Papankusha Ekadashi Vrat Katha, Mahatva in Marathi: 25 Oct 2023

Papankusha Ekadashi Vrat Katha, Mahatva in Marathi: 6 Oct 2022

Play Audio Mp3

Papankusha Ekadashi 2022 Date

  • एकादशी व्रत : गुरुवार, 6 ऑक्टोबर 2022 (उपवास)
  • एकादशी तिथी आरंभ : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 ला दुपारी 12:00 वाजता पासून
  • एकादशी तिथी समाप्त : गुरुवार, 5 ऑक्टोबर 2022 ला रात्री 9:40 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी

Papankusha Ekadashi Vrat Katha in Marathi

  • धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : मधुसूदन ! आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते ? तिचा विधी व माहात्म्य सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
  • भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ‘पापांकुशा’ नावाने प्रसिद्ध आहे. ती सर्व पापांचे हरण करणारी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी आणि आरोग्य, सुंदर स्त्री, धन व मित्र देणारी आहे. जरी इतर काही कारणास्तव मनुष्याने केवळ या एकादशीला उपवास केला तरी त्याला कधी यमयातना भोगाव्या लागत नाहीत.
  • राजन् ! एकादशीला उपवास आणि रात्री जागरण करणारे मनुष्य सहजच दिव्यरूपधारी, चतुर्भुज, गरुडध्वजेने युक्त, पुष्पहारांनी सुशोभित व पीतांबरधारी होऊन वैकुंठात जातात. राजेंद्र ! असे पुरुष मातृपक्ष, पितृपक्ष व पत्नीपक्षाच्या दहा-दहा पिढ्यांचा उद्धार करतात.
    या एकादशीला सर्व मनोरथांच्या प्राप्तीसाठी मज वासुदेवाची पूजा करावी. जितेंद्रिय मुनी चिरकाळपर्यंत कठोर तपश्चर्या करून जे फळ प्राप्त करतो, तेच फळ या दिवशी भगवान गरुडध्वजाला नमस्कार केल्याने मिळते.
  • जो पुरुष या दिवशी सुवर्ण, तीळ, भूमी, गाय, अन्न, जल, जोडे व छत्रीचे दान करतो, त्याला कधीही यमराज दिसत नाहीत. नृपश्रेष्ठ ! दरिद्री पुरुषाने स्नान, जप-ध्यान वगैरे केल्यानंतर आपल्या कुवतीनुसार होम-हवन व दान-धर्म वगैरे करून आपला प्रत्येक दिवस सार्थक करावा.
  • जे होम, स्नान, जप, ध्यान व यज्ञ इ. पुण्यकर्म करणारे आहेत, त्यांना भयंकर यमयातना भोगाव्या लागत नाहीत. इहलोकी जे लोक दीर्घायुषी, धनाढ्य, कुलीन व निरोगी दिसून येतात, ते पूर्वीचे पुण्यात्मा आहेत. पुण्यवान पुरुषांची हीच लक्षणे आहेत. याविषयी अधिक बोलण्यात काय लाभ ! मनुष्य दुष्कर्मांमुळेच दुर्गतीस प्राप्त होतो आणि सत्कर्मांमुळे स्वर्गात जातो.
  • राजन् ! तुम्ही मला जो प्रश्न विचारला होता त्यानुसार ‘पापांकुशा’ एकादशीच्या माहात्म्याचे मी वर्णन केले. आता आणखी काय श्रवण करायचे आहे ?

Papankusha Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi

गुरुवार, 26 मे 2022

द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

एकादशी तिथी आरंभ : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 ला दुपारी 12:00 वाजता पासून गुरुवार, 5 ऑक्टोबर 2022 ला रात्री 9:40 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी

पापांकुशा एकादशी व्रताची विधी जाणून घ्या

Papankusha Ekadashi Mahatva in Marathi [पापांकुशा एकादशीचे विशेष महत्त्व आहे]

Indira Ekadashi Vrat Katha, Mahatva in Marathi ​: 10 Oct 2023

Indira Ekadashi Vrat Katha, Mahatva in Marathi ​: 21 Sept 2022

Play Audio Mp3

Indira Ekadashi 2023 Date

  • मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023

Indira Ekadashi Vrat Katha in Marathi

  • धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : हे मधुसूदन ! भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
  • भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘इंदिरा’ एकादशी येते. तिच्या व्रताच्या प्रभावाने महापातकांचा नाश होतो. ही एकादशी अधम योनीत पडलेल्या पितरांनाही सद्गती देणारी आहे.
  • राजन् ! प्राचीन काळातील गोष्ट आहे. सत्ययुगात इंद्रसेन नामक एक प्रसिद्ध राजकुमार होऊन गेला. माहिष्मतीपुरीचा राजा बनल्यावर त्याने धर्मानुकूल आचरणाने प्रजेचे पालन केले, त्यामुळे त्याची सत्कीर्ती चोहीकडे पसरली होती. इंद्रसेन राजा वैकुंठपती श्रीहरींच्या भक्तीत तल्लीन राहून त्यांच्या मोक्षदायक नामांचा जप करीत विधिवत् अध्यात्म-तत्त्वाच्या चिंतनात संलग्न राहत असे. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले व यथासांग पूजा केली. मग त्यांना उच्चासनावर बसवून राजा म्हणाला :
  • “मुनिश्रेष्ठ ! आपल्या कृपेने माझे सर्व कुशलमंगल आहे. आज आपल्या दर्शनाने माझे सर्व यज्ञकर्म सार्थक झाले. देवर्षी ! आपल्या आगमनाचे कारण सांगून माझ्यावर कृपा करावी.”
  • देवर्षी नारद म्हणाले : नृपश्रेष्ठ ! ऐका. माझे बोलणे तुमच्यासाठी आश्चर्यकारक आहे. मी ब्रह्मलोकातून यमलोकी गेलो होतो. तेथे मला यमराजाने एका उच्चासनावर बसवून माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांनाही पाहिले. ते व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन् ! त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप पाठविला आहे, तो ऐका. त्यांनी सांगितले आहे .
  • ‘पुत्र ! इंदिरा एकादशीच्या व्रताचे पुण्य प्रदान करून मला स्वर्गात पाठव.’ त्यांचा हा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. राजन् ! तुमच्या वडिलांना स्वर्गात पाठविण्यासाठी इंदिरा एकादशीचे विधिवत् व्रत करा.
  • राजाने विचारले : देवर्षी ! इंदिरा एकादशीचा विधी सांगण्याची कृपा करावी. कोणत्या पक्षात, कोणत्या तिथीला आणि कशा प्रकारे हे व्रत केले पाहिजे ? देवर्षी नारद म्हणाले : राजन् ! ऐका. मी तुम्हाला या व्रताचा शुभकारक विधी सांगतो. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीला पहाटे उठून अगदी श्रद्धेने स्नान करावे. पुन्हा मध्यान्ही स्नान करून एकाग्रचित्ताने एक वेळ भोजन करावे आणि रात्री भूमिशयन करावे. एकादशीला सुप्रभात होताच स्नानादीनंतर भक्तिभावाने या मंत्राचे उच्चारण करून उपवासाचा संकल्प करावा :

अद्य स्थित्वा निराहार: सर्वभोगविवर्जित: ।
श्वो भोक्ष्ये पुण्डरीकाक्ष शरणं मे भवाच्युत ॥

  • ‘हे कमलनयन भगवान नारायण ! आज मी सर्व भोगांपासून अलिप्त व निराहार राहून द्वादशीला भोजन करेन. हे अच्युत ! मी आपणास शरण आलो आहे.’ (पद्म पुराण, उत्तर खंड : 60.23)
  • दुपारी पितरांच्या प्रसन्नतेसाठी शाळिग्रामसमोर विधिवत् श्राद्ध करावे. दक्षिणा देऊन ब्राह्मणांचा आदर-सत्कार करावा आणि त्यांना भोजन करवून संतुष्ट करावे. पितरांना दिलेल्या अन्नमय पिंडाला हुंगून ते गाईला खाऊ घालावे. मग धूप-दीप व गंधादीने श्रीहरींची पूजा करून रात्री जागरण करावे. त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिभावाने त्यांची पूजा करून ब्राह्मणांना जेवू घालावे, मग आपल्या कुटुंबीयांसह मौनपूर्वक भोजन करावे. राजन् ! अशा प्रकारे प्रसन्नचित्ताने विधिवत् हे व्रत करावे. यामुळे तुमची पितरे वैकुंठात जातील.
  • भगवान श्रीकृष्ण म्हणतात : राजन् ! इंद्रसेन राजाला असे सांगून देवर्षी नारद अंतर्धान पावले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजाने अंतःपुरातील राण्या, पुत्र आणि सुनांसह एकादशीचे विधिवत् व्रत केले.
  • कुंतिनंदन ! व्रताची पूर्णाहुती झाल्यावर आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. इंद्रसेनचे पिता गरुडावर आरूढ होऊन वैकुंठात गेले आणि इंद्रसेन राजासुद्धा निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊन नंतर राजकुमाराचा राज्याभिषेक करून स्वर्गात गेला. अशा प्रकारे मी ‘इंदिरा’ एकादशीचे हे माहात्म्य सांगितले. याचे पठण व श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.

Indira Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi

  • मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023
  • द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

  • मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023
  • एकादशी व्रताची विधी जाणून घ्या

    Apara Ekadashi Mahatva in Marathi [अपरा एकादशीचे विशेष महत्त्व आहे]

    Nirjala Ekadashi 2023 (Marathi) : जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व व पूजाविधी

    Nirjala Ekadashi 2022 (Marathi) : जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व व पूजाविधी

    Play Audio Mp3

    Nirjala Ekadashi 2023 Date

    • एकादशी व्रत : शनिवार, 31 मे 2023 (उपवास)
    • एकादशी तिथी आरंभ : मंगळवार, 30 मे 2023 ला दुपारी 01:07 वाजता पासून
    • एकादशी तिथी समाप्त : बुधवार, 31 मे 2023 ला दुपारी 01:45 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी
    • 31 मे – निर्जला-भीम एकादशी (स्मार्त) आणि 31 मे – निर्जला-भीम एकादशी (भागवत)

    Nirjala Ekadashi Vrat Katha in Marathi

    • धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : जनार्दन ! ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचे माहात्म्य सांगण्याची कृपा करावी.
    • भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! या एकादशीचे वर्णन परम धर्मात्मा सत्यवतीनंदन श्री व्यास मुनी करतील, कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेद-वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत.
    • महर्षी वेदव्यास म्हणाले : दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीने पवित्र व्हावे व फुले वाहून श्रीकेशवाची पूजा करावी. मग नित्य पूजा-पाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करवून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन् ! प्रसूती वा मृत्यूनंतर लागलेल्या सुतकातही एकादशीला निराहार रहावे.
    • भीमसेन म्हणाले : परम बुद्धिमान पितामह ! माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल व सहदेव हे एकादशीला कधी भोजन करीत नाहीत आणि मलाही नेहमी हेच सांगतात की ‘भीमसेन ! तूसुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस.’ परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही.
    • भीमसेनचे बोलणे ऐकून व्यास मुनी म्हणाले : जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन करू नकोस.
    • भीमसेन : महाबुद्धिमान पितामह ! मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही, मग उपवास करून अगदी निराहार तर मी कसा बरे राहू शकेन ? माझ्या पोटात वृक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो, म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच हा शांत होतो. हे महामुनी! मी वर्षभरात केवळ एकच उपवास करू शकतो. म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल, असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन.
    • महर्षी व्यास म्हणाले : भीम ! ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीत असो वा मिथुन राशीत असो, शुक्ल पक्षात जी एकादशी येते, तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे, याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होते.
    • एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत् सर्व कार्ये पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करवून नंतर स्वतः भोजन करावे.
    • वर्षभरात जितक्या एकादशी असतात, त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते, यात यत्किंचितही शंका नाही. शंख-चक्र-गदाधारी श्रीहरींनी मला सांगितले होते की ‘जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मलाच शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांतून मुक्त होतो.’
    • एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विक्राळ आकृतिधारी आणि काळ्या रंगाचे दंड-पाशधारी भयंकर यमदूत जात नाहीत. अंतकाळी पीतांबरधारी, सौम्य स्वभावाचे, हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी.
    • स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वताएवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे (पाणी न पिणे) पालन करतो, तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यवधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते, असे म्हटले जाते.
    • मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इ. जे काही करतो ते सर्व अक्षय होते, हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिवत् व्रत-उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो, तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते.
    • जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील, ते परम पदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे, ते जरी ब्रह्महत्यारे, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकांतून मुक्त होतात.
    • हे कुंतिनंदन ! निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री-पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहे, ते ऐका : या दिवशी सागरात शयन करणाऱ्या श्रीविष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टान्नांद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे, त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी शंभर पिढ्यांना वैकुंठात पोहोचविले आहे.
    • निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो, तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचे माहात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो. चतुर्दशीयुक्त अमावास्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो, तेच पुण्यफळ या एकादशीचे माहात्म्य श्रवण केल्यानेही लाभते.
    • प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की ‘मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही.’ द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीविष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विधिवत् पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा :

    देवदेव हृषीकेश संसारार्णवतारक ।
    उदकुम्भप्रदानेन नय मां परमां गतिम् ॥

    • ‘भवसागरातून तारणारे हे देवाधिदेव हृषीकेश ! या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परम गती द्यावी.’ (पद्म पुराण, उत्तर खंड : ५३.६०)
    • भीमसेन ! निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य श्रीविष्णूंच्या सान्निध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत् व्रत करतो तो निष्पाप होऊन परम पद प्राप्त करतो.
    • हे ऐकून भीमसेननेही हे शुभ एकादशी व्रत सुरू केले. तेव्हापासून ही ‘पांडव द्वादशी’ म्हणून प्रसिद्ध आहे.

    Nirjala Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi

    बुधवार, 31 मे 2023

    द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

    • एकादशी तिथी आरंभ : मंगळवार, 30 मे 2023 ला दुपारी 01:07 वाजता पासून
    • एकादशी तिथी समाप्त : बुधवार, 31 मे 2023 ला दुपारी 01:45 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी

    निर्जला एकादशी सहजतेने कशी करावी ?

    • सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्यावे.
    • जर घरात देशी गायीचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वी 25 ते 50 ग्रॅम कोमट पाण्यासोबत प्यावे. यामुळे तहान-भुकेची तीव्रता कमी होईल, व्रत पूर्ण करणे सोपे होईल.
    • सूर्योदयापूर्वी लिंबू व खडीसाखर मिश्रीत पाणी (लिंबू सरबत) पिल्याने तहान कमी लागेल.
    • दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते एक तास ठेवून मग आंघोळ केल्याने तहानेचा त्रास होणार नाही. मुलतानी मातीमध्ये पलाशची पावडर किंवा ताक, लिंबू अथवा यापैकी कोणतीही एक वस्तू टाकल्याने तहानेची तीव्रता कमी होईल.
    • विनाकारण घरातून बाहेर जाऊ नका, धावपळ करु नका म्हणजे घाम येणार नाही. जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल, शक्य असल्यास मौन ठेवा, जप-ध्यान करा, सत्संग ऐका, शास्त्र वाचा.

    निर्जला एकादशीला काय करावे आणि काय करू नये ?

    • या दिवशी गुळणा अथवा आचमनाशिवाय तोंडात पाणी घेऊ नये, व्रत भंग होते.
    • एकादशीच्या सूर्योदयापासून दूसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जल त्याग केल्यास व्रत पूर्ण होते. द्वादशीला स्नानादितून निवृत्त होऊन भोजन करावे. वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात, त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशीमुळे मनुष्यास प्राप्त होते, यात थोडीही शंका नाही. भगवान केशवाने मला म्हटले होते की, ‘जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होतो.’
    • मेरू पर्वतासमान पाप देखिल या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो, त्याला एका-एका प्रहरात कोटि-कोटि स्वर्णमुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते, असे ऐकले आहे. ‘मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्रातः पुण्य स्नान, दान, जप, यज्ञ इ. जे काही करतो, ते सर्व अक्षय होते.’ हे भगवान श्री कृष्णांचे कथन आहे. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहन करतो, तो पापाचे भोजन करतो. तो या लोकात चांडाळासमान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो. जो मनुष्य या एकादशीला उपवास करून दान करेल, त्याला परम पदाची प्राप्ती होईल.
    • अधिक माहितीसाठी वाचा एकादशी व्रत विधी पोस्ट :- Click Here

    निर्जला एकादशीचे व्रत सोडण्याचा विधी :-

    • दूसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानानंतर आपला जपाचा नियम करून मग सूर्याला अर्घ्य देवून व्रत सोडावे.
    • 7 फुटाण्यांचे (एका फुटाण्याचे दोन तुकडे) 14 भाग हातात घेवून उभे रहावे. 14 तुकडे एक मागे एक पुढे असे फेकत जावे, की ‘ माझ्या सर्व पाप- संतापांचा नाश होवो, अंतःकरण शुद्ध होवो ॐ ॐ ॐ…..
    • काही फुटाणे खा, ज्यामुळे जमा झालेला कफ फुटाण्यांसोबत शरीरातून बाहेर येईल. त्यानंतर कोमट पाण्यात लिंबू सरबत (अल्प प्रमाणात सेंधव मीठ टाकावे) बनवून प्यावे.
    • एक दिड तासानंतर खूप पातळ मूग (मिरची-मसाल्याशिवाय हळद, कोथंबिर टाकून) किंवा मूगाचे पाणी एक चमचा तूप टाकून प्यावे.
    • संपूर्ण दिवस कोमट पाणी पिल्यास उत्तम, कोणतीही पचणास जड वस्तू खाऊ नये. संपूर्ण दिवस मूग खाल्ल्यास अतिउत्तम.
    • नोट :- तुम्ही स्वस्थ असाल तर निर्जला व्रत करा हे सर्वोत्तम होईल, तुम्हाला संपूर्ण पुण्यलाभ देखील होईल. जर तुमचे स्वास्थ्य अथवा वय निर्जला ठेवण्यास परवानगी देत नसेल (तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रूग्न असाल तर सजला ठेवा, जर सजला देखील ठेवू शकत नसाल तर केवळ दुधावर रहा, जर हे देखील शक्य नसेल तर फळ व दुधावर रहा.

    निर्जला एकादशी व्रताची विधी जाणून घ्या

    Nirjala Ekadashi Mahatva in Marathi [निर्जला एकादशीचे विशेष महत्त्व आहे]

    Rama Ekadashi Vrat Katha, Mahatva in Marathi: October 2022

    Rama Ekadashi Vrat Katha, Mahatva in Marathi: October 2022

    Play Audio Mp3

    Rama Ekadashi 2022 Date

    • एकादशी व्रत : शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (उपवास)
    • एकादशी तिथी आरंभ : गुरुवार, 20 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 04:05 वाजता पासून
    • एकादशी तिथी समाप्त : शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 05:22 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी

    Rama Ekadashi Vrat Katha in Marathi

    • धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : जनार्दन ! आपला माझ्यावर स्नेह आहे, म्हणून आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
    • भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘रमा’ नामक प्रसिद्ध व परम कल्याणकारक एकादशी येते. ही अति उत्तम एकादशी असून महापापांचा नाश करणारी आहे.
    • प्राचीन काळी मुचुकुंद नामक एक प्रसिद्ध राजा होऊन गेले. ते श्रीविष्णूंचे परम भक्त आणि सत्यनिष्ठ होते. निष्कंटक राज्य करणाऱ्या त्या राजाकडे नद्यांमध्ये श्रेष्ठ अशी ‘चंद्रभागा’ मुलीच्या रूपात जन्मली होती. राजाने चंद्रसेनकुमार शोभनशी तिचे लग्न लावून दिले. एकदा शोभन दशमीला सासरी आला आणि त्याच दिवशी संपूर्ण नगरात नेहमीप्रमाणेच दवंडी पिटविण्यात आली की ‘एकादशीला कोणीही भोजन करू नये.’
    • हे ऐकून शोभन आपली प्रिय पत्नी चंद्रभागेस म्हणाला : “प्रिये ! आता मी यावेळी काय केले पाहिजे, ते मला सांग.”
    • चंद्रभागा म्हणाली : पतिदेव ! माझ्या वडिलांकडे एकादशीला मनुष्य तर सोडाच, पाळीव प्राणीसुद्धा भोजन करीत नाहीत. प्राणनाथ ! जर तुम्ही भोजन केले तर तुमची खूप निंदा होईल. म्हणून विचारपूर्वक एकादशी करण्याचा दृढ निश्चय करा.
    • शोभन म्हणाला : प्रिये ! तू म्हणतेस ते खरे आहे. मीसुद्धा उपवास करेन. दैवाचे जसे विधान असेल तसेच होईल.
    • भगवान श्रीकृष्ण म्हणतात : अशा प्रकारे दृढ निश्चय करून शोभनने व्रताच्या नियमाचे पालन केले, परंतु सूर्योदय होताच त्याचा मृत्यू झाला. मुचुकुंद राजाने शोभनचा राजोचित अंत्यसंस्कार केला. पतीच्या अंत्यविधीनंतर चंद्रभागा माहेरीच राहू लागली.
    • नृपश्रेष्ठ ! तिकडे शोभन या व्रताच्या प्रभावाने मंदराचल पर्वताच्या शिखरावर वसलेल्या परम रमणीय देवपुरीत पोहोचला आणि तेथे कुबेरांप्रमाणे शोभायमान होऊ लागला.
    • एकदा मुचुकुंद राजाच्या नगरातील सोमशर्मा नामक एक प्रसिद्ध ब्राह्मण तीर्थयात्रा करीत मंदराचल पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना शोभन दिसला. राजाच्या जावयाला ओळखून ते त्याच्या जवळ गेले. भूदेव सोमशर्माला आपल्याकडे आल्याचे पाहून शोभनने त्वरित आपल्या आसनावरून उठून त्यांना वंदन केले. मग आपले सासरे, प्रिय पत्नी आणि सर्व प्रजेचे क्षेमकुशल विचारले.
    • सोमशर्मा म्हणाले : राजन् ! तिकडे सर्वजण आनंदात आहेत. परंतु आपण येथे कसे काय आलात ?… आश्चर्य आहे ! असे सुंदर आणि विचित्र नगर तर कोणीही कोठे पाहिले नसेल… !!
    • शोभन म्हणाला : द्विजेंद्र ! आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘रमा’ नामक एकादशी येते. तिचे व्रत केल्याने मला हे नगर मिळाले आहे. भूदेव ! मी हे उत्तम व्रत अश्रद्धेने केले होते, म्हणून मी असे मानतो की हे नगर स्थायी नाही. तुम्ही चंद्रभागेला हा संपूर्ण वृत्तांत सांगावा.. यानंतर सोमशर्मा ब्राह्मण मुचुकुंदपूरला परतले आणि चंद्रभागेला संपूर्ण वृत्तांत सांगितला.
    • सोमशर्मा म्हणाले : मुली ! मी तुझ्या पतीला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे इंद्रपुरीसारखे भव्य नगरही पाहिले, परंतु ते नगर अस्थिर आहे. तू आपल्या सामर्थ्याने ते स्थिर कर.
    • चंद्रभागा म्हणाली : ब्रह्मर्षी ! मी पतिदर्शनासाठी आतुर झाले आहे. आपण मला तेथे घेऊन चलावे. मी माझ्या एकादशी व्रताच्या पुण्याईने त्या नगराला स्थिर करेन.
    • भगवान श्रीकृष्ण म्हणतात : राजन् ! सोमशर्मा चंद्रभागेला सोबत घेऊन मंदराचल पर्वताजवळील वामदेव मुनींच्या आश्रमात गेले. तेथे ऋषींच्या मंत्राची शक्ती व एकादशी व्रताच्या प्रभावाने चंद्रभागेचे शरीर दिव्य बनले आणि तिने दिव्य गती प्राप्त केली. त्यानंतर ती पतीकडे गेली. प्रिय पत्नी आल्याचे पाहून शोभनला अत्यानंद झाला. त्याने तिला जवळ बोलावून आपल्या डाव्या बाजूला सिंहासनावर बसविले.
    • त्यानंतर चंद्रभागा शोभनला म्हणाली : ‘नाथ ! मी आपल्या हिताचे बोलते.
    • माझ्या वयाच्या आठव्या वर्षापासून आतापर्यंत एकादशीचे उपवास करून जो पुण्यसंचय झाला आहे, त्याच्या प्रभावाने हे नगर कल्पाच्या अखेरपर्यंत स्थिर व सर्व प्रकारच्या मनोवांछित वैभवाने समृद्धशाली राहील.’
    • नृपश्रेष्ठ ! अशा प्रकारे ‘रमा’ एकादशीच्या प्रभावाने चंद्रभागा दिव्य भोग, दिव्य रूप व दिव्य आभूषणांनी विभूषित होऊन पतीसह मंदराचल पर्वताच्या शिखरावर विहार करू लागली. राजन् ! ही ‘रमा’ एकादशी चिंतामणी व कामधेनूसारखी सर्व मनोरथे पूर्ण करणारी आहे.

    Rama Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi

    शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022

    द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

    एकादशी तिथी आरंभ : गुरुवार, 20 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 04:05 वाजता पासून शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2022 ला सायंकाळी 05:22 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी

    रमा एकादशी व्रताची विधी जाणून घ्या

    Rama Ekadashi Mahatva in Marathi [रमा एकादशीचे विशेष महत्त्व आहे]

    Apara Ekadashi 2022 (Marathi) : जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व व पूजाविधी

    Play Audio Mp3

    Apara Ekadashi 2022 Date

    • गुरुवार, 26 मे 2022

    Apara Ekadashi Vrat Katha in Marathi

    • धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : जनार्दन ! वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते ? तिचा विधी व माहात्म्य सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
    • भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! आपण सर्व लोकांच्या हितासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला. राजेंद्र ! वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात ‘अपरा’ एकादशी येते. ही अत्यंत पुण्यप्रदायक व महापापांचाही नाश करणारी आहे. ब्रह्महत्यारा, गोत्रहत्यारा, गर्भहत्यारा, परनिंदक तसेच परस्त्रीलंपट पुरुषही अपरा एकादशीच्या व्रताने निश्चितच निष्पाप होतो.
    • जो खोटी साक्ष देतो, मोजमापात दगाबाजी करतो, ज्ञान नसतानाही नक्षत्रांची गणना करतो आणि कपटाने आयुर्वेदाचा ज्ञाता बनून वैद्याचे काम करतो- हे सर्व नारकीय जीव आहेत. परंतु अपरा एकादशीच्या व्रताने तेदेखील निष्पाप होतात. जर कोणी क्षत्रिय आपला क्षात्रधर्म सोडून युद्धातून पळून गेला तर तो क्षत्रियोचित धर्मापासून भ्रष्ट झाल्यामुळे घोर नरकात पडतो. जो शिष्य विद्या प्राप्त करून स्वतःच गुरूंची निंदा करतो, तोदेखील महापापी होऊन भयंकर नरकात पडतो. परंतु अपरा एकादशी केल्याने अशा लोकांनाही सद्गती मिळते.
    • माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा प्रयाग तीर्थात स्नान केल्याने जे पुण्य मिळते, काशीत शिवरात्रीचे व्रत केल्याने जे पुण्य मिळते, गयेत पिंडदान करून पितरांना संतुष्ट करणाऱ्या पुरुषाला जे पुण्य मिळते, गुरू सिंह राशीत असताना गोदावरीत स्नान करणाऱ्या मनुष्याला जे पुण्य मिळते, बद्रीकाश्रमात यात्रेच्या वेळी महादेवांच्या दर्शनाने व बद्रीतीर्थाची यात्रा केल्याने जे पुण्यफळ लाभते तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात दक्षिणेसह यज्ञ करून हत्ती, घोडा आणि सोने दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ अपरा एकादशी केल्यानेही मनुष्य प्राप्त करतो.
    • ‘अपरा’ एकादशीला उपवास करून भगवान वामनाची पूजा केल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होऊन वैकुंठात प्रतिष्ठित होतो. या माहात्म्याच्या पठण व श्रवणाने सहस्र गोदानाचे पुण्यफळ लाभते.

    Apara Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi

    गुरुवार, 26 मे 2022

    द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

    द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

    अपरा एकादशी व्रताची विधी जाणून घ्या

    Apara Ekadashi Mahatva in Marathi [अपरा एकादशीचे विशेष महत्त्व आहे]

    Kamika Ekadashi Vrat Katha, Mahatva in Marathi ​: 4 August 2021

    Play Audio Mp3

    Kamika Ekadashi 2021 Date

    • बुधवार, 4 ऑगस्ट 2021

    Kamika Ekadashi Vrat Katha in Marathi

    • धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : गोविंद ! वासुदेव आपणास माझा नमस्कार असो ! आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी.
    • सिंह राशीत गुरु असताना तसेच व्यतिपात व दंडयोगात गोदावरी स्नानाने जे पुण्यफळ मिळते, तेच फळ भगवान श्रीकृष्णांच्या पूजेनेही मिळते.
    • समुद्र व वनासहित संपूर्ण पृथ्वीचे दान करणारा तसेच कामिका एकादशीचे व्रत करणारा, दोघेही समान फळाचे भोक्ता मानले जातात.
    • जो व्यायलेली गाय इतर वस्तूंसह दान करतो, त्या मनुष्याला जे पुण्यफळ मिळते, तेच पुण्यफळ ‘कामिका’ एकादशीचे व्रत करणाऱ्याला मिळते. जो श्रावण महिन्यात भगवान श्रीधराची पूजा करतो, त्याच्याद्वारे गंधर्व आणि नागांसह सर्व देवांची पूजा झाली असे समजावे.
    • म्हणून पापभीरू लोकांनी यथाशक्ती प्रयत्नपूर्वक कामिका एकादशीला श्रीहरींची पूजा केली पाहिजे. जे पापरूपी दलदलीने भरलेल्या भवसागरात बुडत आहेत, त्यांच्या उद्धारासाठी कामिका एकादशीचे व्रत सर्वोत्तम आहे. अध्यात्मविद्या-परायण पुरुषांना जे पुण्य मिळते, त्याहूनही अधिक पुण्य ‘कामिका’ एकादशीचे व्रत करणाऱ्यांना मिळते. ‘कामिका’ एकादशीचे व्रत करणाऱ्याने रात्री जागरण केल्यावर त्याला ना कधी भयंकर यमदूतांचे दर्शन होते, ना कधी त्याची दुर्गली होते.
    • लाल मणी, मोली, वैडूर्य आणि पोवळा इ. रत्नांनी पूजित होऊनही श्रीविष्णू तितके संतुष्ट होत नाहीत, जितके तुळशीदलाने पूजित झाल्यावर संतुष्ट होतात. तुळशीच्या मंजिरी वाहून जो भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो त्याची जन्मभराची पापे निश्चितच नष्ट होतात.

    या दृष्टा निखिलाघसंघशमनी स्पृष्टा वपुष्पावनी रोगाणामभिवन्दिता निरसनी सिक्तान्तकत्रासिनी ।

    प्रत्यासत्तिविधायिनी भगवतः कृष्णस्य संरोपिता न्यस्ता तच्चरणे विमुक्तिफलदा तस्यै तुलस्यै नम: ॥

    • “जिचे दर्शन होताच सर्व पापसमूहांचा नाश करते, स्पर्श केल्याने शरीराला पवित्र बनविते, नमस्कार केल्याने रोगांचे निवारण करते, अर्घ्य दिल्याने मृत्यूपासून रक्षण करते, जिचे रोप लावल्यावर भगवान श्रीकृष्णांच्या सान्निध्यात घेऊन जाते आणि भगवंताच्या चरणी वाहिल्यावर मोक्षरूपी फळ देते, त्या तुळशी देवीला नमस्कार असो !’ (पद्म पुराण, उत्तर सांड 56.22)
    • जो मनुष्य एकादशीला दिवसा किंवा रात्री दीपदान करतो, त्याच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तालाही ठाऊक नाही. एकादशीला श्रीहरींपुढे जो दिवा लावतो, त्याची पितरे स्वर्गात जाऊन अमृत प्राशन करून तृप्त होतात. देवापुढे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणारा मनुष्य मृत्यूनंतर कोट्यवधी दिव्यांनी पूजित होऊन स्वर्गात जातो.
    • भगवान श्रीकृष्ण म्हणतात : युधिष्ठिर ! तुम्हाला मी हे ‘कामिका’ एकादशीचे माहात्म्य सांगितले. कामिका एकादशी सर्व पापांचे हरण करणारी आहे, म्हणून सर्वांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे. हे स्वर्ग व महान पुण्यफळ देणारे आहे. जो श्रद्धेने या माहात्म्याचे पठण व श्रवण करतो, तो सर्व पापातून मुक्त होऊन वैकुंठात जातो.

    Kamika Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi

    बुधवार, 4 ऑगस्ट 2021

    द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

    द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here

    कामिका एकादशी व्रताची विधी जाणून घ्या

    Kamika Ekadashi Mahatva in Marathi [कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे]

    Ekadashi Vrat Puja Vidhi in Marathi [Ekadashi Che Niyam]

    Play Audio Mp3

    Ekadashi Vrat Puja Vidhi in Marathi [Ekadashi Che Niyam]

    • दशमीला पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच भोगविलासापासूनही दूर रहावे. 
    • एकादशीला पहाटे दातवण किंवा टूथपेस्टचा वापर करू नये. कडुलिंब, जांभूळ किंवा आंब्याची पाने चावून बोटाने जीभ स्वच्छ करावी.
    • एकादशीला झाडाची पाने तोडणेदेखील वर्ज्य आहे, म्हणून गळून पडलेली पानेच घ्यावीत. हे शक्य नसल्यास पाण्याने बारा चुळा भराव्यात. मग स्नानादीतून निवृत्त होऊन मंदिरात जावे, गीतापाठ करावा किंवा पुरोहिताकडून ऐकावा. 
    • भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की ‘आज मी चोर, पाखंडी व दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कोणाचे मनही दुखविणार नाही. गाय, ब्राह्मण वगैरेंना फलाहार व अन्नादी देऊन प्रसन्न करेन. रात्री जागरण करून भजन-कीर्तन करेन. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या द्वादशाक्षरी मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेन. राम, कृष्ण, नारायण वगैरे श्रीविष्णूंच्या सहस्र नामांना कंठाचे आभूषण बनवेन.’ – असा शुभ संकल्प करून श्रीविष्णूंचे स्मरण करून प्रार्थना करावी की ‘हे त्रिलोकीनाथ ! माझी लाज आपल्या हाती आहे म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या.’ 
    • मौन, जप, शास्त्रपाठ, कीर्तन, रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रतात विशेष लाभदायी ठरतात.
    • एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेयपदार्थांचे सेवन करू नये. कोल्डड्रिंक्स, फळांचे डबाबंद रस, आइसक्रीम, तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत. दोनदा जेवण करू नये. फळे, घरीच काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध वा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे. व्रताच्या तीन दिवसात (दशमी, एकादशी व द्वादशी) काशाच्या भांड्यात जेवण करू नये. मांस, कांदा, लसूण, पालेभाजी, मसूर, नाचणी, उडीद, चणे, मध, तेल इ. चे सेवन करू नये. जास्त पाणीसुद्धा पिऊ नये.
    • एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी (दशमीला) व तिसऱ्या दिवशी (द्वादशीला) हविष्यान्न (जव, गहू, मूग, सैंधव मीठ, मिरे, साखर, गाईचे तूप इ.) चे एकदा सेवन करावे. फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इ.चे सेवन करू नये. आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते इ. अमृतफळांचे सेवन केले पाहिजे.
    • जुगार, निद्रा, पान खाणे, परनिंदा, कपट, चुगली, चोरी, हिंसा, मैथुन, क्रोध, खोटे बोलणे व इतर कुकर्मापासून नितांत दूर राहिले पाहिजे.
    • चुकून एखाद्या निंदकाशी बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसेच धूप-दीपाने श्रीहरींची पूजा करून क्षमा मागावी. एकादशीला घरात झाडलोट करू नये. यामुळे कीडे मुंग्या वगैरे सूक्ष्म जीवांच्या मृत्यूची भीती असते. या दिवशी केस कापू नये. गोड बोलावे, पण कमीच बोलावे. जास्त बोलण्याने न बोलण्यासारखे शब्दही बोलले जातात. सत्य बोलावे. या दिवशी कुवतीप्रमाणे अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये. प्रत्येक वस्तूत तुळशीदल टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करावी.
    • एकादशीला एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे. गंगेत अस्थीविसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे. प्राणिमात्राला अंतर्यामी परमात्म्याचे स्वरूप समजून कोणाशीही लबाडी, कपट करू नये. कोणी आपला अपमान केला किंवा कटू वचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये. संतोषाचे फळ सदैव गोड असते. मनात दयाभाव ठेवावा. या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम फळ मिळते. द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टान्न, दक्षिणा इ.नी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी.

    व्रताचे पारणे सोडण्याचा विधी

    • द्वादशीला पूजेच्या जागी बसून सात फुटाण्यांचे चौदा तुकडे करून सात तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे. ‘माझी सात जन्मांची शारीरिक, वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली’ – अशी भावना करून सात ओंजळी पाणी प्यावे आणि सात फुटाणे खाऊन व्रत सोडावे.

    एकादशी व्रत कथा जाणून घ्या

    Kamika Ekadashi