Skip to content
BSK M- Tulsi Pujan Website Desktop View
BSK M - Tulsi Pujan Website Mobile View
तुळशीचे नामाष्टक, पूजा व ध्यान | Tulsi Namashtakam in Marathi

बाल संस्कार केंद्र म्हणजे काय ?

एक एक मूल हे ईश्वराच्या अनंत शक्तींचा समूह आहे. कुणामध्ये आद्यगुरु शंकराचार्य, तर कुणामध्ये स्वामी रामतीर्थ, कुणामध्ये महात्मा बुद्ध, तर कुणामध्ये महावीर स्वामी, कुणामध्ये विवेकानंदजी आणि काहींमध्ये तर पंतप्रधान बनण्याची लपलेली विलक्षण क्षमता आहे. गरज आहे ती फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची!! आमची अशी उच्च आहे कि ‘बालसंस्कार केंद्रा’मध्ये मुलांना इतके तेजस्वी बनवायचे आहे की, त्यांनी देशवासीयांचे अश्रू पुसण्याचे काम करावे आणि देशाला पुन्हा विश्वगुरूच्या पदावर आणावे.
– पूज्य संत श्री आशारामजी बापू

बाल्यकाळापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार जागृत व्हावेत आणि दिव्यतेचा झरा त्यांच्या जीवनात वाहू लागावा या उद्देशाने विश्व मांगल्याच्या भावनेने ओतप्रोत पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या प्रेरणेने बाल संस्कार केंद्रांची स्थापना झाली. येथे हसत-खेळत महानतेचे संस्कार आणि आपल्या योग्यता विकसित करण्याची संधी मुलांना सहजच मिळते. आई वडिलांचा आदर करणे इ. संस्कारांसह बुद्धीचा विकास, शरीराची निरोगता, मनाची प्रसन्नता तसेच दडलेल्या शक्तींना जागृत करण्याची कला त्यांना येथे शिकायला मिळते.

बाल संस्कार केंद्रासाठी बापूजींचा संदेश

हे भारतभूमीच्या शूर पुत्रांनो! तुम्ही भारताची शान, राष्ट्राची संपत्ती आणि देशाची शान आहात. तुमची भक्ती आणि शक्ती एवढी विकसित करा की तुमच्यात शूर शिवाजी आणि महाराणा प्रताप यांचा स्वाभिमान जागृत होईल.. परुषाची भक्ती आणि योगशक्ती जागृत होईल…. संत श्री लीलाशाहजींनी बापूंची योगशक्ती, दिव्य दृष्टी जागवली. ब्रह्मज्ञान आणि समाजाची प्रगती….

हे वीर! हिम्मत करा, निर्भय व्हा आणि अभिमान बाळगा की तुम्ही भारताचे लाल आहात. शोषितांना आणि पिडीतांना मदत करा… शोषकांना विरोध करा… देशाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा… आणि निर्भय होऊन आत्मसाक्षात्कार करा. शाब्बास नायक! शाब्बास… देव आणि संतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

नविन लेख

Country
1
Number of BSK
1
Children
1

गॅलरी

600600p423EDNmainimg-Sakoli-1
"पूर्वी मी ध्यान, प्राणायाम, योगासने वगैरे काहीच करीत नव्हतो, परंतु बाल संस्कार केंद्रात जाऊ लागल्यानंतर आता हे सर्वच करू लागलो आहे."
राघवेंद्र राकेशकुमार पचौरी
पिपरिया (म.प्र.).
"बापूजी ! आपण आमच्या हाती बाल संस्काररूपी ज्योत देऊन आम्हाला सन्मार्ग दाखविला आहे."
विशाल प्रकाशराव पाटील
जळगाव (महा.)
"मला केंद्रात पवित्र शिकवण मिळाली आणि मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला शाकाहारी बनविण्यात तसेच आजी आजोबांच्या मनात मंत्रजपाप्रती रुची जागृत करण्यात यशस्वी झाले."
शालू सिंह
वरळी, मुंबई (महा.),