Yoga Mudrasana information in Marathi. [Yoga Mudrasana Mahiti]
- योगाभ्यासात ही मुद्रा अत्यंत महत्त्वाची असल्याने या आसनाचे नाव ‘योगमुद्रासन’ ठेवण्यात आले आहे. तुम्ही आध्यात्मिक उद्देशाने योगमुद्रासन करीत असल्यास आसनाचा कालावधी रुची व शक्तीनुसार वाढवावा.
Yoga Mudrasana Kase Karava [योगमुद्रासन कसे करावे]
- Step 1 : पद्मासनात बसून डोळे बंद करावेत. दोन्ही हात पाठीच्या मागे न्यावेत.
- Step 2 : डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडावे. दोन्ही हात खेचून माकडहाड असते तेथे ठेवावेत.
- Step 3 : श्वास हळूहळू सोडत कपाळ जमिनीला टेकवावे. काही वेळ या स्थितीत थांबून आराम करावा आणि श्वास सामान्य रूपाने चालू द्यावा.
- विशेष : मग हळूहळू दीर्घ श्वास घेत डोके उचलून शरीर पुन्हा सरळ करावे आणि श्वास सामान्य रूपाने चालू द्यावा. ही क्रिया 4-5 वेळा करावी. सुरुवातीला हे आसन कठीण वाटल्यास सुखासन अथवा सिद्धासनात बसून करावे. पूर्ण लाभ तर पद्मासनात बसून केल्यानेच होतो. सामान्यतः हे आसन 3 मिनिटांपर्यंत केले पाहिजे.
Yoga Mudrasana Che Fayde [Benefits in Marathi]
- जठराग्नी प्रदीप्त होतो. गॅस, अपचन, बद्धकोष्ठ इ. पोटाचे रोग दूर होतात.
- सुटलेले पोट आत जाते. शरीर सुडौल व मजबूत बनते.
- आतड्यांच्या सर्व तक्रारी दूर होतात. हृदय मजबूत बनते.
- रक्ताचे विकार दूर होतात. कुष्ठरोग व यौन-विकार नष्ट होतात.
- मानसिक व बौद्धिक बळ वाढते.
- नाडीतंत्राला, विशेषतः कमरेच्या नाडीमंडळाला बळ मिळते.
- स्वादुपिंड क्रियाशील होऊन मधुमेहाला नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे आसन हितकारी आहे.
- पाठीच्या कण्याचे सर्व मणके एकमेकांपासून मोकळे होऊन सुषुम्ना नाडीला शुद्ध व हलके करतात, ज्यामुळे मेंदूच्या क्रियांमध्ये विशेष स्फूर्ती येते.
- मणिपूर चक्र जागृत होते, जे प्रत्येक मनुष्यात दडलेल्या शक्तीचे एक मुख्य केंद्र आहे.
- विशेष : धातुदौर्बल्यात योगमुद्रासन खूप लाभदायक आहे.
Yoga Mudrasana Savadhagiri [Precautions in Marathi]
- योगासनानंतर लगेच काहीही खाऊ-पिऊ नये. फक्त एक किंवा दोन घोट पाणी पिऊ शकता.