... तर सिकंदर विजयी झाला असता !
- सिकंदर जात होता. डायोजिनीस आकाशाकडे न्याहाळत होते, तेथे गेला. संत डायोजिनीसची आत्मधुंदी, आनंद व माधुर्याचे जीवन पाहून सिकंदर म्हणाला : “मला ईर्ष्या होत आहे. तुमच्याकडे काही जास्त साधने नाहीत, तुम्ही जमिनीवर पहुडला आहात तरीही इतके सुखी व प्रसन्न दिसत आहात की मोठमोठे सम्राटही इतके आनंदित आल्हादित नसतात !… मला दुसरा जन्म मिळेल तेव्हा मीसुद्धा या सोडून जाणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणार नाही, मीसुद्धा डायोजिनीस बनणार.
- डायोजिनीस म्हणाले “बनणार काय ? आता वर्तमान क्षणाला गमवित आहेस, वेडा आहेस. आता बन पहुडण्याची जागा आहे, बसण्याची जागा आहे, खाण्या-पिण्याचेही येते, मिळत राहते… मग कशाला दगदग करीत आहेस ? वर्तमान क्षणाला गमविले आणि विचार केला की भविष्यात येऊ, करू…’ तर मुश्किल आहे येणे, करणे.”
- “नाही, मी परत येतो, मग भेटतो तुम्हाला….”
- “तू परतू शकणार नाहीस.”
- “मी विश्वविजयासाठी जात आहे.”
- “सिकंदर ! आपल्या प्राकृत स्वभावावर विजय मिळवायचा आहे. इच्छांवर विजय मिळवून आत्मविश्रांती मिळवायची आहे. जे खूप जवळ आहे अशा चंचल आणि वासनेच्या पुंजरूप मनावर विजय मिळवायचा आहे. जो हा खरा विजय सोडून दुसऱ्यांवर आपला प्रभाव जमवून त्यांची लूटमार करून विजयी बनतो, तो हारतच जातो. जो लोकांवर अत्याचार करून दबाव टाकून, काही “डावपेच आखून बाहेरच्या वस्तूंना, व्यक्तींना आपल्या अधीन करतो, तो तर त्या वस्तू, व्यक्तींच्या अधीन होत आहे. तो तर हारत जाईल आणि मृत्यूचा झटका त्याला पराजयात मूर्च्छित करून टाकेल.”
- “नाही, आता मला जाऊ द्या. मी विजयाच्या, यात्रेवर निघालो आहे.”
- “सिकंदर ! विजयाच्या यात्रेवर निघाला आहेस तर ये, बस… आपल्या आत्मस्वभावात विश्रांती मिळव, विजय होईल.”
- “यावेळी तर नाही, मग परतल्यावर करेन.”
- डायोजिनीस म्हणाले : “सिकंदर ! तू परतू शकणार नाहीस.”
- आणि झालेही असेच !… तो खरोखर परतू शकला नाही. रस्त्यातच मेला !… या देहाचा कोणताही भरवसा नाही आणि मनुष्याच्या इच्छांचा कोणताही अंत नाही. जो वर्तमान क्षणाला ईश्वरप्राप्तीत लावत नाही तो भविष्यात येऊन ईश्वरप्राप्ती करेल, ही तर शेखचिल्लीचा किल्ला बनविण्यासारखी गोष्ट आहे.
– ऋषी प्रसाद, सप्टेंबर 2020
- शिक्षण घेणे, डिग्री मिळविणे तर ठीक आहे पण दीक्षेविना मिळविलेल्या डिग्री (पदव्या) दुसऱ्यांना शोषित करून धनाचे ढीग लावण्यात आयुष्य बरबाद करून टाकतील अथवा मोठमोठ्या पदांवर पोहोचवून आपल्या अहंकाराच्या मोठेपणात फसवून वास्तविक आत्म-ईश्वराच्या मोठेपणापासून वंचित करून टाकतील.