Uttarayan Wishes in Marathi
मकर संक्रांत अर्थात् उत्तरायण महापर्वाच्या दिवसापासून अंधकारमय रात्र लहान होत जाईल आणि प्रकाशमय दिवस मोठे होत जातील. आपणही या दिवशी दृढ निश्चय करावा की आपल्या जीवनातून अंधकारमय वासनेची वृत्ती कमी करीत जाऊ आणि सेवा व प्रभुप्राप्तीची सद्वृत्ती वाढवित जाऊ.
जसे सूर्यनारायण उदित होऊन आपल्या उज्ज्ज्वल किरणांनी, तेजोमय आभेने भूमंडळास प्रकाशित करतात, अगदी तसेच हे मानव ! तू स्वत: उन्नत हो आणि सुर्याप्रमाणे आपले आत्मतेज विकसित कर.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
उत्तरायण पर्व मधुर संदेश देते की 'तुमच्या जीवनात स्निग्धता व गोडवा वाढवा. आकाशात पतंग उडविण्याचे तात्पर्य आहे - जीवनात थोडे मोकळ्या आकाशात या. स्वत:ला गुरफटून त्रस्त होऊ नका. इंद्रियांच्या त्या गोलकांमध्ये स्वतःला सतवू नका, चिदाकाशस्वरूपात या.'
सूर्यदेवाच्या उपासनेसाठी उत्तरायण पर्व अर्थात् मकर संक्रांतीचा दिवस विशेष प्रभावशाली मानला जातो. मकर राशीत सूर्याच्या प्रवेशाला 'मकर संक्रांती' असे म्हणतात.
मराठीत उत्तरायणाच्या शुभेच्छा
Makar Sankranti Shubhechha in Marathi
ज्या प्रमाणे सूर्याचा रथ दक्षिणेकडून उत्तरेकडे चालला आहे , त्याचप्रमाणे तुम्ही तुमची अधोमुखी चित्तवृत्ती बदलून ऊर्ध्वगामी करा.
तुमच्या जीवनाच्या संक्रांतीचे ध्येय हेच असावे की तुम्ही पुन्हा जन्म मिळू नये, बस ! मृत्यूला घाबरण्याची गरज नाही, मृत्यूला घाबरून कोणीही मृत्युपासून वाचलेले नाही. परंतु पुन्हा जन्मच होऊ नये असा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, मग पुन्हा मृत्यूही येणार नाही.
हजारो जन्मांचे काम तू एका जन्मात पूर्ण करा ! या दिवसापासून तुझा जीवन-रथ उन्नतीकडे चालावा. या दिवशी दृढ निश्चय कर की, ‘आता मी उन्नतीच्या दिशेने वाटचाल करीन अर्थात शुभ संकल्प करीन ,सुसंग आणि सुज्ञान प्राप्त करीन.
उत्तरायणाच्या पर्वाला गुळ आणि तीळ – तिळाची स्निग्धता आणि गुळाच्या गोड्व्याचे मिश्रण करून महाराष्ट्रात एकमेकांना लाडू वाटतात. त्याचप्रमाणे तुम्ही देखील एकमेकांवर स्निग्धता व मधुरतेचा आपल्या आत्म-परमात्म्यासोबत वर्षाव करत जा.
सूर्याला अर्घ्य दिल्याने मनोकामना पूर्ण होतात. कोवळ्या सूर्य प्रकाशात सूर्य स्नान केल्याने आणि नाभीत सूर्याचे ध्यान केल्याने मंदाग्नी दूर होतो आणि आरोग्या लाभ होतो. सूर्यनमस्कार केल्याने शक्ती आणि ओज-तेजाची वृद्धी होते.
मराठीत मकर संक्रांती शुभेछा
उत्तरायण म्हणजे सूर्याचा रथ उत्तरेकडे सरकतो. उत्तरायणाच्या दिवशी केलेले सत्कर्म अनंत पट होते.
मकर संक्रांतीचा लाभ घ्या – या दिवशी सकाळी लवकर उठून जो तिळमिश्रित पाण्याने स्नान करतो त्याला 10,000 गो दानाचे फळ मिळते. या दिवशी सूर्यनारायणाचे मनोमन ध्यान करून त्यांच्याकडे दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना केल्याने प्रार्थना विशेष प्रभावशाली होते.