Chandrabhedi Pranayama Mahiti, Kase Karave, Fayde in Marathi

Chandrabhedi Pranayama Mahiti, Kase Karave, Fayde in Marathi

Chandrabhedi Pranayam information in Marathi. [Yoga Mudrasana Mahiti]

  • आपल्या शरीराच्या सर्व क्रियांचे नियमन सौम्य (शीत) तत्त्व आणि अग्नी (उष्ण) तत्त्वाद्वारेच होते. यातील संतुलन बिघडल्यावर विविध व्याधी उद्भवतात. उदा.- सौम्य तत्त्वात वृद्धी झाल्यावर शीत गुणाच्या प्राबल्याने वात-कफजन्य रोग जडतात तसेच अग्नितत्त्वाची वृद्धी झाल्यावर उष्ण गुणाच्या प्राबल्याने पित्तजन्य रोग जडतात. दोन्ही तत्त्वांमध्ये संतुलन टिकून राहिल्यास आरोग्य व दीर्घायुष्य लाभते. हेच संतुलन टिकवून ठेवण्यासाठी निरोगी व्यक्तीने सूर्यभेदी व चंद्रभेदी प्राणायामाचा सम प्रमाणात नियमित अभ्यास करावा. या तत्त्वांमध्ये कधी विषमता झाल्यास उत्पन्न लक्षणांनुसार प्राणायाम करून पुन्हा संतुलन स्थापित करावे. उदा.- हिवाळा असल्यास सूर्यभेदी प्राणायाम करावे आणि उन्हाळा असल्यास चंद्रभेदी प्राणायाम करावे. आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी, होमियोपॅथी इ. कोणत्याही चिकित्सा पद्धतींद्वारे व्याधींमध्ये इतका शीघ्र लाभ होत नाही, जितका या प्राणायाम चिकित्सेच्या अभ्यासाने होतो.

चंद्रभेदी प्राणायाम कसे करावे

  • याची कृती सूर्यभेदी प्राणायामाच्या अगदी विरुद्ध आहे. जाणून घ्या, सूर्यभेदी प्राणायामाची कृती : Click Here
  • यात डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घेऊन आंतकुमक करावे. नंतर उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. अशा प्रकारे 3 ते 5 प्राणायाम करावे.

Chandrabhedi Pranayam Che Fayde [Benefits in Marathi]

  • या प्राणायामामुळे सूर्यनाडी क्रियाशील होते.
  • नियमितपणे पाच सूर्यभेदी प्राणायाम केल्याने कफजन्य सर्व रोग दूर होतात.
  • सर्दी-खोकला व पड़से बरे होते आणि जुना संचित कफ पंचळून बाहेर पडतो.
  • मेंदूचे शोधन होते तसेच गेंदूच्या कोणत्याही भागात सूक्ष्म कृमी (जंतू) झाले असतील तर तेसुद्धा नष्ट होतात.
  • जालंधर बंध करून हे प्राणायाम केल्याने हायपो थायरॉइड आणि हायपर थायरॉइडमध्ये लाभ होतो. गळा, जीभ आणि श्वसननलिकेचे दोष दूर होतात.
  • निम्न रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम लाभदायक आहे.
  • या प्राणायामामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि पोटातील जंत नष्ट होतात. वायुदोष, संधिवात, कंबरदुखी आणि सायटिका इ.मध्ये हा प्राणायाम लाभदायक आहे.

Chandrabhedi Pranayam Savadhagiri [Precautions in Marathi]

  • आपल्या कुवतीपेक्षा अधिक वेळ कुंभक करू नये.
  • ऊर्जायी प्राणायाम हिवाळ्यात करावा. उन्हाळ्यात तसेच पित्तप्रधान व्यक्तींसाठी हा हितकर नाही.
  • निरोगी व्यक्तीने शरीरातील उष्णता व शीतलतेचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सूर्यभेदी प्राणायामाबरोबर तितकेच चंद्रभेदी प्राणायामसुद्धा करावे, त्रिबंध करून हे प्राणायाम केल्यास ते विशेष लाभदायक ठरतात.