Dhanurasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Dhanurasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Dhanurasana information in Marathi. [Dhanurasana Mahiti]

  • या आसनात शरीराचा आकार धनुष्यासारखा बनतो. एकमेकांना खेचणाऱ्या पायांचा व हातांचा आकार धनुष्याच्या प्रत्यंचेसारखा होतो. म्हणून याला ‘धनुरासन’ म्हणतात.
  • ध्यान मणिपूर चक्रात. श्वास खालच्या स्थितीत रेचक व वरील स्थितीत पूरक करावा.

Dhanurasan Kase Karave [ धनुरासन कसे करावे]:

  • Step 1 : जमिनीवर अंथरलेल्या कांबळ्यावर पालथे झोपा. दोन्ही पाय एकमेकांशी जुळवून ठेवा.
  • Step 2 : आता दोन्ही पाय उचलून गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हात पाठीमागे नेऊन दोन्ही पायांचे घोटे पकडा.
  • Step 3 : रेचक करून छाती, डोके व हाताने पकडलेल्या पायांना खेचून हळूहळू वर उचला. शक्य होईल तितके डोके मागील बाजूस नेण्याचा प्रयत्न करा. दृष्टी देखील वर आणि मागील बाजूस असली पाहिजे. हात सरळ व ताठ ठेवा. पायसुद्धा ताठ ठेवा. दोन्ही गुडघे एकाच रेषेत ठेवा. संपूर्ण शरीराचा भार केवळ पोटावर (नाभीवर) राहील. कंबरेपासून वरील शरीर तसेच कंबरेखालील भाग वरच्या बाजूस वाकविलेल्या स्थितीत राहील.
  • Step 4 : कुंभक करून याच स्थितीत टिकून रहा.
  • Step 5 : त्यानंतर हात सोडून पाय आणि डोके मूळ स्थितीत न्या व पूरक करा.
  • विशेष : प्रारंभी पाच सेकंद हे आसन करावे व नंतर हळूहळू वेळ वाढवत तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ या आसनाचा अभ्यास करा. तीन चार वेळा हे आसन केले पाहिजे.

Dhanurasana Che Fayde [Benefits in Marathi]

  • धनुरासनाच्या सरावाने :
  1. मलावरोधाचा त्रास होत नाही.
  2. धनुरासनाच्या अभ्यासाने पोटाची चरबी कमी होते. गॅस दूर होतो. पोटाचे रोग नाहीसे होतात. वायूरोग नष्ट होतो. पोटाच्या भागात रक्ताचा संचार जास्त प्रमाणात होतो.
  3. पोटाच्या स्नायूंवर ताण पडल्याने पोटावर खूपच चांगला प्रभाव पडतो. आतड्यांवर खूप दाब पडल्याने पोटाच्या अवयवांवरही दबाव पडतो. त्यामुळे आतड्यांमध्ये पाचकरसाचे प्रमाण वाढते व जठराग्नी प्रदीप्त होतो. भूक वाढते. पचनशक्ती वाढते तसेच पोटात दुखत असल्यास दुखणे दूर होते.
  4. सरकलेली नाभी आपल्या स्थानी येते. नाभी यथास्थानी आल्यावरही या आसनाचा सराव अवश्य केला पाहिजे. जो या आसनाचा सदैव सराव करीत राहतो त्याची नाभी कधीही सरकत नाही.
  5. लठ्ठपणा दूर करण्यात या आसनाची मदत होते. लठ्ठ व्यक्तींनी दररोज 10-15 मिनिटे सराव केला पाहिजे.
  6. पाठीचा कणा लवचीक बनतो आणि वार्धक्य लवकर येत नाही.
  7. छातीचे दुखणे बंद होते. हृदयाची धडधड दूर होऊन हृदय मजबूत होते.
  8. गळ्याचे सर्व रोग दूर होऊन आवाज मधुर बनतो. श्वसन क्रिया व्यवस्थीत चालते. मुखाकृती सुंदर बनते. शरीराचे सौंदर्य वाढते. डोळ्यांचे तेज वाढते व सर्व रोग दूर होतात. हाता-पायांचे थरथर कापणे बंद होते.
  9. धनुरासनात भुजंगासन व शलभासनाचा समावेश होत असल्याने या दोन्ही आसनांचा फायदा या आसनाने होतो. स्त्रीयांसाठी हे आसन खूपच लाभकारक आहे. याने मासिक धर्माचे सर्व विकार, गर्भाशयाचे सर्व रोग दूर होतात.
  10. रोग दूर करण्यातही हे आसन मुख्य मानले गेले आहे. मधुमेह, गॅस व आतड्यांचा त्रास असणाऱ्या रुग्णांना हे आसन वरदानस्वरूप आहे. ज्यांना कोणताही आजार नसेल आणि जे निरोगी राहू इच्छितात, त्यांनी दररोज या आसनाचा सराव करावा.
  11. जो दररोज हलासन, मयूरासन व धनुरासन करतो तो कधीही आळशी बनत नाही. तो नेहमी उत्साही, कार्यशील व शक्तिशाली राहतो.

Dhanurasana Savadhagiri [Precautions in Marathi]

  • हर्नियाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन मुळीच करू नये.