Skip to content
Guru Paduka Pujan in Marathi

Guru Paduka Pujan in Marathi [गुरु चरणकमलों का माहात्म्य]

    ॥ श्री सदगुरु परमात्मने नम: ॥
  • सर्व हात जोडून प्रार्थना करतील –
    गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर: ।
    गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम: ।।
  • पूर्ण प्रार्थना वाचण्यासाठी – Click Here

श्री सद्गुरूदेव के चरणकमलों का माहात्म्य मराठी [Guru Paduka Pujan in Marathi]

सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजम्‌ ।
वेदान्तार्थप्रवक्तािरं तस्मात्संपूजयेद्‌ गुरुम्‌ ॥

गुरूंचे चरणकमल हे सर्व श्रुतिरूप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित असे आहेत आणि वेदान्ताच्या अर्थांचे वक्ते आहेत. म्हणून श्री गुरुदेवांची उपासना करावी.

देही ब्रह्म भवेद्यस्मात्‌ त्वत्कृपार्थ वदामि तत्‌ ।
सर्वपापविशुद्धात्मा श्रीगुरो: पादसेवनात्‌ ॥

ज्या गुरुदेवांच्या चरणांच्या आश्रयाने मनुष्य सर्व पापांपासून शुद्ध आत्मा बनतो आणि ब्रह्म होतो, मी तुम्हाला त्यांची कृपा मिळावी म्हणून हे सांगतो.

शोषणं पापपंकस्य दीपनं ज्ञानतेजस: ।
गुरो: पादोदकं सम्यक्‌ संसारार्णवतारकम्‌ ॥

श्री गुरुदेव यांचे चरणामृत हे पापरूप चिखलाचे संपूर्ण शोषक, ज्ञानतेजाला प्रज्वलित करणारे आणि संसारसागराचे संपूर्ण तारक आहे.

अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारकम्‌ ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ गुरुपादोदकं पिबेत्‌ ॥

अज्ञानाचे मूळ काढून टाकणारे, अनेक जन्मांचे कर्म दूर करणारे, ज्ञान आणि वैराग्य सिद्ध करणारे श्री गुरुदेव यांच्या चरणामृताचे सेवन करावे.

काशीक्षेत्रं निवासश्च जाह्नवी चरणोदकम्‌ ।
गुरुविश्वेश्वर: साक्षात्‌ तारकं ब्रह्मनिश्चय: ॥

गुरुदेव यांचे वास्तव्य म्हणजे काशी क्षेत्र, गंगा नदी म्हणजे श्री गुरुदेवांचे चरणामृत आहेत. गुरुदेव भगवान विश्वनाथ आहेत आणि अर्थातच साक्षात तारक ब्रह्म आहेत.

गुरुसेवा गया प्रोक्ता देह: स्यादक्षयो वट:।
तत्पादं विष्णुपादं स्यात्‌ तत्र दत्तमनस्ततम्‌ ॥

गुरुदेवांची केवळ सेवा हीच तीर्थराज गया आहे. गुरुदेव यांचे शरीर हे अक्षय वटवृक्ष आहे. गुरुदेवांचे श्रीचरण म्हणजे भगवान विष्णूचे श्रीचरण. तिथे तल्लीन झालेले मन परस्पर तदाकार होते.

सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानफलं तु यत्‌ ।
गुरुपादपयोबिन्दो: सहस्रांशेन तत्फलम्‌ ॥

साता-समुद्रापार असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून प्राप्त झालेले पुण्य म्हणजे श्री गुरुदेवांच्या चरणामृतातील एका थेंबाचा एक हजारवा भाग आहे.

दृश्यविस्मृतिपर्यन्तं कुर्याद्‌ गुरुपदार्चनम्‌ ।
तादृशस्यैव कैवल्यं न च तद्व्यतिरेकिण: ॥

जोपर्यंत दृष्टीला दिसणाऱ्या प्रपंचाची विस्मृती होत नाही तोपर्यंत गुरुदेवांच्या पवित्र चरणाची पूजा केली पाहिजे. केवळ असे करणाराच कैवल्यपद मिळवितो, जो उलट करतो त्याला मिळत नाही.

पादुकासनशय्यादि गुरुणा यदभीष्टितम् ।
नमस्कुर्वीत तत्सर्वं पादाभ्यां न स्पृशेत् क्वचित् ।।

पादुका, आसन, पलंग वगैरे जे काही गुरुदेवांच्या उपयोगात येते त्या सर्वांना नमस्कार केला पाहिजे आणि त्यांना पायाने कधीही स्पर्श करु नये.

विजानन्ति महावाक्यं गुरोश्चरणसेवया ।
ते वै संन्यासिनः प्रोक्ता इतरे वेषधारिणः ॥

जे लोक गुरुदेवांच्या चरणी सेवा करून महावाक्याचा अर्थ समजतात तेच खरे संन्यासी असतात, इतर फक्त वेषधारी असतात.

चार्वाकवैष्णवमते सुखं प्राभाकरे न हि ।
गुरोः पादान्तिके यद्वत्सुखं वेदान्तसम्मतम् ॥

गुरुदेवांच्या चरणी जो वेदांत-निर्दिष्ट आनंद आहे तो चार्वाक मतांमध्ये किंवा वैष्णव मतांमध्ये किंवा प्रभाकर (सांख्य) मतांमध्ये नाही.

गुरुभावः परं तीर्थमन्यतीर्थ निरर्थकम् ।
सर्वतीर्थमयं देवि श्रीगुरोश्चरणाम्बुजम् ॥

गुरु-भक्ती ही सर्वोत्तम तीर्थ आहे. इतर तीर्थक्षेत्रे निरर्थक आहेत. हे देवी! गुरुदेवांचे चरणकमल सर्वव्यापी आहेत.

सर्वतीर्थावगाहस्य संप्राप्नोति फलं नरः ।
गुरोः पादोदकं पीत्वा शेषं शिरसि धारयन् ।।

श्री सदगुरुंचे चरणामृत प्राशन केल्याने आणि मस्तकावर धारण केल्याने सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे फळ प्राप्त होते.

गुरुपादोदकं पानं गुरोरुच्छिष्टभोजनम् ।
गुरुमूर्तेः सदा ध्यानं गुरोनाम्नः सदा जपः ।।

गुरुदेवांचे चरणामृत प्यावे, गुरुदेवांच्या अन्नातून उरलेले अन्न खावे, गुरुदेवांच्या मूर्तीचे चिंतन करावे आणि गुरूंच्या नावाचा जप करावा.

यस्य प्रसादादहमेव सर्व मय्येव सर्व परिकल्पितं च ।
इत्थ विजानामि सदात्मरूपं तस्यांधिपा प्रणतोऽस्मि नित्यम् ।।

मी सर्व आहे, माझ्यामध्ये सर्व काही कल्पित आहे, असे ज्ञान ज्यांच्या कृपेने झाले आहे अश्या आत्मस्वरूप श्री गुरुदेवांच्या चरण-कमलांना मी नित्य नमस्कार करतो. 

आकल्पजन्मकोटीनां यशवततपः क्रियाः ।
ताः सर्वाः सफला देवि गुरुसन्तोषमात्रतः ॥

हे देवी ! युगांपासून, लाखो जन्मोजन्मी केलेले यज्ञ, उपवास, तपस्या आणि षोडशोपचार, हे सर्व केवळ गुरुदेवांच्या प्रसन्नतेने यशस्वी होतात.

मनोमन अशी भावना करा की आपण गुरुदेवांचे चरण धूत आहोत...

  • सप्ततीर्थांच्या जलाने त्यांच्या चरणांचा अभिषेक  करीत आहोत. त्या चरणांचे दर्शन करत, मोठ्या आदर आणि कृतज्ञतेने आपण त्यांना प्रेमाने स्नान घालत आहोत.
  • त्यांच्या तेजस्वी कपाळावर शुद्ध चंदनाचा टिळा लावत आहोत.
  • अक्षता वाहत आहोत.
  • आपल्या स्वत: च्या हातांनी बनवलेल्या सुंदर गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करून, आपण आपले हात पवित्र करीत आहोत.
  • हात जोडून, ​​आपले डोके टेकवत, आपण आपला अहंकार त्यांना समर्पित करीत आहोत. गुरुदेवांच्या चरणी आपण पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि अकरावे मन यांच्या कृती समर्पित करत आहोत.

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्याऽऽत्मना वा प्रकृतेः स्वभावात् ।
करोमि यद् यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ।।

  • शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांसह, बुद्धीने किंवा नैसर्गिक स्वभावाने जे काही करतो ते समर्पित करत आहोत. हे गुरुदेव, आमचे जे कर्म आहेत ते सर्व तुमच्या चरणी समर्पित आहेत. आमची भोगण्याची भावना, आमची उपभोगण्याची भावना आपल्या चरणी समर्पित आहे. अशा प्रकारे, सद्गुरू परमात्म्याच्या कृपेने, ज्ञानाने आणि आत्म-शांतीने तुमचे अंतःकरण भरुन त्यांच्या अमृत वचनांवर दृढ राहून अंतर्मुख होत जा, आनंदी होत जा …
  • ॐ आनंद ! ॐ आनंद ! ॐ आनंद !

इतरांना शेयर करा...

थोडक्यात - हेही वाचा

नियमित महत्वाची माहिती हवी आहे ?

Must Read

सर्वाधिक वाचलेले

आमच्याशी जुडा

पोस्ट आपल्या व्हाट्सप्प वर मागविण्यासाठी आम्हाला आपलं नाव, गांव/शहर व जिल्हा मैसेज करा