Suryabhedi Pranayam information in Marathi
- ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण सौरमंडळाला उष्णता प्रदान करतो, त्याचप्रमाणे सूर्यभेदी प्राणायाम केल्याने शरीरातील संपूर्ण नाडीसंस्थत उष्णतेचा संचार होतो. शरीरातील सर्व योगचक्रे जागृत करण्यात हा प्राणायाम साहाय्यक आहे.
- विशुद्धाख्य व आज्ञाचक्रावर या प्राणायामाचा विशेष प्रभाव पडतो.
सूर्यभेदी प्राणायाम कसे करावे
- Step 1 : प्रात:काळी शौच-स्नानादीतून निवृत्त होऊन गरम आसनावर पद्मासन अथवा सुखासनात बसावे.
- Step 2 : डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने हळूहळू दीर्घ श्वास घ्यावा. श्वास घेताना आवाज होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता आपल्या क्षमतेनुसार श्वास आतच रोखून ठेवावा.
- Step 3 : त्यानंतर डाव्या नाकपुडीने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. अशा प्रकारे 3 ते 5 प्राणायाम करावे. काही दिवसांच्या अभ्यासाने कपाळालून घाम येऊ लागतो.
- टीप : आंतकुमकाचा हा कालावधी काही दिवसांच्या अभ्यासाने एक ते दीड मिनिटापर्यंत वाढवू शकता.
Suryabhedi Pranayam Che Fayde [Benefits in Marathi]
- या प्राणायामामुळे सूर्यनाडी क्रियाशील होते.
- नियमितपणे पाच सूर्यभेदी प्राणायाम केल्याने कफजन्य सर्व रोग दूर होतात.
- सर्दी-खोकला व पड़से बरे होते आणि जुना संचित कफ पंचळून बाहेर पडतो.
- मेंदूचे शोधन होते तसेच गेंदूच्या कोणत्याही भागात सूक्ष्म कृमी (जंतू) झाले असतील तर तेसुद्धा नष्ट होतात.
- जालंधर बंध करून हे प्राणायाम केल्याने हायपो थायरॉइड आणि हायपर थायरॉइडमध्ये लाभ होतो. गळा, जीभ आणि श्वसननलिकेचे दोष दूर होतात.
- निम्न रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम लाभदायक आहे.
- या प्राणायामामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पोटातील जंत नष्ट होतात. वायुदोष, संधिवात, कंबरदुखी आणि सायटिका इ.मध्ये हा प्राणायाम लाभदायक आहे.
Suryabhedi Pranayam Savadhagiri [Precautions in Marathi]
- आपल्या कुवतीपेक्षा अधिक वेळ कुंभक करू नये.
- ऊर्जायी प्राणायाम हिवाळ्यात करावा. उन्हाळ्यात तसेच पित्तप्रधान व्यक्तींसाठी हा हितकर नाही.
- निरोगी व्यक्तीने शरीरातील उष्णता व शीतलतेचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सूर्यभेदी प्राणायामाबरोबर तितकेच चंद्रभेदी प्राणायामसुद्धा करावे, त्रिबंध करून हे प्राणायाम केल्यास ते विशेष लाभदायक ठरतात.