Chandrabhedi Pranayama Mahiti, Kase Karave, Fayde in Marathi

Chandrabhedi Pranayama Mahiti, Kase Karave, Fayde in Marathi

Chandrabhedi Pranayam information in Marathi. [Yoga Mudrasana Mahiti]

  • आपल्या शरीराच्या सर्व क्रियांचे नियमन सौम्य (शीत) तत्त्व आणि अग्नी (उष्ण) तत्त्वाद्वारेच होते. यातील संतुलन बिघडल्यावर विविध व्याधी उद्भवतात. उदा.- सौम्य तत्त्वात वृद्धी झाल्यावर शीत गुणाच्या प्राबल्याने वात-कफजन्य रोग जडतात तसेच अग्नितत्त्वाची वृद्धी झाल्यावर उष्ण गुणाच्या प्राबल्याने पित्तजन्य रोग जडतात. दोन्ही तत्त्वांमध्ये संतुलन टिकून राहिल्यास आरोग्य व दीर्घायुष्य लाभते. हेच संतुलन टिकवून ठेवण्यासाठी निरोगी व्यक्तीने सूर्यभेदी व चंद्रभेदी प्राणायामाचा सम प्रमाणात नियमित अभ्यास करावा. या तत्त्वांमध्ये कधी विषमता झाल्यास उत्पन्न लक्षणांनुसार प्राणायाम करून पुन्हा संतुलन स्थापित करावे. उदा.- हिवाळा असल्यास सूर्यभेदी प्राणायाम करावे आणि उन्हाळा असल्यास चंद्रभेदी प्राणायाम करावे. आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी इ. कोणत्याही चिकित्सा पद्धतींद्वारे व्याधींमध्ये इतका शीघ्र लाभ होत नाही, जितका या प्राणायाम चिकित्सेच्या अभ्यासाने होतो.

चंद्रभेदी प्राणायाम कसे करावे

  • याची कृती सूर्यभेदी प्राणायामाच्या अगदी विरुद्ध आहे. जाणून घ्या, सूर्यभेदी प्राणायामाची कृती : Click Here
  • यात डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेऊन आंतकुमक करावे. नंतर उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. अशा प्रकारे 3 ते 5 प्राणायाम करावे.

Chandrabhedi Pranayam Che Fayde [Benefits in Marathi]

  • या प्राणायामामुळे सूर्यनाडी क्रियाशील होते.
  • नियमितपणे पाच सूर्यभेदी प्राणायाम केल्याने कफजन्य सर्व रोग दूर होतात.
  • सर्दी-खोकला व पड़से बरे होते आणि जुना संचित कफ पंचळून बाहेर पडतो.
  • मेंदूचे शोधन होते तसेच गेंदूच्या कोणत्याही भागात सूक्ष्म कृमी (जंतू) झाले असतील तर तेसुद्धा नष्ट होतात.
  • जालंधर बंध करून हे प्राणायाम केल्याने हायपो थायरॉइड आणि हायपर थायरॉइडमध्ये लाभ होतो. गळा, जीभ आणि श्वसननलिकेचे दोष दूर होतात.
  • निम्न रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम लाभदायक आहे.
  • या प्राणायामामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पोटातील जंत नष्ट होतात. वायुदोष, संधिवात, कंबरदुखी आणि सायटिका इ.मध्ये हा प्राणायाम लाभदायक आहे.

Chandrabhedi Pranayam Savadhagiri [Precautions in Marathi]

  • आपल्या कुवतीपेक्षा अधिक वेळ कुंभक करू नये.
  • ऊर्जायी प्राणायाम हिवाळ्यात करावा. उन्हाळ्यात तसेच पित्तप्रधान व्यक्तींसाठी हा हितकर नाही.
  • निरोगी व्यक्तीने शरीरातील उष्णता व शीतलतेचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सूर्यभेदी प्राणायामाबरोबर तितकेच चंद्रभेदी प्राणायामसुद्धा करावे, त्रिबंध करून हे प्राणायाम केल्यास ते विशेष लाभदायक ठरतात.

Surya bhedi Pranayama Mahiti, Kase Karave, Fayde in Marathi

Surya bhedi Pranayama Mahiti, Kase Karave, Fayde in Marathi

Suryabhedi Pranayam information in Marathi

  • ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण सौरमंडळाला उष्णता प्रदान करतो, त्याचप्रमाणे सूर्यभेदी प्राणायाम केल्याने शरीरातील संपूर्ण नाडीसंस्थत उष्णतेचा संचार होतो. शरीरातील सर्व योगचक्रे जागृत करण्यात हा प्राणायाम साहाय्यक आहे.
  • विशुद्धाख्य व आज्ञाचक्रावर या प्राणायामाचा विशेष प्रभाव पडतो.

सूर्यभेदी प्राणायाम कसे करावे

  • Step 1 : प्रात:काळी शौच-स्नानादीतून निवृत्त होऊन गरम आसनावर पद्मासन अथवा सुखासनात बसावे.
  • Step 2 : डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने हळूहळू दीर्घ श्वास घ्यावा. श्वास घेताना आवाज होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता आपल्या क्षमतेनुसार श्वास आतच रोखून ठेवावा.
  • Step 3 : त्यानंतर डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. अशा प्रकारे 3 ते 5 प्राणायाम करावे. काही दिवसांच्या अभ्यासाने कपाळालून घाम येऊ लागतो.
  • टीप : आंतकुमकाचा हा कालावधी काही दिवसांच्या अभ्यासाने एक ते दीड मिनिटापर्यंत वाढवू शकता.

Suryabhedi Pranayam Che Fayde [Benefits in Marathi]

  • या प्राणायामामुळे सूर्यनाडी क्रियाशील होते.
  • नियमितपणे पाच सूर्यभेदी प्राणायाम केल्याने कफजन्य सर्व रोग दूर होतात.
  • सर्दी-खोकला व पड़से बरे होते आणि जुना संचित कफ पंचळून बाहेर पडतो.
  • मेंदूचे शोधन होते तसेच गेंदूच्या कोणत्याही भागात सूक्ष्म कृमी (जंतू) झाले असतील तर तेसुद्धा नष्ट होतात.
  • जालंधर बंध करून हे प्राणायाम केल्याने हायपो थायरॉइड आणि हायपर थायरॉइडमध्ये लाभ होतो. गळा, जीभ आणि श्वसननलिकेचे दोष दूर होतात.
  • निम्न रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम लाभदायक आहे.
  • या प्राणायामामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पोटातील जंत नष्ट होतात. वायुदोष, संधिवात, कंबरदुखी आणि सायटिका इ.मध्ये हा प्राणायाम लाभदायक आहे.

Suryabhedi Pranayam Savadhagiri [Precautions in Marathi]

  • आपल्या कुवतीपेक्षा अधिक वेळ कुंभक करू नये.
  • ऊर्जायी प्राणायाम हिवाळ्यात करावा. उन्हाळ्यात तसेच पित्तप्रधान व्यक्तींसाठी हा हितकर नाही.
  • निरोगी व्यक्तीने शरीरातील उष्णता व शीतलतेचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सूर्यभेदी प्राणायामाबरोबर तितकेच चंद्रभेदी प्राणायामसुद्धा करावे, त्रिबंध करून हे प्राणायाम केल्यास ते विशेष लाभदायक ठरतात.

Pranayama Che Mahiti, Information, Benefits, Fayde in Marathi

Pranayama Che Mahiti, Information, Benefits, Fayde in Marathi

Pranayam information in Marathi. [Pranayam Mahiti]

  • प्राणायामाचा अर्थ आहे : प्राण + आयाम.
  • प्राण अर्थात जीवनशक्ती आणि आयाम अर्थात नियमन. श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया तालबद्ध करण्याचे कार्य प्राणायाम करतो.
  • ज्याप्रकारे अ‍ॅलोपॅथीमध्ये आजारांचे कारण ‘जिवाणू’ (बॅक्टेरिया), प्राकृतिक चिकित्सेमध्ये ‘विजातीय तत्व’ व आयुर्वेदामध्ये ‘आम रस’ (आहार न पचल्यामुळे नसनाड्यांमध्ये जमलेला कच्चा रस) मानला गेला आहे. त्याच प्रकारे प्राण चिकित्सेत रोगांचे कारण ‘निर्बल प्राण’ अर्थात ‘क्षीण प्राणशक्ती’ मानले गेले आहे. प्राणशक्ती क्षीण झाल्यामुळे शरीराचे अवयव ढिले होऊन योग्यप्रकारे कार्य करू शकत नाहीत. शरीरात रक्ताचा संचार प्राणांद्वारेच होतो. म्हणून प्राण निर्बल होताच रक्ताभिसरण मंद होते. पुरेसे रक्त न मिळाल्याने पेशी दुर्बळ व मृतवत होतात. तसेच योग्य प्रकारे हृदयाला रक्तस्राव न पोहोचल्यामुळे त्यात विजातीय द्रव्यांचे प्रमाण अधिक होते. परिणामी विविध रोग जडतात.
  • हे व्यावहारिक जगातही दिसून येते की उच्च प्राणबळ असलेल्या व्यक्तीला रोग तितके त्रस्त करीत नाहीत जितके दुर्बळ प्राणवळ असलेल्यास करतात.
  • प्राणायामाद्वारे भारतातील योगी हजारो वर्षापर्यंत निरोगी जीवन जगत असत, ही गोष्ट तर सनातन धर्माच्या अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे. योगचिकित्सेत औषधांना बाह्य उपचार मानले गेले आहे, याउलट प्राणायामाला आंतरिक उपचार व मूळ औषध म्हटले गेले आहे. जाबाल्योपनिषदमध्ये प्राणायामास रोगांचा नाशकर्ता म्हटले गेले आहे. शरीराच्या एखाद्या भागात प्राण जास्त असतो तर एखाद्या भागात कमी. जेथे जास्त आहे तेथून प्राणांना हटवून जेथे त्याचा अभाव किंवा कमतरता आहे तेथे प्राण भरल्याने शरीराचे रोग दूर होतात. सुषुप्त शक्तींना जागृत करून जीवनशक्तीचा विकास करण्यात प्राणायामाची महत्त्वाची भूमिका आहे.

Pranayam Che Fayde [Benefits in Marathi]

  • प्राणायामात दीर्घ श्वास घेतल्याने फुप्फुसांची बंद छिद्रे उघडतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे रक्त, नसनाड्या व मनही शुद्ध होते.
  • त्रिकालसंध्येच्या वेळी सतत चाळीस दिवस 10-10 प्राणायाम केल्याने प्रसन्नता, आरोग्यता लाभते आणि स्मरणशक्तीचा विकास होतो.
  • प्राणायाम केल्याने पाप नष्ट होतात. जसे परिश्रम केल्याने गरिबी राहत नाही तसेच प्राणायाम केल्याने पाप टिकत नाहीत. प्राणायामात श्वास घेण्याच्या आत रोखून ठेवण्याच्या, सोडण्याच्या आणि बाहेर रोखून ठेवण्याच्या वेळेचे प्रमाण क्रमशः 1:4:2:2 असे आहे. अर्थात जर श्वास घेण्यात 5 सेकंद लावले तर 20 सेकंद तो रोखून ठेवावा आणि 10 सेकंद त्याला सोडण्यात लावावे तसेच 10 सेकंद बाहेर रोखून ठेवावा. हे आदर्श गुणोत्तर आहे. हळूहळू नियमित अभ्यासाद्वारे ही स्थिती प्राप्त केली जाऊ शकते.

प्राणायामाचे काही मुख्य अंग :

  • रेचक : अर्थात श्वास बाहेर सोडणे.
  • पूरक : अर्थात श्वास आत घेणे.
  • कुंभक : अर्थात श्वास रोखून ठेवणे. श्वास आत रोखून ठेवण्याच्या क्रियेला आंतकुंभक तसेच बाहेर रोखण्याच्या क्रियेला बहिकुंभक म्हणतात.
    – ‘बाल संस्कार’ साहित्यातून…