Siddhasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Siddhasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Siddhasana information in Marathi [Siddhasana Mahiti]

  • अलौकिक सिद्धी प्रदान करणारे हे आसन असल्यामुळे याचे नाव सिद्धासन पडले आहे. सिद्ध योग्यांचे हे प्रिय आसन आहे. यमांमध्ये ब्रह्मचर्य श्रेष्ठ आहे, नियमांमध्ये शौच श्रेष्ठ आहे तसेच आसनांमध्ये सिद्धासन श्रेष्ठ आहे.
  • सिद्धासनासारखे दुसरे आसन नाही, केवली कुंभकासारखा प्राणायाम नाही, खेचरी मुद्रेसमान अन्य मुद्रा नाही आणि अनाहत नादासारखा दुसरा नाद नाही.
  • विशेष : ध्यान आज्ञाचक्रात आणि श्वास दीर्घ स्वाभाविक.

Siddhasana Kase Karave [सिद्धासन कसे करावे] :

  • Step 1 : आसनावर बसून पाय मोकळे सोडा.
  • Step 2 : आता डाव्या पायाची टाच, गुदा आणि जननेंद्रियाच्यामध्ये ठेवा.
  • Step 3 : उजव्या पायाची टाच जननेंद्रियाच्या वर अशा प्रकारे ठेवा जेणेकरून जननेंद्रिय व अंडकोषावर दाब पडणार जाही. पायांचा क्रम बदलू शकता. दोन्ही पायांचे तळवे जांघेच्या मध्य भागात राहावे.
  • Step 4 : तळवे वरच्या बाजूस राहतील अशा प्रकारे दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. किंवा दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत ठेवा.
  • Step 5 : डोळे उघडे किंवा बंद ठेवा. श्वासोच्छ्वास आरामात स्वाभाविक चालू द्या. भ्रूमध्यात, आज्ञाचक्रात ध्यान केंद्रित करा. पाच मिनीटांपासून तीन तासांपर्यंत या आसनाचा अभ्यास करु शकता. ध्यानाची उच्च कक्षा आल्यावर शरीरावरील मनाची पकड दूर होते.

Siddhasana Che Fayde [Benefits in Marathi]

  • सिद्धासनाच्या अभ्यासाने शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण होते. प्राणतत्त्व स्वाभाविकपणे उर्ध्वगामी होते. यामुळे मन एकाग्र करणे सोपे जाते.
  • पचनक्रिया नियमित होते. श्वासाचे रोग, हृदय रोग, जीर्णज्वर, अजीर्ण, अतिसार, शुक्रदोष इ. दूर होतात. मंदाग्नि, मुरडा, संग्रहणी, वातविकार, क्षय, दमा, मधुमेह, प्लीहाची वाढ इ. अनेक रोगांचे निराकरण होते.
  • पद्मासनाच्या अभ्यासाने जे रोग दूर होतात ते सिद्धासनाच्या अभ्यासानेही दूर होतात.
  • ब्रह्मचर्य पालनासाठी हे आसन विशेष साहाय्यक आहे. विचार पवित्र होतात. मन एकाग्र होते. सिद्धासनाचा अभ्यासक भोग विलासापासून वाचू शकतो.
  • 72 हजार नाड्यांचा मल या आसनाच्या अभ्यासाने दूर होतो. वीर्याचे रक्षण होते. स्वप्नदोष होत असलेल्या रोग्याने हे आसन अवश्य केले पाहिजे.
  • योगीजन सिद्धासनाच्या अभ्यासाने वीर्याचे रक्षण करून प्राणायामाद्वारे त्यास मस्तिष्काकडे घेऊन जातात ज्यामुळे वीर्य ओज व मेधाशक्तीत परिणत होऊन दिव्यतेचा अनुभव करविते. मानसिक शक्तींचा विकास होतो.
  • कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी हे आसन प्रथम पायरी आहे.
  • सिद्धासनात बसून जे काही वाचले जाते ते चांगल्या प्रकारे लक्षात राहते. विद्यार्थ्यांसाठी हे आसन विशेष लाभदायक आहे.
  • जठराग्नि प्रदीप्त होतो. चित्त स्थिर राहते ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
  • आत्म्याचे ध्यान करणारा योगी जर मिताहारी राहून बारा वर्षे सिद्धासनाचा अभ्यास करेल तर त्याला सिद्धी प्राप्त होतात.
  • सिद्धासन सिद्ध झाल्यानंतर इतर आसनांची काही गरजच राहत नाही.
  • सिद्धासनाने केवल किंवा केवली कुंभक सिद्ध होतो. सहा महिन्यातही केवली कुंभक सिद्ध होऊ शकतो आणि अशा सिद्ध योग्याच्या दर्शन-पूजनाने पातके नष्ट होतात, मनोकामना पूर्ण होतात.
  • सिद्धासनाच्या प्रतापाने निर्बीज समाधी सिद्ध होते. मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालंधर बंध आपोआप लागतात.

Siddhasana Savadhagiri [Precautions in Marathi]

  • सिद्धासन महापुरुषांचे आसन आहे. सामान्य माणसाने हट्टपूर्वक याचा उपयोग करू नये, अन्यथा लाभाऐवजी हानीच होण्याची शक्यता आहे.

Dhanurasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Dhanurasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Dhanurasana information in Marathi. [Dhanurasana Mahiti]

  • या आसनात शरीराचा आकार धनुष्यासारखा बनतो. एकमेकांना खेचणाऱ्या पायांचा व हातांचा आकार धनुष्याच्या प्रत्यंचेसारखा होतो. म्हणून याला ‘धनुरासन’ म्हणतात.
  • ध्यान मणिपूर चक्रात. श्वास खालच्या स्थितीत रेचक व वरील स्थितीत पूरक करावा.

Dhanurasan Kase Karave [ धनुरासन कसे करावे]:

  • Step 1 : जमिनीवर अंथरलेल्या कांबळ्यावर पालथे झोपा. दोन्ही पाय एकमेकांशी जुळवून ठेवा.
  • Step 2 : आता दोन्ही पाय उचलून गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हात पाठीमागे नेऊन दोन्ही पायांचे घोटे पकडा.
  • Step 3 : रेचक करून छाती, डोके व हाताने पकडलेल्या पायांना खेचून हळूहळू वर उचला. शक्य होईल तितके डोके मागील बाजूस नेण्याचा प्रयत्न करा. दृष्टी देखील वर आणि मागील बाजूस असली पाहिजे. हात सरळ व ताठ ठेवा. पायसुद्धा ताठ ठेवा. दोन्ही गुडघे एकाच रेषेत ठेवा. संपूर्ण शरीराचा भार केवळ पोटावर (नाभीवर) राहील. कंबरेपासून वरील शरीर तसेच कंबरेखालील भाग वरच्या बाजूस वाकविलेल्या स्थितीत राहील.
  • Step 4 : कुंभक करून याच स्थितीत टिकून रहा.
  • Step 5 : त्यानंतर हात सोडून पाय आणि डोके मूळ स्थितीत न्या व पूरक करा.
  • विशेष : प्रारंभी पाच सेकंद हे आसन करावे व नंतर हळूहळू वेळ वाढवत तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ या आसनाचा अभ्यास करा. तीन चार वेळा हे आसन केले पाहिजे.

Dhanurasana Che Fayde [Benefits in Marathi]

  • धनुरासनाच्या सरावाने :
  1. मलावरोधाचा त्रास होत नाही.
  2. धनुरासनाच्या अभ्यासाने पोटाची चरबी कमी होते. गॅस दूर होतो. पोटाचे रोग नाहीसे होतात. वायूरोग नष्ट होतो. पोटाच्या भागात रक्ताचा संचार जास्त प्रमाणात होतो.
  3. पोटाच्या स्नायूंवर ताण पडल्याने पोटावर खूपच चांगला प्रभाव पडतो. आतड्यांवर खूप दाब पडल्याने पोटाच्या अवयवांवरही दबाव पडतो. त्यामुळे आतड्यांमध्ये पाचकरसाचे प्रमाण वाढते व जठराग्नी प्रदीप्त होतो. भूक वाढते. पचनशक्ती वाढते तसेच पोटात दुखत असल्यास दुखणे दूर होते.
  4. सरकलेली नाभी आपल्या स्थानी येते. नाभी यथास्थानी आल्यावरही या आसनाचा सराव अवश्य केला पाहिजे. जो या आसनाचा सदैव सराव करीत राहतो त्याची नाभी कधीही सरकत नाही.
  5. लठ्ठपणा दूर करण्यात या आसनाची मदत होते. लठ्ठ व्यक्तींनी दररोज 10-15 मिनिटे सराव केला पाहिजे.
  6. पाठीचा कणा लवचीक बनतो आणि वार्धक्य लवकर येत नाही.
  7. छातीचे दुखणे बंद होते. हृदयाची धडधड दूर होऊन हृदय मजबूत होते.
  8. गळ्याचे सर्व रोग दूर होऊन आवाज मधुर बनतो. श्वसन क्रिया व्यवस्थीत चालते. मुखाकृती सुंदर बनते. शरीराचे सौंदर्य वाढते. डोळ्यांचे तेज वाढते व सर्व रोग दूर होतात. हाता-पायांचे थरथर कापणे बंद होते.
  9. धनुरासनात भुजंगासन व शलभासनाचा समावेश होत असल्याने या दोन्ही आसनांचा फायदा या आसनाने होतो. स्त्रीयांसाठी हे आसन खूपच लाभकारक आहे. याने मासिक धर्माचे सर्व विकार, गर्भाशयाचे सर्व रोग दूर होतात.
  10. रोग दूर करण्यातही हे आसन मुख्य मानले गेले आहे. मधुमेह, गॅस व आतड्यांचा त्रास असणाऱ्या रुग्णांना हे आसन वरदानस्वरूप आहे. ज्यांना कोणताही आजार नसेल आणि जे निरोगी राहू इच्छितात, त्यांनी दररोज या आसनाचा सराव करावा.
  11. जो दररोज हलासन, मयूरासन व धनुरासन करतो तो कधीही आळशी बनत नाही. तो नेहमी उत्साही, कार्यशील व शक्तिशाली राहतो.

Dhanurasana Savadhagiri [Precautions in Marathi]

  • हर्नियाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन मुळीच करू नये.

Padmasana in Marathi [Kase Karava, Fayde, Mahiti]

Padmasana in Marathi [Kase Karava, Fayde, Mahiti]

Padmasana information in Marathi. [Padmasana Mahiti]

  • या आसनात पायांचा आकार पद्म म्हणजेच कमळासारखा बनल्यामुळे यास पद्मासन अथवा कमलासन असे म्हणतात.

इदं पद्मासनं प्रोक्तं सर्वव्याधिविनाशनम् ।
दुर्लभं येन केनापि धीमता लभ्यते भुवि ॥

  • ‘अशा प्रकारे सर्व व्याधींना नष्ट करणाऱ्या पद्मासनाचे वर्णन केले आहे. हे दुर्लभ आसन एखाद्या विरळ्या बुद्धीमान पुरुषांलाच प्राप्त होते.’ (हठयोगप्रदीपिका, प्रथमोपदेश)

Padmasana Kase Karava [पद्मासन कसे करावे] :

  • Step 1 : अंथरलेल्या आसनावर स्वस्थपणे बसा. रेचक करत करत उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. किंवा पहिल्यांदा डावा पाय व नंतर उजवा पायसुद्धा ठेवू शकता. पायाचे तळवे वरती आणि टाच बेंबीखाली असावी. गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. डोके, मान, छाती, पाठीचा कणा इ. पूर्ण भाग सरळ व ताठ असावा.
  • Step 2 : दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत ठेवा. (अंगठा तर्जनीच्या नखास लावून उरलेली तीन बोटे सरळ ठेवल्यास ज्ञानमुद्रा होते.) किंवा डावा हात मांडीवर ठेवा. तळवा वरच्या बाजूस असावा. त्याच्यावर त्याच प्रकारे उजवा हात ठेवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांशी जुळलेली राहतील. दोन्ही हातांची मूठ बांधून गुडघ्यावरसुद्धा ठेऊ शकता.
  • Step 3 : रेचक पूर्ण झाल्यानंतर कुंभक करा. प्रारंभी दोन्ही पाय मांडीवर ठेवू न शकल्यास एकच पाय ठेवा. पायाला मुंग्या येत असतील. त्रास होत असेल तरी निराश न होता अभ्यास चालू ठेवा. दर तिसऱ्या दिवसानंतर अवधी एक मिनिटाने वाढवून एक तासापर्यंत पोहोचले पाहिजे.
  • Step 4 : दृष्टी नासाग्र किंवा भ्रूमध्यावर स्थिर करा. डोळे बंद, उघडे किंवा अर्धोन्मलीतही ठेवू शकता. शरीर सरळ व स्थिर ठेवावे. दृष्टी एकाग्र करावी.
  • Step 5 : भावना करा की मूलाधार चक्रातील लपलेल्या शक्तीचे भांडार उघडत आहे. खालच्या केंद्रातील चेतना तेज व ओज यांच्यात रूपांतरीत होऊन वर येत आहे. किंवा अनाहत चक्रात (हृदयात) चित्त एकाग्र करून भावना करा की हृदयरूपी कमळातून सुगंधाच्या धारा वाहत आहेत. संपूर्ण शरीर या धारानी सुगंधीत होत आहे.
  • विशेष : ध्यान आज्ञाचक्र किंवा अनाहत चक्रात असावे. श्वास रेचक, कुंभक, दीर्घ, स्वाभाविक.

Padmasana Che Fayde [Benefits in Marathi]

  • प्राणायामाच्या अभ्यासाद्वारे हे आसन केल्याने नाडीतंत्र शुद्ध होऊन आसन सिद्ध होते. विशुद्ध नाडीतंत्र असलेल्या योग्याच्या विशुद्ध शरीरात रोगाची छाया सुद्धा राहू शकत नाही आणि तो स्वेच्छेने शरीराचा त्याग करू शकतो.
  • प्राणायामाच्या अभ्यासाद्वारे हे आसन केल्याने नाडीतंत्र शुद्ध होऊन आसन सिद्ध होते. विशुद्ध नाडीतंत्र असलेल्या योग्याच्या विशुद्ध शरीरात रोगाची छाया सुद्धा राहू शकत नाही आणि तो स्वेच्छेने शरीराचा त्याग करू शकतो.
  • पद्मासनाचा अभ्यास करणाऱ्या साधकाच्या जीवनात एक विशेष आभा प्रगट होते. या आसनाद्वारे योगी, संत, महापुरूष महान झाले आहेत.
  • पद्मासनाच्या अभ्यासाने उत्साहात वाढ होते. स्वभावात प्रसन्नता वाढते. चेहरा तेजस्वी होतो. बुद्धीचा अलौकिक विकास होतो. चित्तामध्ये आनंद-उल्हास राहतो. चिंता, शोक, दुःख, शारीरिक विकार दबतात. कुविचार नष्ट होऊन सुविचार प्रगट होऊ लागतात.
  • पद्मासनाच्या अभ्यासाने रजो व तमोगुणांमुळे व्यग्र झालेले चित्त शांत होते. सत्त्वगुणामध्ये अत्यंत वृद्धी होते.
  • प्राणायाम, सात्त्विक मिताहार आणि सदाचाराने पद्मासनाचा अभ्यास केल्यास अंतःस्रावी ग्रंथींना विशुद्ध रक्त मिळते. यामुळे कार्यशक्ती वाढून भौतिक आणि आध्यात्मिक विकास जलद होतो.
  • बौद्धिक-मानसिक कार्य करणाऱ्यांसाठी, चिंतन-मनन करणाऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी हे आसन खूप लाभदायक आहे.
  • चंचल मनास स्थिर करण्यासाठी तसेच वीर्य रक्षणासाठी हे आसन अद्वितीय आहे.
  • श्रम आणि कष्टाशिवाय एक तास पद्मासनात बसणाऱ्या माणसाचे मनोबल खूप वाढते.
  • भांग, गांजा, चरस, अफीम, दारू, तंबाखू इ. व्यसनांनी ग्रस्त मनुष्य जर या व्यसनांमधून मुक्त होण्याच्या भावनेसह दृढ निश्चयाने पद्मासनाचा अभ्यास करेल तर तो दुर्व्यसनातून सहजगत्या आणि कायमचा सुटू शकतो. चोरी, जुगार, व्यभिचार वा हस्तदोषासारख्या वाईट सवयी लागलेले युवक-युवतीही या आसनाद्वारे त्या सर्व कुसंस्कारांमधून मुक्त होऊ शकतात.
  • कुष्ठ, रक्तपित्त, पक्षाघात, मलावरोधाने निर्माण होणारे रोग, क्षय, दमा, फीट येणे, धातुक्षय, कॅन्सर, जंत, त्वचेचे रोग, वात कफ प्रकोप, नपुंसकत्व, वंध्यत्व इ. रोग पद्मासनाच्या अभ्यासाने नष्ट होतात.
  • अनिद्रेच्या रोगासाठी हे आसन रामबाण उपाय आहे.
  • या आसनाने स्थूलपणा कमी होतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या सुरक्षिततेसाठी हे आसन सर्वोत्तम आहे.
  • पद्मासनात बसून अश्विनी मुद्रा करण्याने म्हणजेच गुदद्वाराचे पुन्हा पुन्हा आकुंचन-प्रसरण केल्याने अपानवायू सुषुम्नेत प्रविष्ट होतो. याने कामविकारावर जय प्राप्त होतो.
  • गुह्यंद्रियास आतल्या बाजूस खेचल्याने म्हणजेच योनीमुद्रा किंवा वज्रोली केल्याने वीर्य उर्ध्वगामी होते.
  • पद्मासनात बसून उड्डीयान बंध, जालंधर बंध तसेच कुंभक करून छाती व पोट फुगवण्याची क्रिया केल्याने वक्षशुद्धी तसेच कंठशुद्धी होते. त्यामुळे खूप भूक लागते, भोजन लवकर पचते, लवकर थकवा येत नाही. स्मरणशक्ती व आत्मबळ वाढते.
  • यम-नियमपूर्वक दीर्घकाळ पद्मासनाचा अभ्यास केल्याने उष्णता निर्माण होऊन मूलाधार चक्रात आंदोलने निर्माण होतात. कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची भूमिका तयार होते. जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा साधे दिसणाऱ्या या पद्मासनाचा खरा महिमा कळतो. घेरंड, शांडिल्य तसेच अन्य अनेक ऋषींनी या आसनाचा महीमा गायला आहे. ध्यान लावण्यासाठी हे आसन खूप लाभदायक आहे.

Padmasana Savadhagiri [Precautions in Marathi]

  • अशक्त वा रोगी व्यक्तीने जबरदस्तीने पद्मासनात बसू नये. पद्मासन सशक्त व निरोगी व्यक्तीसाठी आहे.

Supta Vajrasana कसे करावे, Che Fayde, Mahiti in Marathi

Supta Vajrasana in Marathi

Supta Vajrasana information in Marathi. [Supta Vajrasana Mahiti]

  • या आसनाच्या अभ्यासाने शरीर वज्रासारखे मजबूत होते आणि हे आसन जमिनीवर झोपून केले जाते, म्हणून याला ‘सुप्तवज्रासन’ म्हटले गेले आहे.

Supta Vajrasana Kase Karava [सुप्तवज्रासन कसे करावे]

  • Step 1 : वज्रासनात (दोन्ही पाय गुडघ्यांतून वाकवून दोन्ही टाचांवर अशा प्रकारे बसा की दोन्ही तळवे नितंबांवर लागावेत आणि पायांचे अंगठे एकमेकांशी जुळलेले असावेत) बसून उताणे होऊन मागच्या बाजूला झुकत जमिनीवर लेटा. दोन्ही मांड्या एकमेकांना चिकटून ठेवा.
  • Step 2 : श्वास सोडत डावा तळहात उजव्या खांद्याखाली आणि उजवा तळहात डाव्या खांद्याखाली अशा प्रकारे ठेवा की डोके दोन्ही हातांच्या क्रॉसवर येईल.
  • विशेष : ध्यान विशुद्धाख्य चक्रात (कंठस्थान) ठेवा.

Supta Vajrasana Che Fayde [Benefits in Marathi]

  • या आसनाचा सर्वांत विशेष लाभ हा होतो की एकटे हे आसन पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत रक्तसंचार करून संपूर्ण शरीराला मजबूत बनविते.
  • शरीराचा थकवा दूर होतो. पाठीचा कणा व कंबर लवचीक होते आणि छाती रुंद होते.
  • मेंदूच्या नियंत्रणात बरीच मदत मिळते.
  • शरीराच्या नाडीसंस्थेचे केंद्र असलेले नाभी- स्थान ठीक राहते.
  • सुषुम्नेचा मार्ग अत्यंत सुगम होतो. कुंडलिनी शक्ती सहजगत्या ऊर्ध्वगमन करते.
  • या आसनात ध्यान केल्याने पाठीचा कणा ताठ ठेवण्यात श्रम पडत नाहीत आणि त्याला विश्रांती मिळते.
  • या आसनाने सर्वच अंतःस्रावी ग्रंथींना पुष्टी मिळते, ज्यामुळे शारीरिक व आध्यात्मिक विकास सहज होतो.
  • जठराग्नी प्रदीप्त होऊन मलावरोधाचा त्रास दूर होतो. कंबरदुखी, गुडघेदुखी, धातुक्षय, लकवा, क्षयरोग, पथरी (मूतखडा), बहिरेपणा, तोतरेपणा, डोळे व स्मरणशक्तीची दुर्बळता इ. व्याधींमध्ये लाभ होतो.
  • श्वसन-संबंधी व्याधींमध्ये अत्यंत लाभ होतो.
  • टॉन्सिलायटिस वगैरे घशाच्या रोगांमध्येही हे आसन लाभदायी आहे.
  • बालपणापासूनच या आसनाचा सराव केल्यास दम्याचा त्रास होऊ शकत नाही.
  • पोट, कंबर व नितंबांवर वाढलेली चरबी कमी होते आणि शरीर आकर्षक बनते.

Supta Vajrasana Savadhagiri [Precautions in Marathi]

  • पाठीच्या कण्याच्या खालच्या भागात त्रास असणाऱ्या रुग्णांनी तसेच हाडांच्या क्षयरोगाने ग्रस्त व्यक्तींनी एखाद्या जाणकारास विचारल्याविना या आसनाचा सराव करू नये.

Guru Stotram Benefits in Marathi

Yoga Mudrasana कसे करावे, Fayde, Mahiti in Marathi

Yoga Mudrasana in Marathi

Yoga Mudrasana information in Marathi. [Yoga Mudrasana Mahiti]

  • योगाभ्यासात ही मुद्रा अत्यंत महत्त्वाची असल्याने या आसनाचे नाव ‘योगमुद्रासन’ ठेवण्यात आले आहे. तुम्ही आध्यात्मिक उद्देशाने योगमुद्रासन करीत असल्यास आसनाचा कालावधी रुची व शक्तीनुसार वाढवावा.

Yoga Mudrasana Kase Karava [योगमुद्रासन कसे करावे]

  • Step 1 : पद्मासनात बसून डोळे बंद करावेत. दोन्ही हात पाठीच्या मागे न्यावेत.
  • Step 2 : डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडावे. दोन्ही हात खेचून माकडहाड असते तेथे ठेवावेत.
  • Step 3 : श्वास हळूहळू सोडत कपाळ जमिनीला टेकवावे. काही वेळ या स्थितीत थांबून आराम करावा आणि श्वास सामान्य रूपाने चालू द्यावा.
  • विशेष : मग हळूहळू दीर्घ श्वास घेत डोके उचलून शरीर पुन्हा सरळ करावे आणि श्वास सामान्य रूपाने चालू द्यावा. ही क्रिया 4-5 वेळा करावी. सुरुवातीला हे आसन कठीण वाटल्यास सुखासन अथवा सिद्धासनात बसून करावे. पूर्ण लाभ तर पद्मासनात बसून केल्यानेच होतो. सामान्यतः हे आसन 3 मिनिटांपर्यंत केले पाहिजे.

Yoga Mudrasana Che Fayde [Benefits in Marathi]

  • जठराग्नी प्रदीप्त होतो. गॅस, अपचन, बद्धकोष्ठ इ. पोटाचे रोग दूर होतात.
  • सुटलेले पोट आत जाते. शरीर सुडौल व मजबूत बनते.
  • आतड्यांच्या सर्व तक्रारी दूर होतात. हृदय मजबूत बनते.
  • रक्ताचे विकार दूर होतात. कुष्ठरोग व यौन-विकार नष्ट होतात.
  • मानसिक व बौद्धिक बळ वाढते.
  • नाडीतंत्राला, विशेषतः कमरेच्या नाडीमंडळाला बळ मिळते.
  • स्वादुपिंड क्रियाशील होऊन मधुमेहाला नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे आसन हितकारी आहे.
  • पाठीच्या कण्याचे सर्व मणके एकमेकांपासून मोकळे होऊन सुषुम्ना नाडीला शुद्ध व हलके करतात, ज्यामुळे मेंदूच्या क्रियांमध्ये विशेष स्फूर्ती येते.
  • मणिपूर चक्र जागृत होते, जे प्रत्येक मनुष्यात दडलेल्या शक्तीचे एक मुख्य केंद्र आहे.
  • विशेष : धातुदौर्बल्यात योगमुद्रासन खूप लाभदायक आहे.

Yoga Mudrasana Savadhagiri [Precautions in Marathi]

  • योगासनानंतर लगेच काहीही खाऊ-पिऊ नये. फक्त एक किंवा दोन घोट पाणी पिऊ शकता.