Play Audio Mp3
Nirjala Ekadashi 2023 Date
- एकादशी व्रत : शनिवार, 31 मे 2023 (उपवास)
- एकादशी तिथी आरंभ : मंगळवार, 30 मे 2023 ला दुपारी 01:07 वाजता पासून
- एकादशी तिथी समाप्त : बुधवार, 31 मे 2023 ला दुपारी 01:45 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी
- 31 मे – निर्जला-भीम एकादशी (स्मार्त) आणि 31 मे – निर्जला-भीम एकादशी (भागवत)
Nirjala Ekadashi Vrat Katha in Marathi
- धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले : जनार्दन ! ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचे माहात्म्य सांगण्याची कृपा करावी.
- भगवान श्रीकृष्ण म्हणाले : राजन् ! या एकादशीचे वर्णन परम धर्मात्मा सत्यवतीनंदन श्री व्यास मुनी करतील, कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेद-वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत.
- महर्षी वेदव्यास म्हणाले : दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीने पवित्र व्हावे व फुले वाहून श्रीकेशवाची पूजा करावी. मग नित्य पूजा-पाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करवून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन् ! प्रसूती वा मृत्यूनंतर लागलेल्या सुतकातही एकादशीला निराहार रहावे.
- भीमसेन म्हणाले : परम बुद्धिमान पितामह ! माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल व सहदेव हे एकादशीला कधी भोजन करीत नाहीत आणि मलाही नेहमी हेच सांगतात की ‘भीमसेन ! तूसुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस.’ परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही.
- भीमसेनचे बोलणे ऐकून व्यास मुनी म्हणाले : जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षांतील एकादशीला भोजन करू नकोस.
- भीमसेन : महाबुद्धिमान पितामह ! मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही, मग उपवास करून अगदी निराहार तर मी कसा बरे राहू शकेन ? माझ्या पोटात वृक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो, म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच हा शांत होतो. हे महामुनी! मी वर्षभरात केवळ एकच उपवास करू शकतो. म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल, असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन.
- महर्षी व्यास म्हणाले : भीम ! ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीत असो वा मिथुन राशीत असो, शुक्ल पक्षात जी एकादशी येते, तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे, याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होते.
- एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत् सर्व कार्ये पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करवून नंतर स्वतः भोजन करावे.
- वर्षभरात जितक्या एकादशी असतात, त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते, यात यत्किंचितही शंका नाही. शंख-चक्र-गदाधारी श्रीहरींनी मला सांगितले होते की ‘जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मलाच शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांतून मुक्त होतो.’
- एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विक्राळ आकृतिधारी आणि काळ्या रंगाचे दंड-पाशधारी भयंकर यमदूत जात नाहीत. अंतकाळी पीतांबरधारी, सौम्य स्वभावाचे, हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी.
- स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वताएवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे (पाणी न पिणे) पालन करतो, तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यवधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते, असे म्हटले जाते.
- मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इ. जे काही करतो ते सर्व अक्षय होते, हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिवत् व्रत-उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो, तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते.
- जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील, ते परम पदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे, ते जरी ब्रह्महत्यारे, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकांतून मुक्त होतात.
- हे कुंतिनंदन ! निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री-पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहे, ते ऐका : या दिवशी सागरात शयन करणाऱ्या श्रीविष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टान्नांद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे, त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी शंभर पिढ्यांना वैकुंठात पोहोचविले आहे.
- निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो, तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचे माहात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो. चतुर्दशीयुक्त अमावास्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो, तेच पुण्यफळ या एकादशीचे माहात्म्य श्रवण केल्यानेही लाभते.
- प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की ‘मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही.’ द्वादशीला देवेश्वर भगवान श्रीविष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विधिवत् पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा :
देवदेव हृषीकेश संसारार्णवतारक ।
उदकुम्भप्रदानेन नय मां परमां गतिम् ॥
- ‘भवसागरातून तारणारे हे देवाधिदेव हृषीकेश ! या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परम गती द्यावी.’ (पद्म पुराण, उत्तर खंड : ५३.६०)
- भीमसेन ! निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य श्रीविष्णूंच्या सान्निध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत् व्रत करतो तो निष्पाप होऊन परम पद प्राप्त करतो.
- हे ऐकून भीमसेननेही हे शुभ एकादशी व्रत सुरू केले. तेव्हापासून ही ‘पांडव द्वादशी’ म्हणून प्रसिद्ध आहे.
Nirjala Ekadashi Pooja Vidhi and Muhurat in Marathi
बुधवार, 31 मे 2023
द्वादशीला – उपवास सोडण्याची विधी : Click Here
- एकादशी तिथी आरंभ : मंगळवार, 30 मे 2023 ला दुपारी 01:07 वाजता पासून
- एकादशी तिथी समाप्त : बुधवार, 31 मे 2023 ला दुपारी 01:45 वाजता पर्यंत एकादशी त्यानंतर द्वादशी
निर्जला एकादशी सहजतेने कशी करावी ?
- सकाळी सूर्योदयापूर्वी पोटभर पाणी प्यावे.
- जर घरात देशी गायीचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वी 25 ते 50 ग्रॅम कोमट पाण्यासोबत प्यावे. यामुळे तहान-भुकेची तीव्रता कमी होईल, व्रत पूर्ण करणे सोपे होईल.
- सूर्योदयापूर्वी लिंबू व खडीसाखर मिश्रीत पाणी (लिंबू सरबत) पिल्याने तहान कमी लागेल.
- दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते एक तास ठेवून मग आंघोळ केल्याने तहानेचा त्रास होणार नाही. मुलतानी मातीमध्ये पलाशची पावडर किंवा ताक, लिंबू अथवा यापैकी कोणतीही एक वस्तू टाकल्याने तहानेची तीव्रता कमी होईल.
- विनाकारण घरातून बाहेर जाऊ नका, धावपळ करु नका म्हणजे घाम येणार नाही. जेवढा कमी घाम येईल तेवढी तहान कमी लागेल, शक्य असल्यास मौन ठेवा, जप-ध्यान करा, सत्संग ऐका, शास्त्र वाचा.
निर्जला एकादशीला काय करावे आणि काय करू नये ?
- या दिवशी गुळणा अथवा आचमनाशिवाय तोंडात पाणी घेऊ नये, व्रत भंग होते.
- एकादशीच्या सूर्योदयापासून दूसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जल त्याग केल्यास व्रत पूर्ण होते. द्वादशीला स्नानादितून निवृत्त होऊन भोजन करावे. वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात, त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशीमुळे मनुष्यास प्राप्त होते, यात थोडीही शंका नाही. भगवान केशवाने मला म्हटले होते की, ‘जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांमधून मुक्त होतो.’
- मेरू पर्वतासमान पाप देखिल या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होतात. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे पालन करतो, त्याला एका-एका प्रहरात कोटि-कोटि स्वर्णमुद्रा दान करण्याचे फळ प्राप्त होते, असे ऐकले आहे. ‘मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्रातः पुण्य स्नान, दान, जप, यज्ञ इ. जे काही करतो, ते सर्व अक्षय होते.’ हे भगवान श्री कृष्णांचे कथन आहे. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहन करतो, तो पापाचे भोजन करतो. तो या लोकात चांडाळासमान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो. जो मनुष्य या एकादशीला उपवास करून दान करेल, त्याला परम पदाची प्राप्ती होईल.
- अधिक माहितीसाठी वाचा एकादशी व्रत विधी पोस्ट :- Click Here
निर्जला एकादशीचे व्रत सोडण्याचा विधी :-
- दूसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानानंतर आपला जपाचा नियम करून मग सूर्याला अर्घ्य देवून व्रत सोडावे.
- 7 फुटाण्यांचे (एका फुटाण्याचे दोन तुकडे) 14 भाग हातात घेवून उभे रहावे. 14 तुकडे एक मागे एक पुढे असे फेकत जावे, की ‘ माझ्या सर्व पाप- संतापांचा नाश होवो, अंतःकरण शुद्ध होवो ॐ ॐ ॐ…..
- काही फुटाणे खा, ज्यामुळे जमा झालेला कफ फुटाण्यांसोबत शरीरातून बाहेर येईल. त्यानंतर कोमट पाण्यात लिंबू सरबत (अल्प प्रमाणात सेंधव मीठ टाकावे) बनवून प्यावे.
- एक दिड तासानंतर खूप पातळ मूग (मिरची-मसाल्याशिवाय हळद, कोथंबिर टाकून) किंवा मूगाचे पाणी एक चमचा तूप टाकून प्यावे.
- संपूर्ण दिवस कोमट पाणी पिल्यास उत्तम, कोणतीही पचणास जड वस्तू खाऊ नये. संपूर्ण दिवस मूग खाल्ल्यास अतिउत्तम.
- नोट :- तुम्ही स्वस्थ असाल तर निर्जला व्रत करा हे सर्वोत्तम होईल, तुम्हाला संपूर्ण पुण्यलाभ देखील होईल. जर तुमचे स्वास्थ्य अथवा वय निर्जला ठेवण्यास परवानगी देत नसेल (तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रूग्न असाल तर सजला ठेवा, जर सजला देखील ठेवू शकत नसाल तर केवळ दुधावर रहा, जर हे देखील शक्य नसेल तर फळ व दुधावर रहा.