्या दिवशी ‘ पंचामृत ‘ बनतील.

(5) बुद्धीत पाच खूप मोठे सद्गुण आहेत, ते समजून त्यांचा लाभ घेतला पाहिजे.

  • 1. अशुभ वृत्तींचा नाश करण्याची, शुभ वृत्तींचे रक्षण करण्याची ताकद बुद्धीत आहे.
  • 2. चित्ताला एकाग्र करण्याची शक्ती बुद्धीत आहे. श्वासोच्छ्वासाच्या गणतीने, गुरुमूर्ती, ॐ कार अथवा स्वस्तिकच्या चित्रावर त्राटक केल्याने चित्त एकाग्र होते आणि भगवंताचा रसही येतो.
  • 3. कोणतेही कार्य उत्साहाने केले तर त्यात सफलता अवश्य मिळते.
  • 4. अमुक कार्य करायचे आहे की नाही, सत्य- असत्य, चांगले- वाईट, हितकर- अहितकर यांचा निर्णय बुद्धीच करेल, म्हणून बुद्धी स्वच्छ ठेवा.
  • 5. निश्चय करण्याची शक्तीसुद्धा बुद्धीत आहे . म्हणून बुद्धी जितकी पुष्ट बनवाल, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तितकेच उन्नत व्हाल.
  • …तर बुद्धिप्रदाता भगवान सूर्यनारायणांना दररोज अर्घ्य द्या आणि त्यांना प्रार्थना करा की ‘ माझ्या बुद्धीत तुमचा निवास होवो, तुमचा प्रकाश होवो.’ अशा प्रकारे केल्याने तुमच्या बुद्धीत भगवद्सत्तेचा, भगवद्ज्ञानाचा प्रवेश होईल.

(6) लाभपंचमीला भगवद्प्राप्तीचे पाच उपायही समजून घ्या :

  • 1. ‘मी भगवंताचा आहे, भगवंत माझे आहेत . मला याच जन्मात भगवद्प्राप्ती करायची आहे.’ हा भगवद्प्राप्तीचा भाव जितकी मदत करतो, तितका तीव्र लाभ उपवास, व्रत, तीर्थ, यज्ञ इत्यादींनीही होत नाही….आणि मग भगवंताच्या नात्याने सर्वांची सेवा करा.
  • 2. भगवंताच्या श्रीविग्रहाला पाहून प्रार्थना करीत- करीत सद्गदीत झाल्याने हृदयात भगवदाकार वृत्ती बनते.
  • 3. सकाळी झोपेतून उठाल तर एक हात तुमचा आणि एक भगवंताचा मानून बोला : ‘ माझ्या भगवंता ! मी तुझा आहे आणि तू माझा आहेस ना… माझा आहेस ना…. आहेस ना… ?’ असे करीत जरा एकमेकांचा हात दाबा आणि भगवंताशी वार्तालाप करा . पहिल्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, पाचव्या, पंधराव्या दिवशी अंतर्यामी परमात्मा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि आवाज येईल की ‘ हो भाऊ ! तू माझा आहेस. ‘ बस, तुमचे काम फत्ते !
  • 4. गोपिकांप्रमाणे भगवंताचे हृदयात आवाहन, चिंतन करा आणि शबरीप्रमाणे ‘ भगवंत मला मिळतील ‘ अशी दृढ निष्ठा ठेवा.
  • 5. कोणाप्रती आपल्या हृदयात द्वेषाची गाठ बांधू नका : बांधली असेल तर लाभपंचमीचे पाच- पाच अमृतमय उपदेश ऐकून ती गाठ सोडून द्या.
  • ज्याच्याप्रती द्वेष आहे तो तर मिठाई खात असेल, आपण द्वेषबुद्धीने त्याला आठवून आपले हृदय का जाळावे ! विष ज्या बाटलीत असते तिचे तर काही बिघडत नाही पण द्वेष ज्या हृदयात असतो त्या हृदयाचाच सत्यानाश करतो . निःस्वार्थपणे सर्वांच्या कल्याणाची कामना करा आणि सर्वांप्रती भगवंताच्या नात्याने प्रेमभाव ठेवा . जसे आई मुलाला प्रेम करते तर त्याच्या कल्याणाची इच्छा असते, हिताची भावना असते आणि कल्याण करण्याचा अभिमान मनात आणत नाही, असेच आपले हृदय बनवाल तर तुमचे हृदय भगवंताचे प्रेमपात्र बनेल.
  • हृदयात दया ठेवली पाहिजे . आपल्याहून लहान वयाच्या लोकांनी चूक केली तर दयाळू बनून त्यांना समजवा, ज्यामुळे त्यांचे पुण्य वाढेल, त्यांचे ज्ञान वाढेल. जो दुसऱ्यांचे पुण्य, ज्ञान वाढवित हित करतो तो यशस्वी होतो आणि त्याचेही आपोआपच हित होते.
  • लाभपंचमीच्या दिवशी या गोष्टी मनात पक्क्या ठसविल्या पाहिजेत.
  • धन, सत्ता, पद- प्रतिष्ठा मिळणे वास्तविक लाभ नाही . वास्तविक लाभ तर जीवनदात्याची भेट घालून देणाऱ्या सद्गुरूंच्या सत्संगाने जीवन जगण्याची युक्ती मिळवून, त्यानुसार चालून लाभ- हानी, यश- अपयश, विजय- पराजय या सर्वांमध्ये सम राहत आत्मस्वरूपात विश्रांती मिळविण्यात आहे.
    – ऋषी प्रसाद, ऑक्टोबर 2009

Diwali Captions for Instagram in Marathi [Whatsapp, Facebook]

Diwali Captions for Instagram in Marathi [Whatsapp, Facebook]

Diwali Captions for Instagram in Marathi

  • शुभ दिवाळी, मंगलमय दिवाळी, आनंदमय दिवाळी.
  • नूतन दिवाळी आली आहे, दिवा लावा ज्ञानाचा ।
  • धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंतच्या सुंदर पर्वाच्या शृंखलेचे नाव आहे दीपावली !
  • हे प्रकाशमय दिव्यांचे पर्व आपणा सर्वांना मंगलमय हो !
  • दीपावलीचे पर्व प्रकाशाचे, ज्ञानाच्या उपासनेचे पर्व आहे.
  • सदा दिवाळी संताची, आठही प्रहर आनंद… हीच दिवाळी निमित्ताने शुभेच्छा…
  • आत्मज्योत जागृत करण्याचे पर्व : दीपावली
  • पंचपर्वांचा हा दीपोत्सव, साजरा करूया आनंदोत्सव !
  • आली गुरूज्ञानाची दिवाळी…
  • नूतन दिवाळी आली आहे, दिवा लावा ज्ञानाचा । केरकचरा हृदयातून काढा, मद-मोह-मत्सर-कामाचा ।।
  • संपूर्ण विश्वाला आत्मीयतेच्या एका धाग्यात ओवणारा पर्वांचा पुंज : दीपावली
  • प्रज्वलित करूनि ज्ञानदीप, दूर करा अंधकार ।
यस्य ज्ञानमयं तप: …
ज्ञानमय तपात जगा.

Share Now

Diwali Captions for instagram in marathi
  • एकदा अंतर्ज्योत जागृत झाली मग सदैव दिवाळी….
  • चांगली झाली आज दिवाळी आमची साजरी करू गुरुद्वारी आपण दिवाळी
  • आत्मज्योत प्रज्वलीत करण्याचे पर्व – दिवाळी
  • तुमच्या जीवनात असो… नित्य दिवाळी
  • आत्मीक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देते हे पर्व
  • मंगल दिवाळी, मंगल प्रभात, नुतन वर्ष !
  • प्रज्ञा दिवाळी प्रिय पूजा….. अर्थात तुमच्या बुद्धीत आत्मप्रकाश येवो, अशी सात्विक दिवाळी साजरी करा.
  • आंतरिक दिवाळी चांगली समजुन घ्या, साजरी करा, मग प्रत्येक दिवशी दिवाळी, प्रत्येक परिस्थीतील दिवाळी, प्रत्येक क्षणी दिवाळी
  • दिवाळीच्या दिवशी श्रीराम आयोध्येत आले होते, म्हणून आपल्या जीवनातही श्री राम (ज्ञान), सीतामाता (भक्ति) आणि लक्ष्मण (वैराग्य) येवो.
  • हे प्रभु ! अज्ञानरूपी अंधारात अंध झालेल्या विषयांनी आक्रांत माझ्या चित्ताला ज्ञानाचा प्रकाश देऊन कृपा करा.
  • तुमच्या आतली ज्योत एकदा जाग्रत झाली तर दुसऱ्यांची ज्योत जाग्रत करण्यात तुम्हाला असा रस येईल जो तुम्हाला तुमची ज्योत जाग्रत करतानाही आला नसेल.
  • असा ज्ञानाचा दिवा आतमध्ये प्रगट करा आणि प्रसन्न रहा, मधुमय स्वभाव आणि मधुमय विचार पसरवा.

नविन दिवाळी आली आहे,
दिवा लावा ज्ञानाचा !
कचरा काढा हृदयातून,
मद-मोह – मत्सर कामाचा !

Diwali Laxmi Puja Vidhi Marathi [दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे]

Diwali Laxmi Puja Vidhi Marathi [दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे]

दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन ?

  • दिवाळीच्या दिवशी रात्री सरस्वती आणि लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते . तुमच्याकडे धन असेल, खूप धन मिळाले, त्याला मी ‘ लक्ष्मी ‘ मानत नाही . महापुरुष त्याला ‘वित्त’ मानतात . वित्ताद्वारे मोठे बंगले मिळतील, मोठमोठ्या गाड्या मिळतील, लांबलचक प्रशंसा होईल पण अंतरी रस येणार नाही . दिवाळीच्या रात्री सरस्वती देवीची पूजा करतात, जेणेकरून विद्या मिळावी पण ती विद्या फक्त पोट भरण्याची विद्या नाही, ऐहिक विद्येसोबतच तुमच्या चित्तात विनय यावा, तुमच्या जीवनात ब्रह्मविद्या यावी यासाठी सरस्वती देवीची पूजा करायची असते आणि तुमचे वित्त तुम्हाला बांधणारे ठरू नये, तुम्हाला विषय-विलास आणि विकारांमध्ये फरफटत घेऊन जाऊ नये यासाठी लक्ष्मी- पूजन करायचे असते .
  • लक्ष्मी पूजन म्हणजे वित्त महालक्ष्मी बनून यावे . जे वासनांचा वेग वाढविते ते ‘ वित्त ‘ आणि जी वासनांना श्रीहरीच्या चरणी पोहोचविते ती ‘ महालक्ष्मी ‘ ! वित्त असेल तर भांडण घडवून आणेल, अनर्थ सर्जित करेल . लक्ष्मी असेल तर व्यवहारात कामी येईल आणि महालक्ष्मी असेल तर नारायणाशी एक करवून देईल . भारताचे ऋषी म्हणतात की लक्ष्मी- पूजन करा . आम्ही धन किंवा लक्ष्मीचा तिरस्कार करीत नाही पण जे मिळवून लोक असुरांसारखे जीवन जगतात असे वित्त, असे धन, अशी लक्ष्मी नाही तर नारायणाशी मिळवून देईल असे धन, अशी लक्ष्मी, महालक्ष्मी पाहिजे .

दिवाळी लक्ष्मीपूजन कसे करावे

  • दिवाळी लक्ष्मीपूजन ची माहिती : सनातन धर्मात दिवाळीला श्रीसद्गुरू, श्रीगणपती, लक्ष्मीदेवी, सरस्वती देवी व कुबेर या देवी देवतांच्या पूजेचे विधान आहे.
  • वैदिक मान्यतेनुसार दिवाळीला मंत्रोच्चारणासह या पंचदेवांच्या स्मरणाने व पूजेने आंतरिक व बाह्य महालक्ष्मीची अभिवृद्धी होऊन जीवनात सुख-शांतीचा संचार होतो. सर्वसाधारण श्रद्धाळूलाही भावपूर्वक वैदिक विधी-विधानाचा लाभ घेता यावा, यासाठी लक्ष्मीपूजनाचा संक्षिप्त विधी येथे देत आहोत.

दिवाळी लक्ष्मीपूजन विधी [diwali laxmi puja in marathi]

  • दिवाळी लक्ष्मी पूजन घरी कसे करावे : सर्वप्रथम स्वच्छ व पवित्र अशा खोलीत वा देवघरात ईशान्य किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. आपल्या समोर उजव्या बाजूला लाल रंगाचे व डावीकडे पांढऱ्या रंगाचे कापडी आसन अंथरावे. लाल आसनावर गव्हाचे स्वस्तिक बनवावे आणि पांढऱ्या आसनावर तांदळाचे अष्टदल कमळ बनवावे. गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्या समोर उजव्या बाजूला ठेवावे.
ॐ दीपस्थ देवताय नम:
  • या मंत्राच्या उच्चारणासह दिव्याला फुले आणि अक्षता वाहाव्यात.

ॐ गं गणपतये नम:

  • मंत्राचे उच्चारण करीत स्वत:ला व कुटुंबीयांना टिळा लावावा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
  • मंत्राचे उच्चारण करीत सर्वांच्या हाताला कांकण बांधावे. पुन्हा याच मंत्राचे उच्चारण करीत आपल्या शेंडीला गाठ मारावी. (शेंडी नसल्यास मनोमन गाठ मारावी.) मग

ॐ केशवाय नम: स्वाहा
ॐ माधवाय नम: स्वाहा
ॐ नारायणाय नम: स्वाहा

  • या तीन मंत्रांचे उच्चारण करीत तीन आचमन घ्यावे. आणि
ॐ गोविन्दाय नम:
  • मंत्र म्हणत हात धुवावे. आपल्या डाव्या हातात जल घेऊन उजव्या हाताने आपल्या अंगावर व पूजा- सामग्रीवर पुढील मंत्राचे उच्चारण करीत जल शिंपडावे.

ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
य:स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि: ।।

  • आपल्या आसनाखाली एक फूल ठेवून ‘ॐ हाँ पृथिव्यै नम:’ मंत्राचे उच्चारण करीत मंत्राचे उच्चारण करीत भूमीला व आसनाला मनोमन नमस्कार करावा.
  • मलीन वृत्ती आणि विघ्नबाधांपासून रक्षणासाठी आपल्या चोहीकडे थोडे तांदूळ अथवा मोहरीचे दाणे टाकावे.

ॐ अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: ।
ये भूता विघ्न कर्तारस्ते नश्यन्तु शिवाज्ञया ॥

  • अर्थ : ‘कल्याणकारी देवाच्या कृपेने भूमीवरील विध्वंसक मलीन वृत्तींचा नाश होवो.’
  • आता हातात थोडी फुले घेऊन पुढील मंत्रोच्चारणासह आपल्या गुरुदेवांचे स्मरण करावे.

ॐ आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजभावयुक्तम् ।
योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि ॥

  • अर्थ: ‘आनंदस्वरूप, आनंददाता, सदैव प्रसन्नमुख, ज्ञानस्वरूप, निजस्वभावात स्थित, योगिजन व इंद्रादी देवांद्वारे स्तुत्य आणि भवरोगाचे वैद्य असलेल्या श्रीसद्गुरुदेवांना माझा नित्य नमस्कार असो.’
  • गुरुदेवांना मनोमन नमस्कार करून ती फुले थाळीत ठेवावीत. लाल व पांढऱ्या आसनाच्या मधोमध पुष्पासनावर गुरुदेवांची प्रतिमा स्थापित करावी. यानंतर श्रीगणपतीचे पुढीलप्रमाणे मानसिक ध्यान करावे :

ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ: निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

  • अर्थ : ‘कोटी सूर्यांसमान महातेजस्वी, विशालकाय, वक्रतुंड गणराया ! तुझ्या कृपेने माझ्या सर्व कार्यांतील विघ्नांचे निवारण होवो.’
  • श्रीगणपतीची मूर्ती थाळीत ठेवून ‘ॐ गं गणपतये नम:’ मंत्राचे उच्चारण करीत मूर्तीला स्नान घालावे. स्वच्छ वस्त्राने मूर्ती पुसून गव्हाच्या स्वस्तिकावर दुर्वांचे आसन बनवून त्यावर गणरायाला स्थानापन्न करावे.

ॐ गं गणपतये नम:

  • मंत्राचे उच्चारण करीत गणरायाला टिळा लावून फुले, दुर्वा व गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. मग धूप-दीप लावून आरती करावी.
ॐ भूर्भुव: स्व: रिद्धि सिद्धि सहित श्रीमन्महागणाधिपतये नम:
  • मंत्र म्हणत मानसिक नमस्कार करावा. आता श्रीविष्णूंसहित लक्ष्मीमातेचे अशा प्रकारे ध्यान करावे :

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी ।
हरिप्रिये महादेवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते ॥
नमस्तेऽस्तु महामाये सर्वस्यार्तिहरे देवि ।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते ॥
यस्यस्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे ॥

  • अर्थ : ‘हे सिद्धी- बुद्धी प्रदात्री, भुक्ती- मुक्ती दात्री, विष्णुप्रिया महादेवी महालक्ष्मी ! तुला नमस्कार असो. हे सर्वदुःखहारी महादेवी, महामाया ! तुला नमस्कार असो. शंख-चक्र-गदाधारी महालक्ष्मी ! तुला नमस्कार असो. ज्यांच्या स्मरणमात्राने मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो, त्या सर्वसमर्थ श्रीविष्णूंना नमस्कार असो.’
  • लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम : यानंतर थाळीत लक्ष्मीदेवीची मूर्ती किंवा चांदीचे श्रीयंत्र अथवा चांदीचे नाणे ठेवून श्रीनारायणासह लक्ष्मीदेवीचे ध्यान व पुढील मंत्राचे उच्चारण करीत त्यांना स्नान घालावे :

गंगा सरस्वति रेवा पयोषणी नर्मदा जलै: ।
स्नापितोऽसि महादेवी ह्यत: शांतिं प्रयच्छमे ।।

  • दिवाळी लक्ष्मीपूजन मांडणी : मग लक्ष्मीदेवीची मूर्ती अथवा श्रीयंत्र तांदळाच्या अष्टदल कमळावर स्थापित करावे.

श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमलवासिन्यै स्वाहा ।

  • मंत्राचा जप करीत कुंकवाचा टिळा लावावा, लक्ष्मीनारायणाला कांकण बांधावे, हार घालावा, कर्पूर- आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. विड्याच्या पानावर सुपारी, वेलची, लवंग वगैरे ठेवून ते पान लक्ष्मीनारायणास अर्पण करावे. फळे व दक्षिणासुद्धा याच मंत्रोच्चारणासह अर्पण करावी.
  • आता पुढील मंत्राचे उच्चारण करीत क्षमा-याचना करावी.

आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम् ।
पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वरि ॥

  • यानंतर पुढील मंत्राची 1 माळ करावी.

ॐ नमो भाग्यलक्ष्म्यै च विद्महे ।
अष्टलक्ष्म्यै च धीमहि ।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ।

  • आता ओंजळीत जल घेऊन संकल्प करावा की ‘भगवंत व गुरूंची भक्ती लाभावी या उद्देशाने तसेच सत्कर्मांच्या सिद्धीसाठी आम्ही लक्ष्मीनारायणाची पूजा व जप केला आहे, ते सर्व परमात्मचरणी अर्पण करीत आहोत.’ मग आरती करून

ॐ तं नमामि हरिं परम्

  • मंत्राचे तीनदा उच्चारण करावे.
  • जेथे लक्ष्मीपूजन केले जाते, तेथे कलश पूजा अवश्य करावी.

कलश पूजेचा विधी :

  • पाण्याने भरलेल्या तांब्याच्या कलशाला हळदी-कुंकू लावलेले कच्चे सूत बांधून त्यावर पिंपळाची पाच पाने व एक नारळ ठेवावे. पुढील मंत्रोच्चारण करून सर्व तीर्थनद्यांचे आवाहन करावे.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु ॥

  • नंतर श्रीसूर्यनारायणाला प्रार्थना करावी की या कलशाला तीर्थत्व प्रदान करावे :

ब्रह्माण्डो कर तीर्थानि करे स्पृष्टानि ते रवै ।
तेन सत्येन मे देव तीर्थं देहि दिवाकर ॥

  • यानंतर त्या कलशाला चोहीकडून टिळा लावावा. नारळालाही टिळा व अक्षता लावून जमिनीवर कुंकवाचे स्वस्तिक बनवावे. त्यावर कलशाची स्थापना करावी. मग श्रीविष्णूंना प्रार्थना करावी की ‘पाण्याने भरलेल्या कलशाच्या रूपात आपण विद्यमान आहात. आपल्या कृपेने आमच्या कुटुंबात शांती व सात्त्विक लक्ष्मीची वृद्धी होवो.’ मग हातात फुले घेऊन पुढील मंत्रोच्चारणासह सरस्वती मातेचे मानसिक ध्यान करून श्वेत आसनावर अर्पण करावी.

शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम् ।
हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् ॥

  • अर्थ : ‘जी श्वेत वर्णाची आहे, जी ब्रह्मविचाराचे परम तत्त्व आहे, जी संपूर्ण सृष्टीत व्याप्त आहे, जी वीणा व पुस्तकधारिणी आहे, जी अभयदान देऊन अज्ञानांधकाराचा नाश करते, जी हाती स्फटिक माळ धारण करते, जी कमलासनावर विराजमान असून बुद्धिदायी आहे, त्या आद्य परमेश्वरी भगवती सरस्वती मातेला माझा नमस्कार असो. ‘ मग

ॐ कुबेराय नम:

  • मंत्राचे उच्चारण करीत कुबेराचे ध्यान करावे आणि आपल्या दागिन्यांवर, तिजोरीत हळद, दक्षिणा, दुर्वा इ. ठेवावे.
    ॥ ॐ शुभमस्तु ॥
    – लोक कल्याण सेतू, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2005

ॐ जय जय माता पिता… Aarti Lyrics in Marathi

ॐ जय जय माता पिता... Aarti Lyrics in Marathi

Play Audio

ॐ जय जय माता पिता....

ॐ जय जय माता पिता ।
प्रभुजी गुरुजी माता पिता ।
सद्भाव पाहून तुमचा ।
सद्भाव पाहून तुमचा,
झुकतो हा माथा ।
ॐ जय जय माता पिता ।।१।।

ॐ जय जय माता पिता ।
प्रभुजी गुरुजी माता पिता ।
सद्भाव पाहून तुमचा ।
सद्भाव पाहून तुमचा ।
झुकतो हा माथा ।
ॐ जय जय माता पिता ।।२।।

किती कष्ट घेऊन आम्हाला जन्म दिला,
आई आम्हाला वाढविले ।
सुख देती दुःख हरती,
पालन हारी तू….
ॐ जय जय माता पिता ।।३।।

अनुशासीत कर तुम्ही उन्नत आम्हा केले,
पिता तुम्ही जे दिले…
कसे ऋण मी फेडू,
हतबल मी आता…
ॐ जय जय माता पिता ।।४।।

सर्व तीर्थ मै माता,
सर्व देव मै पिता ।
जो कोणी यांना पुजतो,
स्वतः पूज्य होतो ।
ॐ जय जय माता पिता ।।५।।

आई वडिलांची पूजा गणेशांनी ही केली,
श्री गणेशांनी ही केली ।
सर्व प्रथम गणपतींना,
ही पूजले जाते….
ॐ जय जय माता पिता ।।६।।

बलीहरी सद्गुरूंची मार्ग दाखविला,
खरा मार्ग दाखविला ।
मातृ पितृ पूजन कर,
जय जय जय गातो…
ॐ जय माता पिता ।।७।।

माता पीता प्रभु गुरूंची,
आरती जो गातो,
तो संयमी होतो,
भव सागर तरतो ।
ॐ जय माता पिता ।।८।।

नट नट्यांची नकल सोडून,
गुरू सम संयमी होतो ।
गणेशा सम संयमी होतो ।
स्वतः आत्म सुख मिळवतो,
इतरांना देतो….
ॐ जय माता पिता ।।९।।

ॐ जय जय माता पिता,
प्रभु गुरुजी माता पिता ।
सद्भाव पाहून तुमचा,
झुकतो हा माथा….
ॐ जय माता पिता ।।१०।।

Free Download

Aai Baba Aarti Marathi

GuruJin Che Manas Puja कसे करावे : Guru Purnima 2022

मानस पूजा (गुरुपौर्णिमा निम्मित खास)

  • गुरुपौर्णिमा अर्थात गुरूंच्या पूजेचा उत्सव .. परंतु आज सर्व लोक जर गुरूंना स्नान घालू लागले. गंध लावू लागले, हार अर्पण करू लागले तर हे शक्य नाही. परंतू षोडशोपचार पूजेपेक्षाही जास्त फळ देणारी मानसपूजा करण्यापासून तर बंधू ! स्वत: गुरु सुद्धा रोखू शकत नाही. मानसपूजेचा अधिकार सर्वांना आहे.
  • महिमावान सदगुरूंच्या पावन चरणकामलांची षोडशोपचाराणे पूजन केल्याने साधक-शिष्याचे त्वरित शुद्ध आणि उन्नत होते.

मानसपूजा अशा प्रकारे करतात [GuruJin Che Manas Puja कसे करावे]

  • मनातल्या मनात भावना करा की आपण गुरुदेवांच्या श्रीचरणांचे प्रक्षालन करीत आहोत… सप्त तीर्थांच्या जलाने त्यांच्या  पादारविंदांना स्नान घालीत आहोत… अत्यंत आदराने व कृतज्ञतापूर्वक त्यांच्या श्री चरणी दृष्टी ठेवून..  श्रीचरणांना प्रेम करीत त्यांना स्नान घालीत आहेत… त्यांच्या तेजोमय ललाटावर शुद्ध चंदनाचा टिळा लाविता आहोत… अक्षता लावत आहोत… स्वतःच्या हाताने बनवलेली गुलाबाच्या फुलांची सुंदर माळ अर्पण करून आपले हात पवित्र करत आहोत… हात जोडून, मस्तक झुकवून आपला अहंकार त्यांना समर्पित करत आहोत… पाच कर्मेंद्रियांच्या पाच ज्ञानेंद्रियांच्या व अकराव्या मनाच्या क्रिया गुरुदेवांच्या श्रीचरणी समर्पित करीत आहोत…

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्याऽऽत्मना वा प्रकृतेः स्वभावात् ।
करोमि यद् यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ।।

  • ‘काया, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी किंवा प्रकृतीच्या स्वभावाद्वारे जे जे करतो ते सर्व समर्पित करतो. आमची जी काही कारणे आहेत, हे गुरुदेव! ही सर्व आपल्या श्रीचरणी समर्पित आहेत. आमच्या कर्तेपणाचा भाव, भक्तीपणाचा भाव आपल्या श्रीचरणी समर्पित आहे.’
  • अशाप्रकारे ब्रह्मवेत्ता सद्गुरूंची कृपा, ज्ञान, आत्मशांती भरून त्यांच्या अमृतवचनांवर दृढ राहून अंतर्मुख करत जा….. आनंदमय होत जा….. ॐ आनंद ! ॐ आनंद !! ॐ आनंद !!!
  • अशाप्रकारे प्रत्येक शिष्य मनोमन आपल्या दिव्य भावनांनुसार आपल्या सद्गुरूदेवांची पूजा करून गुरुपौर्णिमेचा पावन उत्सव साजरा करू शकतो. करोडो जन्मांमधील आई-वडील, मित्र-नातेवाईक जे देऊ शकले नाहीत, ते सद्गुरु हसत हसत देऊन टाकतात.
  • हे गुरुपौर्णिमा ! हे व्यासपौर्णिमा! तू कृपा कर… गुरुदेवांशी माझा श्रद्धेचा धागा तुटू नये… हे गुरुदेव ! मी प्रार्थना करतो की जोपर्यंत जिवंत आहे, आपल्या श्रीचरणी माझी श्रद्धा टिकून रहावी.
  • वह भक्त ही क्या जो तुमसे मिलने की दुआ न करे  ?
    हे गुरुवर !

भूल प्रभु को जिंदा रहूँ कभी ये खुदा न करे !!
लगाया जो रंग भक्ति का उसे छूटने न देना ।
गुरु तेरी याद का दामन कभी छूटने न देना…
हर साँस में तुम और तुम्हारा नाम रहे प्रीति की यह डोरी कभी टूटने न देना….,
श्रद्धा की यह डोरी कभी टूटने न देना ।
बढ़ते रहें कदम सदा तेरे ही इशारे पर, गुरुदेव ! तेरी कृपा का सहारा छूटने न देना ।
सच्चे बनें और तरक्की करें हम, नसीबा हमारा अब रूठने न देना !!!
देती है धोखा और भुलाती है दुनिया, भक्ति को अब हमसे लुटने न देना ।
प्रेम का यह रंग हमें रहे सदा याद, दूर हों हम तुमसे यह कभी घटने न देना ?
बड़ी मुश्किल से भरकर रखी है करुणा तुम्हारी..
बड़ी मुश्किल से थाम कर रखी है श्रद्धा-भक्ति तुम्हारी…
कृपा का यह पत्र कभी फूटने न देना ।
लगाया जो रंग भक्ति का उसे छूटने न देना, प्रभु प्रीति की यह डोर कभी टूटने न देना !!

  • हे गुरुदेव ! आज गुरुपौर्णिमेच्या पावन उत्सवानिमित्त आपल्या श्रीचरणी अनंत कोटी वंदन…. आपण ज्या पदात विश्रांती घेत आहात, आम्हीदेखील त्याच पदात विश्रांती घेण्यास योग्य बनावे…. आता आत्मा-परमात्म्याच्या वियोगाचे क्षण जास्त राहू नये… ईश्वराच्या कृपेने ईश्वराशी आमचे प्रेम व्हावे… प्रभुच्या कृपेने प्रभुच्या नात्याने गुरू-शिष्याचे नाते टिकून रहावे…- ऋषि प्रसाद, जुलै 2003

Guru Paduka Pujan in Marathi [गुरु चरणकमलों का माहात्म्य]

Guru Paduka Pujan in Marathi
    ॥ श्री सदगुरु परमात्मने नम: ॥
  • सर्व हात जोडून प्रार्थना करतील –
    गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर: ।
    गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।।
  • पूर्ण प्रार्थना वाचण्यासाठी – Click Here

श्री सद्गुरूदेव के चरणकमलों का माहात्म्य मराठी [Guru Paduka Pujan in Marathi]

सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजम्‌ ।
वेदान्तार्थप्रवक्तािरं तस्मात्संपूजयेद्‌ गुरुम्‌ ॥

गुरूंचे चरणकमल हे सर्व श्रुतिरूप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित असे आहेत आणि वेदान्ताच्या अर्थांचे वक्ते आहेत. म्हणून श्री गुरुदेवांची उपासना करावी.

देही ब्रह्म भवेद्यस्मात्‌ त्वत्कृपार्थ वदामि तत्‌ ।
सर्वपापविशुद्धात्मा श्रीगुरो: पादसेवनात्‌ ॥

ज्या गुरुदेवांच्या चरणांच्या आश्रयाने मनुष्य सर्व पापांपासून शुद्ध आत्मा बनतो आणि ब्रह्म होतो, मी तुम्हाला त्यांची कृपा मिळावी म्हणून हे सांगतो.

शोषणं पापपंकस्य दीपनं ज्ञानतेजस: ।
गुरो: पादोदकं सम्यक्‌ संसारार्णवतारकम्‌ ॥

श्री गुरुदेव यांचे चरणामृत हे पापरूप चिखलाचे संपूर्ण शोषक, ज्ञानतेजाला प्रज्वलित करणारे आणि संसारसागराचे संपूर्ण तारक आहे.

अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारकम्‌ ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ गुरुपादोदकं पिबेत्‌ ॥

अज्ञानाचे मूळ काढून टाकणारे, अनेक जन्मांचे कर्म दूर करणारे, ज्ञान आणि वैराग्य सिद्ध करणारे श्री गुरुदेव यांच्या चरणामृताचे सेवन करावे.

काशीक्षेत्रं निवासश्च जाह्नवी चरणोदकम्‌ ।
गुरुविश्वेश्वर: साक्षात्‌ तारकं ब्रह्मनिश्चय: ॥

गुरुदेव यांचे वास्तव्य म्हणजे काशी क्षेत्र, गंगा नदी म्हणजे श्री गुरुदेवांचे चरणामृत आहेत. गुरुदेव भगवान विश्वनाथ आहेत आणि अर्थातच साक्षात तारक ब्रह्म आहेत.

गुरुसेवा गया प्रोक्ता देह: स्यादक्षयो वट:।
तत्पादं विष्णुपादं स्यात्‌ तत्र दत्तमनस्ततम्‌ ॥

गुरुदेवांची केवळ सेवा हीच तीर्थराज गया आहे. गुरुदेव यांचे शरीर हे अक्षय वटवृक्ष आहे. गुरुदेवांचे श्रीचरण म्हणजे भगवान विष्णूचे श्रीचरण. तिथे तल्लीन झालेले मन परस्पर तदाकार होते.

सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानफलं तु यत्‌ ।
गुरुपादपयोबिन्दो: सहस्रांशेन तत्फलम्‌ ॥

साता-समुद्रापार असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून प्राप्त झालेले पुण्य म्हणजे श्री गुरुदेवांच्या चरणामृतातील एका थेंबाचा एक हजारवा भाग आहे.

दृश्यविस्मृतिपर्यन्तं कुर्याद्‌ गुरुपदार्चनम्‌ ।
तादृशस्यैव कैवल्यं न च तद्व्यतिरेकिण: ॥

जोपर्यंत दृष्टीला दिसणाऱ्या प्रपंचाची विस्मृती होत नाही तोपर्यंत गुरुदेवांच्या पवित्र चरणाची पूजा केली पाहिजे. केवळ असे करणाराच कैवल्यपद मिळवितो, जो उलट करतो त्याला मिळत नाही.

पादुकासनशय्यादि गुरुणा यदभीष्टितम् ।
नमस्कुर्वीत तत्सर्वं पादाभ्यां न स्पृशेत् क्वचित् ।।

पादुका, आसन, पलंग वगैरे जे काही गुरुदेवांच्या उपयोगात येते त्या सर्वांना नमस्कार केला पाहिजे आणि त्यांना पायाने कधीही स्पर्श करु नये.

विजानन्ति महावाक्यं गुरोश्चरणसेवया ।
ते वै संन्यासिनः प्रोक्ता इतरे वेषधारिणः ॥

जे लोक गुरुदेवांच्या चरणी सेवा करून महावाक्याचा अर्थ समजतात तेच खरे संन्यासी असतात, इतर फक्त वेषधारी असतात.

चार्वाकवैष्णवमते सुखं प्राभाकरे न हि ।
गुरोः पादान्तिके यद्वत्सुखं वेदान्तसम्मतम् ॥

गुरुदेवांच्या चरणी जो वेदांत-निर्दिष्ट आनंद आहे तो चार्वाक मतांमध्ये किंवा वैष्णव मतांमध्ये किंवा प्रभाकर (सांख्य) मतांमध्ये नाही.

गुरुभावः परं तीर्थमन्यतीर्थ निरर्थकम् ।
सर्वतीर्थमयं देवि श्रीगुरोश्चरणाम्बुजम् ॥

गुरु-भक्ती ही सर्वोत्तम तीर्थ आहे. इतर तीर्थक्षेत्रे निरर्थक आहेत. हे देवी! गुरुदेवांचे चरणकमल सर्वव्यापी आहेत.

सर्वतीर्थावगाहस्य संप्राप्नोति फलं नरः ।
गुरोः पादोदकं पीत्वा शेषं शिरसि धारयन् ।।

श्री सदगुरुंचे चरणामृत प्राशन केल्याने आणि मस्तकावर धारण केल्याने सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे फळ प्राप्त होते.

गुरुपादोदकं पानं गुरोरुच्छिष्टभोजनम् ।
गुरुमूर्तेः सदा ध्यानं गुरोनाम्नः सदा जपः ।।

गुरुदेवांचे चरणामृत प्यावे, गुरुदेवांच्या अन्नातून उरलेले अन्न खावे, गुरुदेवांच्या मूर्तीचे चिंतन करावे आणि गुरूंच्या नावाचा जप करावा.

यस्य प्रसादादहमेव सर्व मय्येव सर्व परिकल्पितं च ।
इत्थ विजानामि सदात्मरूपं तस्यांधिपा प्रणतोऽस्मि नित्यम् ।।

मी सर्व आहे, माझ्यामध्ये सर्व काही कल्पित आहे, असे ज्ञान ज्यांच्या कृपेने झाले आहे अश्या आत्मस्वरूप श्री गुरुदेवांच्या चरण-कमलांना मी नित्य नमस्कार करतो. 

आकल्पजन्मकोटीनां यशवततपः क्रियाः ।
ताः सर्वाः सफला देवि गुरुसन्तोषमात्रतः ॥

हे देवी ! युगांपासून, लाखो जन्मोजन्मी केलेले यज्ञ, उपवास, तपस्या आणि षोडशोपचार, हे सर्व केवळ गुरुदेवांच्या प्रसन्नतेने यशस्वी होतात.

मनोमन अशी भावना करा की आपण गुरुदेवांचे चरण धूत आहोत...

  • सप्ततीर्थांच्या जलाने त्यांच्या चरणांचा अभिषेक  करीत आहोत. त्या चरणांचे दर्शन करत, मोठ्या आदर आणि कृतज्ञतेने आपण त्यांना प्रेमाने स्नान घालत आहोत.
  • त्यांच्या तेजस्वी कपाळावर शुद्ध चंदनाचा टिळा लावत आहोत.
  • अक्षता वाहत आहोत.
  • आपल्या स्वत: च्या हातांनी बनवलेल्या सुंदर गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करून, आपण आपले हात पवित्र करीत आहोत.
  • हात जोडून, ​​आपले डोके टेकवत, आपण आपला अहंकार त्यांना समर्पित करीत आहोत. गुरुदेवांच्या चरणी आपण पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि अकरावे मन यांच्या कृती समर्पित करत आहोत.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्याऽऽत्मना वा प्रकृतेः स्वभावात् ।
करोमि यद् यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ।।

  • शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांसह, बुद्धीने किंवा नैसर्गिक स्वभावाने जे काही करतो ते समर्पित करत आहोत. हे गुरुदेव, आमचे जे कर्म आहेत ते सर्व तुमच्या चरणी समर्पित आहेत. आमची भोगण्याची भावना, आमची उपभोगण्याची भावना आपल्या चरणी समर्पित आहे. अशा प्रकारे, सद्गुरू परमात्म्याच्या कृपेने, ज्ञानाने आणि आत्म-शांतीने तुमचे अंतःकरण भरुन त्यांच्या अमृत वचनांवर दृढ राहून अंतर्मुख होत जा, आनंदी होत जा …
  • ॐ आनंद ! ॐ आनंद ! ॐ आनंद !

Mala Puja कसे करावे – Vidhi, Mantra in Marathi

Mala Puja कसे करावे – Vidhi, Mantra in Marathi

Play Audio Mp3 Purusha Suktam

मंत्र सिद्धिसाठी अचूक उपाय :- Jap Mala Puja in Marthi

शास्त्रों के अनुसार जपमाला जाग्रत होती है, यानी वह जड़ नहीं, चेतन होती है । माना जाता है कि देव शक्तियों के ध्यान के साथ हाथ, अंगूठे या उंगलियों के अलग-अलग भागों से गुजरते माला के दाने आत्मा ब्रम्ह को जागृत करते हैं । इन स्थानों से ‘दैवीय उर्जा’ मन व शरीर में प्रवाहित होती है । इसलिए यह भी देवस्वरूप है, जिससे मिलनेवाली शक्ति या ऊर्जा अनेक दुखों का नाश करती है ।

यही कारण है कि मंत्रजप के पहले जपमाला की भी विशेष मंत्र से स्तुति एवं पूजा करने का विधान शास्त्रों में बताया गया है । आज पूज्य ऋषिवर सद्गुरुदेव संत श्री आशारामजी की प्रेरणा एवं कृपा से हम सबको शास्त्रीय पद्धति से विधिवत माला पूजन एवं स्तुति-प्रार्थना का महापुण्यमय अवसर प्राप्त हुआ है, उसका लाभ लें ।

पूजेसाठी आवश्यक साहित्य [Mala Pooja Samigri]

  • थाली : 2 (एक माला पूजन करण्यासाठी, दुसरी सामान ठेवण्यासाठी)
  • वाटी, चमचा : 2-2 (स्वतःच्या वापरासाठी आणि पूजेसाठी)
  • पूजेच्या ताटामध्ये पिंपळाची 10 पाने, गंगाजल, पंचगव्य, चंदन, कुंकू, फुले, तुळशीची पाने, कलावा (मौली) (लाल धागा), धूपबत्ती, कापूर, काडेपेटी (माचिस), दिवा, वाती (तेलात भिजलेल्या), अक्षता.

Mala Pujan कसे करावे ?

  • पूजाच्या ताटामध्ये मध्यभागी पिंपळाचे एक पान ठेवावे आणि इतर आठ आजूबाजूला अशा प्रकारे ठेवावेत कि ‘अष्टदल-कमल’ चा ‘आकार’ बनेल.
  • मधल्या पानावर आपली जपमाला, करमाळा आणि घालणारी माला ठेवा.
  • पिंपळ आणि तुळशीची पाने रविवारी तोडू नयेत, म्हणून एक दिवस अगोदरच तोडून ठेवावीत.

Mala Puja Vidhi in Marathi

Mala Puja Mantra


ॐ कार चे गुंजन :
  • सर्वानी 7 वेळा ‘हरि ओम’ गुंजन करावे.

ॐ गं गणपतये नमः ।
ॐ श्री गुरुभ्यो नमः ।
ॐ श्री सरस्वत्यै नमः ।

ऐं ह्रीं अक्षमालिकायै नमः ।

आचमन :

  • पुढील मंत्र म्हणत तीनदा आचमन करा.

ॐ केशवाय नमः ।
ॐ नारायणाय नमः ।
ॐ माधवाय नमः ।
ॐ हृषिकेशाय नमः ।
(हे मंत्र उच्चारताना हात धुवा.)

पवित्रता :

  • अंतर्गत आणि बाह्य शुध्दीकरणाची भावना करत डाव्या हातात पाणी घ्या आणि आपल्या शरीरावर उजव्या हाताने शिंपडा.

ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोsपि वा ।
य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बहायाभ्यंतर शुचि:।।

टिळा (तिलक) :

  • सर्व लोकांना टिळा लावा.

ॐ गं गणपतये नम: ।
ॐ चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् ।
आपदां हरते नित्यं लक्ष्मीः तिष्ठति सर्वदा ।।

रक्षासूत्र (मौली) बंधन :

  • हाताला मौली (लाल धागा) बांधा.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वां प्रतिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

संकल्प :

  • हातात अक्षता, फुले व पाणी घेऊन सर्व जण संकल्प करा.

‘‘हे माले ! आज आम्ही रविवारी सप्तमीच्या (ज्या तिथिला करत आहोत ती तिथि) पवित्र दिवशी तुमची पूजा करीत आहोत. या पूजेच्या प्रभावाने, आम्ही तुझ्याद्वारे जो जप करू, त्याचे फळ अनेक पटीने वाढू दे. आम्हा सर्वांना साधनेमध्ये यश मिळू दे आणि ईश्वर प्राप्तीच्या अंतिम ध्येयाकडे जलद वाटचाल करण्यामध्ये आम्हाला सफलता मिळू देत. हे माले ! आमचे शरीर निरोगी राहावे, मन आनंदित राहावे, बुद्धीमध्ये बुद्धीदाताचा प्रसाद प्रकट होवो आणि आमचा आत्मविकास होवो. आम्हा सर्वांना गुरुज्ञानाने स्वतःचे मुक्तात्मा, महानात्मा स्वरूपाचे ज्ञान प्राप्त व्हावे.

हे माते ! ‘बापूजी तुरूंगातून मुक्त व्हावेत’ या उद्देशाने आम्ही तुझ्याद्वारे ‘ॐ ॐ ॐ बापूजी जल्दी बाहर आयें’ या मंत्राचा 5 माला जप करत आहोत.आपण आम्हाला या उद्देशामध्ये लवकरात लवकर यश द्यावे.

(हा संकल्प थोडा-थोडा म्हणा आणि सर्वांना तुमच्या मागे म्हणायला लावा.)

गुरु-स्मरण :

  • हाथ जोडून सर्वांनी प्रार्थना करूया –

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुर्साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

संपूर्ण प्रार्थना वाचण्याकरिता :-

श्री गणेशाचे स्मरण :

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

माला स्नान :

  • माळेला स्नान घालण्यासाठी माळेवर पाणी टाका.

ॐ गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदे सिंधु कावेरी जलेsस्मिन् सन्निधिं कुरु ॥

ऐं ह्रीं अक्षमालिकायै नमः स्नानं समर्पयामि ।

पंचगव्य स्नान :

  • आता पंचगव्याने माळेला स्नान घाला.

ऐं ह्रीं अक्षमालिकायै नमः पंचगव्य स्नानं समर्पयामि ।

शुद्ध स्नान :

  • माळेला पुन्हा पवित्र पाण्याने स्नान घाला.
ऐं ह्रीं अक्षमालिकायै नम: शुद्धोदक स्नानं समर्पयामि । (पवित्र पाण्याने धुतल्यानंतर माळ,दुसर्‍या प्लेटमध्ये (सामग्रीची थाळी) पिंपळाच्या पानावर ठेवा.)

गंध :

  • माळेला चंदन व कुंकू लावा.
ऐं ह्रीं अक्षमालिकायै नमः गंधं समर्पयामि ।

फुले :

  • सुवासिक फुले अर्पण करा.
ऐं ह्रीं अक्षमालिकायै नम: गंधं समर्पयामि ।

तुळस :

  • तुळशीची पाने अर्पण करा.

ऐं ह्रीं अक्षमालिकायै नम: तुलसीदलं समर्पयामि ।
तुलसी हेमरूपांच रत्नरूपां च मंजरिं ।
भवमोक्षपदा रम्यामर्पयामि हरिप्रियाम् ।।

अक्षता :

  • अक्षता वाहा.
ऐं ह्रीं अक्षमालिकायै नमः अक्षतान् समर्पयामि ।

धूप :

  • धूप दाखवा.
ऐं ह्रीं अक्षमालिकायै नम: धूपं आघ्रापयामि ।

इष्ट देव प्रतिष्ठा :

  • हातामध्ये फुले घेऊन हात जोडा. मालेमध्ये इष्ट देवाची भावना करून प्रार्थना करा आणि पुष्प अर्पण करा.

अखण्डानन्दबोधाय शिष्यसंतापहारिणे ।
सच्चिदानन्दरूपाय तस्मै श्रीगुरवे नमः ॥
तापत्रयाग्नितप्तानां अशांतप्राणीनां भुवि ।
गुरुरेव परा गंगा तस्मै श्रीगुरवे नमः ॥

प्रार्थना :

  • हातामध्ये फुले घेऊन माळेला प्रार्थना करा आणि फूल अर्पण करा.

माले माले महामाले सर्वतत्त्व स्वरूपिणी ।
चतुर्वर्गस्त्वयि न्यस्ततस्मान्मे सिद्धिदा भव ॥
ॐ त्वं माले सर्वदेवानां सर्वसिद्धिप्रदा मता ।
तेन सत्येन मे सिद्धिं देहि मातर्नमोऽस्तु ते ॥
त्वं माले सर्वदेवानां प्रीतिदा शुभदा भव ।
शिवं कुरुष्व मे भद्रे यशो वीर्यं च सर्वदा ।।

‘हे माले ! हे महामाले !! आपण सर्वातत्व स्वरूप आहात. तुमच्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – हे चारही पुरुषार्थ समायोजित आहेत. म्हणूनच,तुम्ही मला त्यांची सिद्धी प्रदान करणाऱ्या असावे. हे माले ! आपल्याला सर्व देवतांना समस्त सिद्धी प्रदान करणारे मानले जाते. म्हणूनच, मला सत्यस्वरूप परमात्म्याची प्राप्ती होईल अशी सिद्धी प्रदान करा. हे माते ! मी तुला नमन करतो. हे माते ! तुम्ही मला सर्व देवांचा आणि परात्पर देवाची प्रसन्नता प्रदान करणाऱ्या व्हा, शुभ फळ देणाऱ्या व्हा. हे भद्रे! तू नेहमी मला सत्कीर्ती आणि शक्ती दे आणि माझे कल्याण कर.’

  • अशा प्रकारे मालाची पूजा केल्यास त्यात ईश्वर-चेतनेचा उदय होतो.

जप :

यानंतर, प्रत्येकजण ‘ॐ ॐ ॐ बापूजी जल्दी बाहर आयें ।’ ह्या मंत्राची 1 माळ जप करेल. (हळू आवाजात ध्यानाचे संगीत वाजवू शकता.)

माळ समर्पण :

जप केल्यानंतर माळेला धरुन गुरुदेवांना घालत आहोत अशी भावना करत आपल्या गळ्यात घालावी.

आरती :

  • दीप प्रज्वलित करुन आरती करा.

ज्योत से ज्योत जगाओ…. (पूर्ण आरती करा.)

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारम् भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ।।

प्रार्थना :

साधक मांगे मांगना….

  • जगाच्या कल्याणासाठी हात जोडून प्रार्थना करा :

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुखभाग्भवेत् ।।
दुर्जनः सज्जनो भूयात् सज्जनः शांतिमाप्नुयात् ।
शांतो मुच्येत बंधेभ्यो मुक्तः चान्यान विमोच्येत् ॥

क्षमा प्रार्थना :

  • “हात जोडून, प्रार्थना करावी की या नियमात, उपासना करण्यात आपण अनवधानाने चूक केली असेल तर, हे देवा ! आम्हाला माफ करा.”

ॐ आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम् ।
पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ॥
ॐ मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।

जपघोष :

    ‘तं नमामि हरिं परम् ।’
  • तीन वेळा बोला…

मंत्र सिद्धि च्या सम्पूर्ण माहिती… माला पूजन कशी करावी?