Skip to content

दुर्भाव दूर सारूनि सद्भाव जागृत करी

नागपंचमी 2023 मराठी

Date : 21 ऑगस्ट 2023

या मध्ये आपण पाहूया...

नागपंचमी मराठी माहिती [Nag Panchami Information in Marathi]

श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. हे नागांच्या पूजेचे पर्व आहे. मनुष्य आणि नागांचा संबंध पौराणिक कथांमध्ये झळकत राहिला आहे. शेषनागाच्या सहस्र फणांवर पृथ्वी टिकून आहे, भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर शयन करतात, महादेवांच्या गळ्यात सर्पांचा हार आहे, कृष्ण-जन्माच्या वेळी नागाच्या मदतीने वसुदेवांनी यमुना ओलांडली होती. जन्मेजयने आपले पिता परीक्षित राजाच्या मृत्यूचा सूड उगविण्यासाठी सर्पांचा नाश करणारा जो सर्पयज्ञ आरंभिला होता, तो आस्तिक मुनींच्या सांगण्यावरून याच पंचमीला बंद करण्यात आला. एवढेच नव्हे तर समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नागाने देवांची मदतही केली होती. म्हणून नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे नागपंचमी !

नागपंचमी श्रावण महिन्यातच का साजरी केली जाते ?

पावसाळ्यात पावसाचे पाणी हळूहळू जमिनीत जिरून ते सापांच्या बिळांतही भरते. म्हणून श्रावण महिन्यात साप सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात बाहेर पडतात. त्यावेळी त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच सर्पभय व सर्पविषापासून मिळविण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवशी नागपूजा, उपवास वगैरेंची परंपरा सुरू झाली.

नागपंचमी ची पूजा कशी करावी [Nag Panchami Pooja Vidhi in Marathi]

  • या दिवशी काही लोक उपवास करतात. नागपूजेसाठी दाराच्या दोन्ही बाजूला शेणाने किंवा गेरुने वा तांदळाचे पीठ व हळद यांच्या मिश्रणाचा ओला लेप बनवून नाग बनविला जातो. काही काही ठिकाणी मुंजीच्या दोरीला 7 गाठी मारून तिला सापाचा आकार देतात. जमिनीवर शेणाने सारवून किंवा पाटावर नागाचे चित्र काढतात. मग हळद कुंकू व फुले वाहतात आणि कच्चे दूध, खीर, लाह्या-फुटाणे इ. चा नैवेद्य दाखवून नागपूजा केली जाते. जेथे सापाचे बीळ दिसेल तेथे कच्चे दूध व लाह्या-फुटाणे अर्पण केले जातात. या दिवशी सर्पदर्शन अत्यंत शुभ मानले जाते.
  • नागपूजा करताना या 12 प्रसिद्ध नागांची नावे घेतली जातात धृतराष्ट्र, कर्कोटक, अश्वतर, शंखपाल, पद्म, कंबल, अनंत, शेष, वासुकी, पिंगल, तक्षक, कालिय. यांना आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी सूर्यास्तानंतर जमीन खोदणे वर्जित आहे.
  • नागपंचमी ची कथा वाचा : Click Here

नागांची पूजा का केली जाते ?

  • नागांविषयी सर्वसामान्य समज असा आहे की हा एक खूप भयंकर जीव आहे, जो पाहताक्षणीच मनुष्याला दंश करतो. परंतु ही धारणा खरी नाही. सापांच्या खूपच कमी जाती विषारी असतात आणि विषारी सापही बहुधा तेव्हाच दंश करतात जेव्हा त्यांना छेडले जाते किंवा ते पायाखाली दाबले जातात. जंगलात, शेतात माणूस जर खाली पाहून चालत असेल तर सापाने त्याला दंश करण्याचे काही कारणच नाही. या संभ्रमित धारणांचा आपल्या मनावर असा वाईट परिणाम झाला आहे की आपण सापाला माणसाचा जन्मजात शत्रू समजले आहे व त्याला पाहताच मनात भीतीचा संचार होतो आणि मग लगेच त्याला मारण्यासाठी आपल्याकडे काठी वगैरे आहे की नाही याकडे लक्ष जाते. आपल्या मनात त्याला मारण्याची भावना जागृत होताच आपल्या श्वासोच्छ्वासांद्वारे हीच भावना त्याच्या हृदयातही उत्पन्न होते. परिणामी आपली दुर्भावनाच त्याला हिंसक बनविते.
  • नागपूजेद्वारे सापांप्रती बनलेल्या या दुर्भावनेचे व भ्रांतीचे निराकरण केले जाते. या दिवशी नागांना दूध, सुगंधी फुले वाहून श्रद्धा-भक्तीने त्यांची देवतेच्या रूपात पूजा केली जाते. स्तुतीच्या रूपात त्यांच्या गुणांचे वर्णन ऐकून आपल्या हृदयात त्यांच्याप्रती असलेली दुर्भावना क्षीण होते, ज्यामुळे आपण त्यांना शत्रू नव्हे तर ईश्वरीय सृष्टीचा आपल्यासारखाच एक जीव समजू लागतो. तेव्हा आपल्या मनाची ती अधीरता आणि भीती, जी त्याला पाहताच जागृत व्हायची, ती पूर्णतः शांत होते. लोकांच्या मनातील त्या भितीच्या भावनेचे निराकरण आणि सद्भावनेची जागृती हाच नागपंचमीचा उद्देश असू शकतो. भितीमुळे आपल्या शरीरात हानिकारक द्रव्ये बनतात आणि सद्भावनेने हितकारक भगवद्प्रसादजा मती देणारी रसायने बनतात. नागांच्या पूजेत किती उदार दृष्टिकोण दडलेला आहे ! किती अद्भुत मनोविज्ञान आहे !

साप आहेत शेतांचे राखणदार

भारत कृषिप्रधान देश आहे. साप शेतांचे रक्षण करतात, म्हणून त्यांना राखणदार (क्षेत्रपाल) असे म्हणतात. जीव-जंतू, उंदीर वगैरे जे पिकांची नासाडी करतात, त्यांचा नाश करून साप आपल्या शेतांना हिरवेगार ठेवतात. अशा प्रकारे साप मानव जातीच्या पोषण-व्यवस्थेचे रक्षण करतात. म्हणून अशा रक्षकाची आपण नागपंचमीला पूजा करतो.

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छ्या

WhatsApp, Facebok, Instagram व अन्य सोशल प्लॅटफॉर्म वर Status साठी उपयोगी Images, Text व Video सर्व काही बघा किंवा डाउनलोड करा :

Frequently Asked Questions

21 ऑगस्ट 2023

Updated Soon
वरील महितीत नागपंचमी ची पूजा कशी करावी हे पूर्ण वाचा.
उपवास करून नागांची पूजा करावी.