Play Audio
आरती गुरुदेवांची
जय देव जय देव जय सद्गुरुराया ।
आरती ओवाळीता हरली भवमाया ॥धृ.॥
सोऽहम् मंत्राची दीक्षा देऊनी,
षड् रिंपुचा अंत केलासे मनी ।
उद्धारिले साधक गेले तरूनी,
अर्पण पुष्पांजली बापूंच्या चरणी ||1||
जय देव…
सदैव प्रसन्नतेची विद्या देऊनी,
नवचैतन्य आले आमच्या जीवनी ।
ऊर्ध्वगामी नेले गुरुदेवांनी,
अर्पण पुष्पांजली बापूंच्या चरणी ॥2॥
जय देव…
आत्मज्ञानाची शिकवण देऊनी,
हरिओम हरिओम मंत्र गाऊनी ।
पूर्ण केली इच्छा सद्गुरुदेवांनी,
ठेविता माथा सद्गुरू चरणी ॥3॥
जय देव…
सदासर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ॥
उपेक्षूं नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आता ॥
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ॥
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।
तिथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही ॥
– हरिपाठ साहित्यातून…