Bhaja Govindam Lyrics in Marathi Meaning| PDF| Mp3 Download

Bhaja Govindam Lyrics in Marathi Meaning| PDF| Mp3 Download

Play Audio

Bhaja Govindam Lyrics & Meaning in Marathi

भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढ़मते ।
संप्राप्ते सन्निहिते काले, न हि न हि रक्षति डुकृञ् करणे ॥1॥

  • हे मोहग्रसित बुद्धीवाल्या मित्रा, गोविंदाची आराधना कर, गोविंदाचे नाम घे, गोविंदाला प्रेम कर कारण मृत्युसमयी व्याकरणाचे नियम आठवणीत ठेवल्याने तुमचे रक्षण होऊ शकत नाही. ||1||

मूढ़ जहीहि धनागमतृष्णाम्, कुरु सद्बुद्धिमं मनसि वितृष्णाम् ।
यल्लभसे निजकर्मोपात्तम्, वित्तं तेन विनोदय चित्तं ॥2॥

  • हे मोहित बुद्धी ! धन एकत्रित करण्याच्या लोभाचा त्याग कर. तुझ्या मनातून या सर्व कामनांचा त्याग कर. सत्य पथाचे अनुसरण कर. स्वतःच्या परिश्रमाने जे धन प्राप्त होईल त्यातच आपले मन प्रसन्न ठेव ||2||

नारीस्तनभरनाभीदेशम्, दृष्ट्वा मागा मोहावेशम् ।
एतन्मान्सवसादिविकारम्, मनसि विचिन्तय वारं वारम् ॥3॥

  • स्त्री शरीरावर मोहित होऊन आसक्त होऊ नको. मनात वारंवार स्मरण कर की हे हाडमासाच्या विकारा व्यतिरीक्त दुसरे काहीही नाही. ||3||

यावद्वित्तोपार्जनसक्त:, तावन्निजपरिवारो रक्त: ।
पश्चाज्जीवति जर्जरदेहे, वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ॥5॥

  • जोपर्यंत व्यक्ति धनोपार्जनात समर्थ आहे, तोपर्यंत कुटुंबात सर्वजण त्याच्या प्रती स्नेह प्रदर्शित करतात. परंतू अशक्त झाल्यावर त्याची सामान्य चर्चेतही विचारपूस होत नाही. ।।5।।

बालस्तावत् क्रीडासक्त:, तरुणस्तावत् तरुणीसक्त: ।
वृद्धस्तावच्चिन्तासक्त:, परे ब्रह्मणि कोऽपि न सक्त: ॥7॥

  • बालपणी खेळांमध्ये रुची असते, युवावस्थेत युवा स्त्रीप्रति आकर्षण असते, वृद्धावस्थेत चिंताग्रस्त राहतात,पण ईश्वरावर कोणी प्रेम करित नाही. ।।7।।

सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वं ।
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्ति: ॥9॥

  • सत्संगाने वैराग्य, वैराग्याने विवेक, विवेकाने स्थिर तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. ॥9॥

वयसि गते कः कामविकार:, शुष्के नीरे क: कासार: ।
क्षीणे वित्ते क: परिवार:, ज्ञाते तत्त्वे क: संसार: ॥10॥

  • वय झाल्यावर कामभाव राहत नाही, पाणी सुकल्यावर तलाव राहत नाही, धन गेल्यावर परिवार राहत नाही आणि तत्वज्ञान झाल्यावर संसार राहत नाही. ।।11।।

मा कुरु धनजनयौवनगर्वं, हरति निमेषात्काल: सर्वं ।
मायामयमिदमखिलम् हित्वा, ब्रह्मपदम् त्वं प्रविश विदित्वा ॥11॥

  • धन, शक्ति आणि तारुण्यावर गर्व करू नको, काळ क्षणभरात यांना नष्ट करुण टाकतो. हे विश्व मायेने घेरलेले आहे, हे समजून तू ब्रह्मपदात प्रवेश कर. ।।11।।

पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम् ।
इह संसारे बहुदुस्तारे, कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥21॥

  • पुन्हा-पुन्हा जन्म, पुन्हा-पुन्ह मृत्यु, पुन्हा-पुन्हा आईच्या गर्भात शयन करणे, या संसारातून पार होणे खूप कठिण आहे. हे कृष्ण ! कृपा करून यांपासून माझे रक्षण कर. ।।21।।

कस्त्वं कोऽहं कुत आयात:, का मे जननी को मे तात: ।
इति परिभावय सर्वमसारम्, विश्वं त्यक्त्वा स्वप्न विचारम् ॥23॥

  • तू कोण आहेस, मी कोण आहे, कोठून आलो आहे, माझी आई कोण आहे, माझे वडिल कोण आहेत ? सर्व प्रकारे या विश्वाला असार समजून याचा स्वप्नवत त्याग कर. ।।23।।

शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ, मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ ।
सर्वस्मिन्नपि पश्यात्मानं, सर्वत्रोत्सृज भेदाज्ञानम् ॥25॥

  • शत्रु, मित्र, पुत्र, बंन्धु-बांधवांशी प्रेम आणि द्वेष करू नको. सर्वांमध्ये स्वत:लाच बघ. अशा प्रकारे सर्वत्र भेदरूपी अज्ञानाचा त्याग कर. ।।25।।

सुखत: क्रियते रामाभोग:, पश्चाद्धन्त शरीरे रोग: ।
यद्यपि लोके मरणं शरणं, तदपि न मुञ्चति पापाचरणम् ॥28॥

  • सुखासाठी लोक आनंद-भोग उपभोगतात, त्याच्यानंतर या शरीरात रोग उत्पन्न होतात, जरीही या पृथ्वीवर सर्वांचा मृत्यु सुनिश्चित आहे तरीही लोक पापमय आचरण सोडत नाहीत. ॥28॥

गुरुचरणाम्बुज निर्भर भक्त:, संसारादचिराद्भव मुक्त: ।
सेन्द्रियमानस नियमादेवं, द्रक्ष्यसि निज हृदयस्थं देवम् ॥31॥

  • गुरूंच्या चरणकमलांनाच आश्रय माननारा भक्त बनून या संसाराच्या आवागमनातून कायमच्यासाठी मुक्त होऊन जा. अशाप्रकारे मन तसेच इंद्रियांचा निग्रह करून आपल्या हृदयात विराजमान ईश्वराचे दर्शन करा. ॥31॥

Free Download

Bhaja Govindam Lyrical Video

Guru Stotram Lyrics in Marathi, PDF, Mp3 Download, Benefits

Play Audio : Guru Stotram Download Mp3 Marathi

Shri Guru Stotram Lyrics with Meaning in Marathi

श्री गुरु महिमा
श्री गुरु स्तोत्रम्
।। श्रीमहादेव्युवाच ।।
गुरुर्मन्त्रस्य देवस्य धर्मस्य तस्य एव वा ।
विशेषस्तु महादेव ! तद् वदस्व दयानिधे ।।

श्री महादेवी (पार्वती) म्हणाल्या: हे दयानिधी शंभो! गुरुमंत्राचे दैवत म्हणजेच श्री गुरुदेव आणि त्यांचे आचार आदी धर्म काय आहे याबद्दल आपण विशेष वर्णन करावे.

।। श्रीमहादेव उवाच ।।
जीवात्मनं परमात्मनं दानं ध्यानं योगो ज्ञानम् ।
उत्कल काशीगंगामरणं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।1।।
श्री महादेवजी म्हणाले : जीवात्मा- परमात्म्याचे ज्ञान, दान, ध्यान, योग, पुरी, काशी किंवा गंगेच्या काठी मृत्यू – यामधले काहीही श्रीगुरुदेवांपेक्षा श्रेष्ठ नाही, श्रीगुरुदेवांपेक्षा मोठे नाही.

प्राणं देहं गेहं राज्यं स्वर्गं भोगं योगं मुक्तिम् ।
भार्यामिष्टंं पुत्रं मित्रं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।2।।
प्राण, शरीर, घर, राज्य, स्वर्ग, भोग, योग, मुक्ती, पत्नी, इष्ट, मुलगा, मित्र – यापैकी काहीही श्रीगुरुदेवांपेक्षा श्रेष्ठ नाही, श्रीगुरुदेवपेक्षा मोठे नाही.

वानप्रस्थं यतिविधधर्मं पारमहंस्यं भिक्षुकचरितम् ।
साधोः सेवां बहुसुखभुक्तिं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।3।।

वानप्रस्थ धर्म, यतीशी संबंधित धर्म, परमहंसांचा धर्म, भिक्षूचा (भिकारीचा) धर्म, साधू-सेवारूपी गृहस्थ-धर्म आणि अनेक सुखांचा आनंद – यापैकी काहीही श्री गुरुदेवांपेक्षा श्रेष्ठ नाही, श्रीगुरुदेवापेक्षा मोठे नाही.

विष्णो भक्तिं पूजनरक्तिं वैष्णवसेवां मातरि भक्तिम् ।
विष्णोरिव पितृसेवनयोगं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।4।।

भगवान श्री विष्णूची भक्ती, त्यांच्या पूजनाचा ध्यास, विष्णू-भक्तांची सेवा, आईची भक्ती, श्री विष्णू हेच वडिलांच्या रूपात आहेत, असे मानून केलेली वडिलांची सेवा – यापैकी काहीही श्री गुरुदेवांपेक्षा मोठे नाही, काहीही मोठे नाही.

प्रत्याहारं चेन्द्रिययजनं प्राणायां न्यासविधानम् ।
इष्टे पूजा जप तपभक्तिर्न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।5।।

प्रत्याहार आणि इंद्रियांचे दमन, प्राणायाम, न्यास-विन्यासाचे विधान, आराध्य दैवताची पूजा, मंत्र-जप, तपस्या आणि भक्ती – यापैकी कोणतेही श्री गुरुदेवांपेक्षा मोठे नाही, श्रीगुरुदेवांपेक्षा मोठे नाही.

काली दुर्गा कमला भुवना त्रिपुरा भीमा बगला पूर्णा ।
श्रीमातंगी धूमा तारा न गुरोरधिकं न गुरोरधिकम्। ।6।। 

काली, दुर्गा, लक्ष्मी, भुवनेश्वरी, त्रिपुरसुंदरी, भीमा, बगलामुखी (पूर्णा), मातंगी, धुमावती आणि तारा- या सर्व मातृशक्ती देखील श्री गुरुदेवांपेक्षा मोठ्या नाहीत, श्री गुरुदेवांपेक्षा मोठ्या नाहीत.

मात्स्यं कौर्मं श्रीवाराहं नरहरिरूपं वामनचरितम् ।
नरनारायण चरितं योगं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।7।।

भगवंताचे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, नर-नारायण इत्यादी अवतार, त्यांच्या लीला, चरित्रे तपस्या इत्यादी देखील श्री गुरुदेव यांच्यापेक्षा वरचढ नाहीत, ते श्री गुरुदेव पेक्षा जास्त नाहीत.

श्रीभृगुदेवं श्रीरघुनाथं श्रीयदुनाथं बौद्धं कल्क्यम् ।
अवतारा दश वेदविधानं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।8।।

वेदांमध्ये वर्णन केलेले भगवंताचे श्री भृगु, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की इत्यादी दहा अवतार श्री गुरुदेवांपेक्षा मोठे नाहीत, श्री गुरुदेवांपेक्षा मोठे नाहीत.

गंगा काशी काञ्ची द्वारा मायाऽयोध्याऽवन्ती मथुरा ।
यमुना रेवा पुष्करतीर्थं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।9।।

गंगा, यमुना, रेवा इत्यादी पवित्र नद्या, काशी, कांची, पुरी, हरिद्वार, द्वारका, उज्जैन, मथुरा, अयोध्या इत्यादी पवित्र क्षेत्रे आणि पुष्कर आदी तीर्थ क्षेत्रे देखील श्री गुरुदेवांपेक्षा जास्त नाहीत, ती श्री गुरुदेवांपेक्षा अधिक नाहीत.

गोकुलगमनं गोपुररमणं श्रीवृन्दावन-मधुपुर-रटनम् ।
एतत् सर्वं सुन्दरि ! मातर्न गुरोरधिकं न गुरोरधिकम्।।10।।

हे सुंदरी! हे मातेश्वरी! गोकुळाची यात्रा, गौशाळेचे भ्रमण किंवा श्री-वृंदावन व मधुपूर इत्यादी शुभ-नावांचे घोकणे- यापैकी काहीही श्री-गुरुदेवांपेक्षा मोठे नाही, श्रेष्ठ नाही.

तुलसीसेवा हरिहरभक्तिः गंगासागर-संगममुक्तिः ।
किमपरमधिकं कृष्णेभक्तिर्न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।11।।

तुळशीची सेवा, विष्णू आणि शिव यांची भक्ती, गंगासागरच्या संगमावर देहाचा त्याग आणि आणखी काय सांगावे, परात्पर भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती ही श्री गुरुदेवांपेक्षा नाही, श्रीगुरुदेव ह्याच्यापेक्षा जास्त नाही.

एतत् स्तोत्रं पठति च नित्यं मोक्षज्ञानी सोऽपि च धन्यम् ।
ब्रह्माण्डान्तर्यद्-यद् ध्येयं न गुरोरधिकं न गुरोरधिकम् ।।12।।

जो ह्या स्तोत्राचे नियमितपणे पठण करतो तो आत्मज्ञान आणि मोक्ष दोन्ही प्राप्त करून धन्य होतो. निश्चितच, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, ज्याचे ज्याचे ध्यान केले जाते, त्यापैकी कोणीही श्री गुरुदेवांपेक्षा श्रेष्ठ नाही, श्री गुरुदेवांपेक्षा श्रेष्ठ नाही.

Free Download

Guru Stotram Benefits in Marathi

Guru Brahma Prarthana

Guru Brahma Prarthana - Guru Vandana

Play Now: Guru Brahma Guru Vishnu Mp3 Audio

Guru Brahma Guru Vishnu with Meaning in Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥

अर्थ : ‘गुरू हेच ब्रह्मा आहेत, गुरू हेच विष्णू आहेत. गुरुदेव हेच भगवान शिव आहेत आणि गुरुदेवच साक्षात् साकार स्वरूप आदिब्रह्म आहेत. त्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो !’

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरो: पदम् ।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा ॥

अर्थ : ‘ध्यानाचा आधार गुरुंची मूर्ती आहे. पूजेचा आधार गुरुंचे श्रीचरण आहेत, गुरुदेवांच्या श्रीमुखातून निघालेले वचन मंत्राचा आधार आहेत तसेच गुरुदेवांची कृपाच मोक्षाचे द्वार आहे.’

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नम: ॥

अर्थ : ‘जो संपूर्ण ब्रह्मांडात जड आणि चेतन सर्वामध्ये व्यापलेला आहे, त्या परम पित्याच्या श्रीचरणांचे दर्शन करून मी त्यास नमस्कार करतो.’

त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव ॥
अर्थ : ‘तुम्हीच माता आहात. तुम्हीच पिता आहात, तुम्हीच बंधू आहात, तुम्हीच सखा आहात, तुम्हीच विद्या आहात, तुम्हीच धन आहात. हे देवाधिदेव ! सद्गुरुदेव ! तुम्हीच माझे सर्व काही आहात.’

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥

अर्थ : ‘जे ब्रह्मानंदस्वरूप आहेत, परम सुख देणारे आहेत, जे केवळ ज्ञानस्वरूप आहेत, (सुख-दुःख, शीत-उष्ण इ.) द्वंद्वांपासून रहित आहेत, आकाशासमान सूक्ष्म आणि सर्वव्यापक आहेत, ‘तत्त्वमसि’ इ. महावाक्यांचे लक्ष्यार्थ आहेत, एक आहेत, नित्य आहेत, मलरहित आहेत, अचल आहेत, सर्व बुद्धचे साक्षी आहेत, भावनातीत आहेत, सत्त्व, रज आणि तम तिन्ही गुणांपासून रहित आहेत अशा श्री सद्गुरुदेवांना मी नमस्कार करतो.’

Download Guru Brahma Guru Vishnu Marathi PDF, Mp3

Guru Vishnu Prarthana in Marathi

Purusha Suktam Lyrics, Meaning, Mahiti in Marathi PDF & Mp3

Purusha Suktam Lyrics, Meaning, Mahiti in Marathi PDF & Mp3

Play Audio Mp3 Purusha Suktam

Purusha Suktam Lyrics with Meaning in Marathi

  • जो चतुर्मासात भगवान विष्णूसमोर उभे राहून ‘पुरुष सूक्त’ चा पाठ करतो, त्याची बुद्धी कुशाग्र होते.

ॐ श्री गुरुभ्यो नमः ।
हरिः ओम् ।
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात ।
स भूमिँ सर्वतः स्पृत्वाऽत्चतिष्ठद्यशाङ्गुलम् ।।1।।

जो सहस्त्र मस्तकधारी, सहस्त्र नेत्रधारी आणि सहस्त्र चरण असलेला विराट पुरुष आहे. तो संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापूनही दहा अंगुल शेष राहतो. (1)

पुरुषऽएवेवँ सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् ।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ।।2।।

जी सृष्टी बनली आहे, जी बनणार आहे, ती सर्व विराट पुरुषच आहे. या अमर जीव जगाचाही तोच स्वामी आहे आणि जे अन्नाद्वारे विकसित होतात, त्यांचाही तोच स्वामी आहे. (2)

एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः ।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ।।3।।

विराट पुरुषाचा महिमा अगाध आहे. या श्रेष्ठ पुरुषाच्या एका चरणात सर्व प्राणी आहेत आणि तीन भाग अनंत अंतरिक्षात स्थित आहेत.(3)

त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः ।
ततो विष्वङ् व्यक्रामत्साशनानशनेऽअभि ।।4।।

चार भाग असणान्या विराट पुरुषाच्या एका भागात हा संपूर्ण संसार जड व चेतन अशा विविध रूपांमध्ये सामावलेला आहे. याचे तीन भाग अनंत अंतरिक्षात समाविष्ट आहेत.(4)

ततो विराडजायत विराजोऽअधि पूरुषः ।
स जातोऽअत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ।।5।।

या विराट पुरुषातूनच या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. त्या विराटातून समष्टी जीवाची उत्पत्ती झाली. तोच देहचारीच्या रूपात सर्वश्रेष्ठ बनला, ज्याने सर्वप्रथम पृथ्वीला आणि नंतर देहधारींना उत्पन्न केले. (5)

तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् ।
पशूँस्ताँश्चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याश्च ये ।।6।।

त्या सर्वश्रेष्ठ विराट प्रकृती यज्ञातून दहीयुक्त तूप मिळाले (ज्याने विराट पुरुषाची पूजा होते). वायुदेवाशी संबंधित पशु अर्थात् हरिण, गाय, घोडा इत्यादींची उत्पत्ती या विराट पुरुषाद्वारेच झाली आहे. (6)

तस्माद्यज्ञात् सर्वहुतऽऋचः सामानि जज्ञिरे ।
छन्दाँसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ।।7।।

त्या विराट यज्ञपुरुषातूनच ऋग्वेद व सामवेदाचे प्रागट्य झाले. त्याच्यापासूनच यजुर्वेद व अथर्ववेदाचा प्रादुर्भाव झाला अर्थात् वेदांच्या ऋचांचे प्रागट्य झाले. (7)

तस्मादश्वाऽजायन्त ये के चोभयादतः ।
गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाताऽअजावयः ।।8।।

त्या विराट यज्ञपुरुषातून दोन्हीकडे दात असणारे घोडे उत्पन्न झाले आणि त्याच विराट पुरुषातून गायी, बकल्या, मेंढ्या इ. पशूंचीही उत्पत्ती झाली. (8)

तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन् पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवाऽअयजन्त साध्याऽऋषयश्च ये ।।9।।

मंत्रद्रष्टा ऋषी व योगाभ्यासींनी सर्वप्रथम प्रगट झालेल्या पूजनीय विराट पुरुषाला यज्ञात (सृष्टीच्या पूर्वी विद्यमान महान ब्रह्मांडरूपी यज्ञ अर्थात् सृष्टी यज्ञ) समाविष्ट करून त्याच यज्ञरूपी परम पुरुषातून यज्ञाचे (आत्मयज्ञ) प्रागट्य केले. (9)

यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् ।
मुखं किमस्यासीत किं बाहू किमूरू पादाऽउच्येते ।।10।।

संकल्पाद्वारे प्रगट झालेल्या ज्या विराट पुरुषाचे ज्ञानीजन विविध प्रकारे वर्णन करतात, ते त्याची किती प्रकारे कल्पना करतात ? त्याचे मुख कोणते आहे ? बाहू, मांड्या आणि पाय कोणकोणते आहेत ? शरीर-संरचनेत तो पुरुष कशा प्रकारे पूर्ण बनला ? (10)

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्याँ शूद्रोऽअजायत ।।11।।

विराट पुरुषाचे मुख ब्राह्मण अर्थात ज्ञानीजन (विवेकवान पुरुष) बनले. क्षत्रिय अर्थात् पराक्रमी पुरुष त्याच्या शरीरात विद्यमान बाहूंच्या समान आहेत. वैश्य अर्थात् पोषणशक्तिसंपन्न मनुष्य त्याच्या मांड्या आणि सेवाधर्मी मनुष्य त्याचे पाय बनले. (11)

चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत ।
श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत ।।12।।

विराट पुरुष परमात्म्याच्या मनापासून चंद्र, डोळ्यांपासून सूर्य, कानांपासून वायू व प्राण तसेच मुखापासून अग्नीचे प्रागट्य झाले. (12)

नाभ्याऽआसीदन्तरिक्षँ शीर्ष्णो द्यौः समवर्त्तत ।
पद्भ्याँ भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ२ऽकल्पयन् ।।13।।

विराट पुरुषाच्या नाभीतून अंतरिक्ष, डोक्यातून द्युलोक, पायांतून भूमी व कानांतून दिशांचे प्रागट्य झाले. अशाच प्रकारे नाना लोकींची रचना करण्यात आली आहे. (13)

यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत ।
वसन्तोऽस्यासीदाज्यं ग्रीष्मऽइध्मः शरद्धविः ।।14।।

जेव्हा देवांनी विराट पुरुषाला हवी (यज्ञात) तूप टाकण्याची लाकडी पळी) मानून यज्ञाचा श्रीगणेशा केला, तेव्हा घृत (तूप) वसंत ऋतू इंधन (समिधा ) ग्रीष्म ऋतू आणि यज्ञसामग्री शरद ऋतू बनले. (14)

सप्तास्यासन् परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वानाऽअबध्नन् पुरुषं पशुम् ।।15।।

देवांनी ज्या यज्ञाचा विस्तार केला, त्यात विराट पुरुषालाच पशू (हव्य) रूपाच्या भावनेने बांधले. त्यात यज्ञाच्या सात परिधी (सप्त समुद्र) आणि एकवीस समिधा (छद) उत्पन्न झाल्या. (15)

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ।।16।।

आदिश्रेष्ठ धर्मपरायण देवांनी यज्ञाद्वारे यज्ञरूप विराट सत्तेचे पूजन केले. यज्ञीय जीवन जगणारे धार्मिक महात्मा पूर्वीच्या साध्य देवतांचा निवास असलेल्या स्वर्गात जातात. (16)

ॐ शांति: ! शांति: !! शांति: !!! (यजुर्वेदः 31.1-16)

सूर्यासमान तेजस्वी, निरहंकारी तो विराट पुरुष आहे, ज्याला जाणल्यानंतर साधक किंवा उपासकाला मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षप्राप्तीचा हाच मार्ग आहे. याहून भिन्न दुसरा कोणताही मार्ग नाही.  (यजुर्वेद: 31.18)

Free Purusha Suktam Mp3 Download

Purush Shukta Lyrics in Sanskrit| Purusha Suktam Meaning in Marathi