Skip to content

Marathi New Year,
Gudi Padwa 2023

आपल्या नूतन वर्षाचा आरंभ चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात् चैत्री नवरात्रीच्या प्रतिपदेपासून होतो. वर्षाचा पहिला दिवस असल्याने याचे विशेष महत्त्व आहे. वर्षारंभाची ही मंगलदायिनी तिथी संपूर्ण वर्षाच्या सुख-दुःखाचे प्रतीक मानली जाते.

आरंभ होई चैत्रमासीचा गुढया-तोरणे सण उत्साहाचा "कवळ मुखी घालू गोडाचा" साजरा दिन हो गुढीपाडव्याचा…

When is Gudi Padwa in 202३

Gudi Padwa 2023 Panchang

Gudi Padwa Muhurat 202३ marathi

Healthcare partnerships

What is Gudi Padwa

  • चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडवा हा वर्षाचा आरंभ-दिवस मानला जातो. हा सर्व प्रकारे महत्त्वाचा आहे. एक तर नैसर्गिक रितीने – हा वसंत ऋतू आहे. गीतेच्या 10 व्या अध्यायातील 35 व्या श्लोकात भगवंताने या ऋतूचा महिमा सांगताना म्हटले आहे :

ऋतूनां कुसुमाकर: । ‘ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे.’

  • दुसरे म्हणजे ऐतिहासिक रितीने – प्रभू श्रीरामांनी या दिवशी बालीचा वध केला होता, गुढीपाडव्याला विजयपताका फडकविली. शालिवाहनने शत्रूंवर विजय मिळविला, त्यामुळे या दिवसापासून शालिवाहन शके सुरू झाले. याच दिवशी विक्रमादित्य राजाने शकांवर विजय मिळविला आणि विक्रम संवत्सर सुरू झाले. चैत्र नवरात्रीचा आरंभही याच दिवसापासून होतो. आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास हा सत्ययुगाचा आरंभदिन आहे. वर्षाच्या साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक आहे गुढीपाडवा ! हा दिवस मुहूर्ताविनाचा मुहूर्त आहे अर्थात् या संपूर्ण दिवशी शुभ मुहूर्त राहतो, पंचांगात शुभ मुहूर्त पाहावा लागत नाही. या दिवशी जितके भजन, ध्यान, जप, मौन, सेवा केली, त्याचे अनेक पट पुण्यफळ लाभते. अंतर्मुख होण्यासाठी हा अतिशय हितकर दिवस आहे.

Gudi Padwa Information in Marathi [Mahiti] कसा झाला गुढीपाडव्याचा आरंभ

  • या दिवशी मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांनी बालीच्या अत्याचारापासून लोकांना मुक्त केले होते. याच्या आनंदात लोकांनी घरोघरी गुढी उभारून उत्सव साजरा केला, म्हणून हा दिवस ‘गुढीपाडवा’ नावाने प्रचलित झाला. ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीचा आरंभ केला तेव्हा त्यावेळी या तिथीला ‘प्रवरा’ (सर्वोत्तम) तिथी सूचित केले होते. यात व्यावहारिक, धार्मिक, सामाजिक, राजनैतिक वगैरे अधिक महत्त्वाच्या अनेक कार्यांचा आरंभ केला जातो.
  • नूतन वर्षाच्या प्रथम दिनापासूनच चैत्री नवरात्रीचा उपवास सुरू होतो. 9 दिवसांचा उपवास करून देवी (शक्ती) ची उपासना केली जाते, ज्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसोबतच मानसिक प्रसन्नता व शारीरिक आरोग्याचा लाभ सहजच मिळतो.
guru-ka-mhatv.png

पूज्य बापूजींचा नूतन वर्ष संदेश

  • नव्या वर्षात नेहमी नव्या उल्हासाने, नव्या उत्साहाने रहा. जे व्यतीत झाले ते स्वप्न आहे, जे व्यतीत होत आहे ते स्वप्न आहे, जे व्यतीत होईल तेसुद्धा स्वप्न आहे आणि त्याला जाणणारा परमात्मा आपला आहे, नित्य नवीन आहे. जसे सूर्य नित्य नवीन आहे, अगदी असेच चैतन्य नित्य नवीन आहे. हसत रहा, मजेत रहा. ठीक आहे ? हसत खेळत आपला सच्चिदानंद स्वभाव प्राप्त करा.

खून पसीना बहाता जा, तान के चादर सोता जा ।
यह नाव तो हिलती जायेगी, तू हँसता जा या रोता जा ॥

  • हसत रहा, मजेत रहा. ठीक आहे ? हसत खेळत आपला सच्चिदानंद स्वभाव प्राप्त करा.

Gudi Padwa FAQ

गुढी उभारून तिच्यावर वस्त्र, छोटा तांब्या उल्टा ठेवून त्यावर झेंडूच्या फुलांची भरगच्छ माळ, कडुलिंबाच्या डहाळ्या व साखरमाळ चढवावी. त्यानंतर विधिवत पूजन करावा.

22 मार्च 2023, बुधवार

अधिक माहिती वाचा : Click Here
मुळत: महाराष्ट्र राज्यात तसेच संपूर्ण भारतात मराठी माणसं जिथे आहेत जिथे साजरा करतात.
वरील लेख वाचा
चैत्र शुक्ल प्रतिपदा (हिंदू नववर्ष)
वस्त्र, छोटा तांब्या, झेंडूच्या फुलांची भरगच्छ माळ, कडुलिंबाच्या डहाळ्या व साखरमाळ
वरील लेख वाचा
शुभेच्छा देण्यासाठी लागणाऱ्या सुंदर आणि मनमोहक डिजाईन डाउनलोड करा : Click Here
वरील लेख वाचा
चैत्र महिन्यापासून उन्हाचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे ऋतुजन्य व्याधी जसे की मुरूम-पुटकुळ्या, फोडे, घामोळ्या व इतर त्वचारोगांपासून रक्षणासाठी कडुलिंबाचे सेवन उपयोगी असते. या दिवशी आरोग्यरक्षण तसेच चंचल मनाच्या स्थिरतेसाठी कडुलिंबाची पाने खडीसाखर, मिरे, ओवा इ. सोबत प्रसादरूपात खाण्याचे विधान आहे.
संपूर्ण कथा वाचा : Click Here
नवीन वर्ष साजरा करायसाठी काही लोक दुकान चालू ठेवतात तर काही बंद.