Siddhasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Siddhasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]

Siddhasana information in Marathi [Siddhasana Mahiti]

  • अलौकिक सिद्धी प्रदान करणारे हे आसन असल्यामुळे याचे नाव सिद्धासन पडले आहे. सिद्ध योग्यांचे हे प्रिय आसन आहे. यमांमध्ये ब्रह्मचर्य श्रेष्ठ आहे, नियमांमध्ये शौच श्रेष्ठ आहे तसेच आसनांमध्ये सिद्धासन श्रेष्ठ आहे.
  • सिद्धासनासारखे दुसरे आसन नाही, केवली कुंभकासारखा प्राणायाम नाही, खेचरी मुद्रेसमान अन्य मुद्रा नाही आणि अनाहत नादासारखा दुसरा नाद नाही.
  • विशेष : ध्यान आज्ञाचक्रात आणि श्वास दीर्घ स्वाभाविक.

Siddhasana Kase Karave [सिद्धासन कसे करावे] :

  • Step 1 : आसनावर बसून पाय मोकळे सोडा.
  • Step 2 : आता डाव्या पायाची टाच, गुदा आणि जननेंद्रियाच्यामध्ये ठेवा.
  • Step 3 : उजव्या पायाची टाच जननेंद्रियाच्या वर अशा प्रकारे ठेवा जेणेकरून जननेंद्रिय व अंडकोषावर दाब पडणार जाही. पायांचा क्रम बदलू शकता. दोन्ही पायांचे तळवे जांघेच्या मध्य भागात राहावे.
  • Step 4 : तळवे वरच्या बाजूस राहतील अशा प्रकारे दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. किंवा दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत ठेवा.
  • Step 5 : डोळे उघडे किंवा बंद ठेवा. श्वासोच्छ्वास आरामात स्वाभाविक चालू द्या. भ्रूमध्यात, आज्ञाचक्रात ध्यान केंद्रित करा. पाच मिनीटांपासून तीन तासांपर्यंत या आसनाचा अभ्यास करु शकता. ध्यानाची उच्च कक्षा आल्यावर शरीरावरील मनाची पकड दूर होते.

Siddhasana Che Fayde [Benefits in Marathi]

  • सिद्धासनाच्या अभ्यासाने शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण होते. प्राणतत्त्व स्वाभाविकपणे उर्ध्वगामी होते. यामुळे मन एकाग्र करणे सोपे जाते.
  • पचनक्रिया नियमित होते. श्वासाचे रोग, हृदय रोग, जीर्णज्वर, अजीर्ण, अतिसार, शुक्रदोष इ. दूर होतात. मंदाग्नि, मुरडा, संग्रहणी, वातविकार, क्षय, दमा, मधुमेह, प्लीहाची वाढ इ. अनेक रोगांचे निराकरण होते.
  • पद्मासनाच्या अभ्यासाने जे रोग दूर होतात ते सिद्धासनाच्या अभ्यासानेही दूर होतात.
  • ब्रह्मचर्य पालनासाठी हे आसन विशेष साहाय्यक आहे. विचार पवित्र होतात. मन एकाग्र होते. सिद्धासनाचा अभ्यासक भोग विलासापासून वाचू शकतो.
  • 72 हजार नाड्यांचा मल या आसनाच्या अभ्यासाने दूर होतो. वीर्याचे रक्षण होते. स्वप्नदोष होत असलेल्या रोग्याने हे आसन अवश्य केले पाहिजे.
  • योगीजन सिद्धासनाच्या अभ्यासाने वीर्याचे रक्षण करून प्राणायामाद्वारे त्यास मस्तिष्काकडे घेऊन जातात ज्यामुळे वीर्य ओज व मेधाशक्तीत परिणत होऊन दिव्यतेचा अनुभव करविते. मानसिक शक्तींचा विकास होतो.
  • कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी हे आसन प्रथम पायरी आहे.
  • सिद्धासनात बसून जे काही वाचले जाते ते चांगल्या प्रकारे लक्षात राहते. विद्यार्थ्यांसाठी हे आसन विशेष लाभदायक आहे.
  • जठराग्नि प्रदीप्त होतो. चित्त स्थिर राहते ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
  • आत्म्याचे ध्यान करणारा योगी जर मिताहारी राहून बारा वर्षे सिद्धासनाचा अभ्यास करेल तर त्याला सिद्धी प्राप्त होतात.
  • सिद्धासन सिद्ध झाल्यानंतर इतर आसनांची काही गरजच राहत नाही.
  • सिद्धासनाने केवल किंवा केवली कुंभक सिद्ध होतो. सहा महिन्यातही केवली कुंभक सिद्ध होऊ शकतो आणि अशा सिद्ध योग्याच्या दर्शन-पूजनाने पातके नष्ट होतात, मनोकामना पूर्ण होतात.
  • सिद्धासनाच्या प्रतापाने निर्बीज समाधी सिद्ध होते. मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालंधर बंध आपोआप लागतात.

Siddhasana Savadhagiri [Precautions in Marathi]

  • सिद्धासन महापुरुषांचे आसन आहे. सामान्य माणसाने हट्टपूर्वक याचा उपयोग करू नये, अन्यथा लाभाऐवजी हानीच होण्याची शक्यता आहे.