Haircut Rules Information in Marathi: केस कापण्याचे नियम
- शास्त्रांचे ज्ञान लोक विसरून जात आहेत, म्हणून आज चिंता, दुःख, उद्विग्नता, विषाद वगैरे वाढत आहेत. पूज्य बापूजींनी शास्त्रदोहन करून कित्येक जीवनोपयोगी विधींच्या ज्ञानाने समाजाला लाभान्वित केले आहे. यात क्षौरकर्म (केशकर्तन) सुद्धा येते. पूज्यश्री म्हणतात : “आपल्या शास्त्रांनी मुंडण केव्हा केले पाहिजे, केस केव्हा कापले पाहिजे याचाही शोध लावला आहे. रविवारी जे लोक मुंडण करतात अथवा केस कापतात, त्यांच्या धन-बुद्धी आणि धर्माची हानी होते. रविवारी, मंगळवारी व शनिवारी केस तर कापतात, पर्वा करीत नाहीत; परंतु बिचाऱ्यांच्या जीवनात त्या त्या ग्रहांचा कुप्रभाव तर पहायला मिळतोच.
- पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून दाढी हजामत केली पाहिजे. यामुळे आयुष्य वाढते, दाढी-हजामतीनंतर स्नान न करणे हे आयुष्याचा नाश करणारे आहे. (महाभारत, अनुशासन पर्व : 104.128, 139)
- आपल्या कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीने बुधवार व शुक्रवार सोडून इतर दिवशी केस कापू नये.
- सोमवारी केस कापल्याने शिवभक्तीची हानी होते. पुत्रवान व्यक्तीने या दिवशी केस कापू नये.
- मंगळवारी केस कापणे मृत्यूस कारणीभूत ठरू शकते.
- बुधवारी नखे व केस कापल्याने धनप्राप्ती होते.
- गुरुवारी केस कापल्याने धनहानी व मानहानी होते.
- शुक्रवार लाभ आणि यशाची प्राप्ती करविणारा आहे.
- शनिवारी केस कापणे मृत्यूस कारणीभूत ठरू शकते.
- रविवार तर सूर्यदेवाचा दिवस आहे; या दिवशी केस कापल्याने धन, बुद्धी आणि धर्माची हानी होते.
- (‘श्री उडिया बाबांचे उपदेश’ मधून) हाता-पायांची नखे नियमितपणे कापावीत. नखे वाढवू नये. – ऋषी प्रसाद, डिसेंबर 2012