Play Now: Guru Brahma Guru Vishnu Mp3 Audio
Guru Brahma Guru Vishnu with Meaning in Marathi
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: ॥
अर्थ : ‘गुरू हेच ब्रह्मा आहेत, गुरू हेच विष्णू आहेत. गुरुदेव हेच भगवान शिव आहेत आणि गुरुदेवच साक्षात् साकार स्वरूप आदिब्रह्म आहेत. त्या गुरुदेवांना मी नमस्कार करतो !’
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरो: पदम् ।
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा ॥
अर्थ : ‘ध्यानाचा आधार गुरुंची मूर्ती आहे. पूजेचा आधार गुरुंचे श्रीचरण आहेत, गुरुदेवांच्या श्रीमुखातून निघालेले वचन मंत्राचा आधार आहेत तसेच गुरुदेवांची कृपाच मोक्षाचे द्वार आहे.’
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नम: ॥
अर्थ : ‘जो संपूर्ण ब्रह्मांडात जड आणि चेतन सर्वामध्ये व्यापलेला आहे, त्या परम पित्याच्या श्रीचरणांचे दर्शन करून मी त्यास नमस्कार करतो.’
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव ॥
अर्थ : ‘तुम्हीच माता आहात. तुम्हीच पिता आहात, तुम्हीच बंधू आहात, तुम्हीच सखा आहात, तुम्हीच विद्या आहात, तुम्हीच धन आहात. हे देवाधिदेव ! सद्गुरुदेव ! तुम्हीच माझे सर्व काही आहात.’
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥
अर्थ : ‘जे ब्रह्मानंदस्वरूप आहेत, परम सुख देणारे आहेत, जे केवळ ज्ञानस्वरूप आहेत, (सुख-दुःख, शीत-उष्ण इ.) द्वंद्वांपासून रहित आहेत, आकाशासमान सूक्ष्म आणि सर्वव्यापक आहेत, ‘तत्त्वमसि’ इ. महावाक्यांचे लक्ष्यार्थ आहेत, एक आहेत, नित्य आहेत, मलरहित आहेत, अचल आहेत, सर्व बुद्धचे साक्षी आहेत, भावनातीत आहेत, सत्त्व, रज आणि तम तिन्ही गुणांपासून रहित आहेत अशा श्री सद्गुरुदेवांना मी नमस्कार करतो.’