Play Audio Mp3 Purusha Suktam
Purusha Suktam Lyrics with Meaning in Marathi
- जो चतुर्मासात भगवान विष्णूसमोर उभे राहून ‘पुरुष सूक्त’ चा पाठ करतो, त्याची बुद्धी कुशाग्र होते.
ॐ श्री गुरुभ्यो नमः ।
हरिः ओम् ।
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात ।
स भूमिँ सर्वतः स्पृत्वाऽत्चतिष्ठद्यशाङ्गुलम् ।।1।।
जो सहस्त्र मस्तकधारी, सहस्त्र नेत्रधारी आणि सहस्त्र चरण असलेला विराट पुरुष आहे. तो संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापूनही दहा अंगुल शेष राहतो. (1)
पुरुषऽएवेवँ सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् ।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ।।2।।
जी सृष्टी बनली आहे, जी बनणार आहे, ती सर्व विराट पुरुषच आहे. या अमर जीव जगाचाही तोच स्वामी आहे आणि जे अन्नाद्वारे विकसित होतात, त्यांचाही तोच स्वामी आहे. (2)
एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः ।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ।।3।।
विराट पुरुषाचा महिमा अगाध आहे. या श्रेष्ठ पुरुषाच्या एका चरणात सर्व प्राणी आहेत आणि तीन भाग अनंत अंतरिक्षात स्थित आहेत.(3)
त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः ।
ततो विष्वङ् व्यक्रामत्साशनानशनेऽअभि ।।4।।
चार भाग असणान्या विराट पुरुषाच्या एका भागात हा संपूर्ण संसार जड व चेतन अशा विविध रूपांमध्ये सामावलेला आहे. याचे तीन भाग अनंत अंतरिक्षात समाविष्ट आहेत.(4)
ततो विराडजायत विराजोऽअधि पूरुषः ।
स जातोऽअत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ।।5।।
या विराट पुरुषातूनच या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. त्या विराटातून समष्टी जीवाची उत्पत्ती झाली. तोच देहचारीच्या रूपात सर्वश्रेष्ठ बनला, ज्याने सर्वप्रथम पृथ्वीला आणि नंतर देहधारींना उत्पन्न केले. (5)
तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् ।
पशूँस्ताँश्चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याश्च ये ।।6।।
त्या सर्वश्रेष्ठ विराट प्रकृती यज्ञातून दहीयुक्त तूप मिळाले (ज्याने विराट पुरुषाची पूजा होते). वायुदेवाशी संबंधित पशु अर्थात् हरिण, गाय, घोडा इत्यादींची उत्पत्ती या विराट पुरुषाद्वारेच झाली आहे. (6)
तस्माद्यज्ञात् सर्वहुतऽऋचः सामानि जज्ञिरे ।
छन्दाँसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ।।7।।
त्या विराट यज्ञपुरुषातूनच ऋग्वेद व सामवेदाचे प्रागट्य झाले. त्याच्यापासूनच यजुर्वेद व अथर्ववेदाचा प्रादुर्भाव झाला अर्थात् वेदांच्या ऋचांचे प्रागट्य झाले. (7)
तस्मादश्वाऽजायन्त ये के चोभयादतः ।
गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाताऽअजावयः ।।8।।
त्या विराट यज्ञपुरुषातून दोन्हीकडे दात असणारे घोडे उत्पन्न झाले आणि त्याच विराट पुरुषातून गायी, बकल्या, मेंढ्या इ. पशूंचीही उत्पत्ती झाली. (8)
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन् पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवाऽअयजन्त साध्याऽऋषयश्च ये ।।9।।
मंत्रद्रष्टा ऋषी व योगाभ्यासींनी सर्वप्रथम प्रगट झालेल्या पूजनीय विराट पुरुषाला यज्ञात (सृष्टीच्या पूर्वी विद्यमान महान ब्रह्मांडरूपी यज्ञ अर्थात् सृष्टी यज्ञ) समाविष्ट करून त्याच यज्ञरूपी परम पुरुषातून यज्ञाचे (आत्मयज्ञ) प्रागट्य केले. (9)
यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् ।
मुखं किमस्यासीत किं बाहू किमूरू पादाऽउच्येते ।।10।।
संकल्पाद्वारे प्रगट झालेल्या ज्या विराट पुरुषाचे ज्ञानीजन विविध प्रकारे वर्णन करतात, ते त्याची किती प्रकारे कल्पना करतात ? त्याचे मुख कोणते आहे ? बाहू, मांड्या आणि पाय कोणकोणते आहेत ? शरीर-संरचनेत तो पुरुष कशा प्रकारे पूर्ण बनला ? (10)
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्याँ शूद्रोऽअजायत ।।11।।
विराट पुरुषाचे मुख ब्राह्मण अर्थात ज्ञानीजन (विवेकवान पुरुष) बनले. क्षत्रिय अर्थात् पराक्रमी पुरुष त्याच्या शरीरात विद्यमान बाहूंच्या समान आहेत. वैश्य अर्थात् पोषणशक्तिसंपन्न मनुष्य त्याच्या मांड्या आणि सेवाधर्मी मनुष्य त्याचे पाय बनले. (11)
चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत ।
श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत ।।12।।
विराट पुरुष परमात्म्याच्या मनापासून चंद्र, डोळ्यांपासून सूर्य, कानांपासून वायू व प्राण तसेच मुखापासून अग्नीचे प्रागट्य झाले. (12)
नाभ्याऽआसीदन्तरिक्षँ शीर्ष्णो द्यौः समवर्त्तत ।
पद्भ्याँ भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ२ऽकल्पयन् ।।13।।
विराट पुरुषाच्या नाभीतून अंतरिक्ष, डोक्यातून द्युलोक, पायांतून भूमी व कानांतून दिशांचे प्रागट्य झाले. अशाच प्रकारे नाना लोकींची रचना करण्यात आली आहे. (13)
यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत ।
वसन्तोऽस्यासीदाज्यं ग्रीष्मऽइध्मः शरद्धविः ।।14।।
जेव्हा देवांनी विराट पुरुषाला हवी (यज्ञात) तूप टाकण्याची लाकडी पळी) मानून यज्ञाचा श्रीगणेशा केला, तेव्हा घृत (तूप) वसंत ऋतू इंधन (समिधा ) ग्रीष्म ऋतू आणि यज्ञसामग्री शरद ऋतू बनले. (14)
सप्तास्यासन् परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वानाऽअबध्नन् पुरुषं पशुम् ।।15।।
देवांनी ज्या यज्ञाचा विस्तार केला, त्यात विराट पुरुषालाच पशू (हव्य) रूपाच्या भावनेने बांधले. त्यात यज्ञाच्या सात परिधी (सप्त समुद्र) आणि एकवीस समिधा (छद) उत्पन्न झाल्या. (15)
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ।।16।।
आदिश्रेष्ठ धर्मपरायण देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरूप विराट सत्तेचे पूजन केले. यज्ञीय जीवन जगणारे धार्मिक महात्मा पूर्वीच्या साध्य देवतांचा निवास असलेल्या स्वर्गात जातात. (16)
ॐ शांति: ! शांति: !! शांति: !!! (यजुर्वेदः 31.1-16)
सूर्यासमान तेजस्वी, निरहंकारी तो विराट पुरुष आहे, ज्याला जाणल्यानंतर साधक किंवा उपासकाला मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षप्राप्तीचा हाच मार्ग आहे. याहून भिन्न दुसरा कोणताही मार्ग नाही. (यजुर्वेद: 31.18)