Play Audio
Bhaja Govindam Lyrics & Meaning in Marathi
भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते ।
संप्राप्ते सन्निहिते काले, न हि न हि रक्षति डुकृञ् करणे ॥1॥
- हे मोहग्रसित बुद्धीवाल्या मित्रा, गोविंदाची आराधना कर, गोविंदाचे नाम घे, गोविंदाला प्रेम कर कारण मृत्युसमयी व्याकरणाचे नियम आठवणीत ठेवल्याने तुमचे रक्षण होऊ शकत नाही. ||1||
मूढ़ जहीहि धनागमतृष्णाम्, कुरु सद्बुद्धिमं मनसि वितृष्णाम् ।
यल्लभसे निजकर्मोपात्तम्, वित्तं तेन विनोदय चित्तं ॥2॥
- हे मोहित बुद्धी ! धन एकत्रित करण्याच्या लोभाचा त्याग कर. तुझ्या मनातून या सर्व कामनांचा त्याग कर. सत्य पथाचे अनुसरण कर. स्वतःच्या परिश्रमाने जे धन प्राप्त होईल त्यातच आपले मन प्रसन्न ठेव ||2||
नारीस्तनभरनाभीदेशम्, दृष्ट्वा मागा मोहावेशम् ।
एतन्मान्सवसादिविकारम्, मनसि विचिन्तय वारं वारम् ॥3॥
- स्त्री शरीरावर मोहित होऊन आसक्त होऊ नको. मनात वारंवार स्मरण कर की हे हाडमासाच्या विकारा व्यतिरीक्त दुसरे काहीही नाही. ||3||
यावद्वित्तोपार्जनसक्त:, तावन्निजपरिवारो रक्त: ।
पश्चाज्जीवति जर्जरदेहे, वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ॥5॥
- जोपर्यंत व्यक्ति धनोपार्जनात समर्थ आहे, तोपर्यंत कुटुंबात सर्वजण त्याच्या प्रती स्नेह प्रदर्शित करतात. परंतू अशक्त झाल्यावर त्याची सामान्य चर्चेतही विचारपूस होत नाही. ।।5।।
बालस्तावत् क्रीडासक्त:, तरुणस्तावत् तरुणीसक्त: ।
वृद्धस्तावच्चिन्तासक्त:, परे ब्रह्मणि कोऽपि न सक्त: ॥7॥
- बालपणी खेळांमध्ये रुची असते, युवावस्थेत युवा स्त्रीप्रति आकर्षण असते, वृद्धावस्थेत चिंताग्रस्त राहतात,पण ईश्वरावर कोणी प्रेम करित नाही. ।।7।।
सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वं ।
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्ति: ॥9॥
- सत्संगाने वैराग्य, वैराग्याने विवेक, विवेकाने स्थिर तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. ॥9॥
वयसि गते कः कामविकार:, शुष्के नीरे क: कासार: ।
क्षीणे वित्ते क: परिवार:, ज्ञाते तत्त्वे क: संसार: ॥10॥
- वय झाल्यावर कामभाव राहत नाही, पाणी सुकल्यावर तलाव राहत नाही, धन गेल्यावर परिवार राहत नाही आणि तत्वज्ञान झाल्यावर संसार राहत नाही. ।।11।।
मा कुरु धनजनयौवनगर्वं, हरति निमेषात्काल: सर्वं ।
मायामयमिदमखिलम् हित्वा, ब्रह्मपदम् त्वं प्रविश विदित्वा ॥11॥
- धन, शक्ति आणि तारुण्यावर गर्व करू नको, काळ क्षणभरात यांना नष्ट करुण टाकतो. हे विश्व मायेने घेरलेले आहे, हे समजून तू ब्रह्मपदात प्रवेश कर. ।।11।।
पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम् ।
इह संसारे बहुदुस्तारे, कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥21॥
- पुन्हा-पुन्हा जन्म, पुन्हा-पुन्ह मृत्यु, पुन्हा-पुन्हा आईच्या गर्भात शयन करणे, या संसारातून पार होणे खूप कठिण आहे. हे कृष्ण ! कृपा करून यांपासून माझे रक्षण कर. ।।21।।
कस्त्वं कोऽहं कुत आयात:, का मे जननी को मे तात: ।
इति परिभावय सर्वमसारम्, विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम् ॥23॥
- तू कोण आहेस, मी कोण आहे, कोठून आलो आहे, माझी आई कोण आहे, माझे वडिल कोण आहेत ? सर्व प्रकारे या विश्वाला असार समजून याचा स्वप्नवत त्याग कर. ।।23।।
शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ, मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ ।
सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं, सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम् ॥25॥
- शत्रु, मित्र, पुत्र, बंन्धु-बांधवांशी प्रेम आणि द्वेष करू नको. सर्वांमध्ये स्वत:लाच बघ. अशा प्रकारे सर्वत्र भेदरूपी अज्ञानाचा त्याग कर. ।।25।।
सुखत: क्रियते रामाभोग:, पश्चाद्धन्त शरीरे रोग: ।
यद्यपि लोके मरणं शरणं, तदपि न मुञ्चति पापाचरणम् ॥28॥
- सुखासाठी लोक आनंद-भोग उपभोगतात, त्याच्यानंतर या शरीरात रोग उत्पन्न होतात, जरीही या पृथ्वीवर सर्वांचा मृत्यु सुनिश्चित आहे तरीही लोक पापमय आचरण सोडत नाहीत. ॥28॥
गुरुचरणाम्बुज निर्भर भक्त:, संसारादचिराद्भव मुक्त: ।
सेन्द्रियमानस नियमादेवं, द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवम् ॥31॥
- गुरूंच्या चरणकमलांनाच आश्रय माननारा भक्त बनून या संसाराच्या आवागमनातून कायमच्यासाठी मुक्त होऊन जा. अशाप्रकारे मन तसेच इंद्रियांचा निग्रह करून आपल्या हृदयात विराजमान ईश्वराचे दर्शन करा. ॥31॥




![[तुळशी विवाह] Tulsi Vivah 2023 Vidhi, Muhurat, Katha, Mahiti Marathi](https://balsanskarkendra.org/marathi/wordpress/wp-content/uploads/2022/09/Tulsi-vivah-marathi.jpg)

![Diwali Captions for Instagram in Marathi [Whatsapp, Facebook]](https://balsanskarkendra.org/marathi/wordpress/wp-content/uploads/2022/09/Diwali-captions-marathi.jpg)
![Siddhasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]](https://balsanskarkendra.org/marathi/wordpress/wp-content/uploads/2022/04/BSK-M-Yoga-Siddhasana.jpg)
![Dhanurasana in Marathi [Kase Karave, Fayde, Mahiti]](https://balsanskarkendra.org/marathi/wordpress/wp-content/uploads/2022/04/BSK-M-Yoga-Dhanurasana-Small.jpg)
![Padmasana in Marathi [Kase Karava, Fayde, Mahiti]](https://balsanskarkendra.org/marathi/wordpress/wp-content/uploads/2022/04/BSK-M-Yoga-Padmasana-Small.jpg)


